मराठीत वाचा
Read in English
# माझा परिचय--
श्री अभिजित रामचंद्र तोडकरसंस्कृत शिक्षक,श्लोकशिक्षण-आयामप्रमुख
संस्कृतभारती,पश्चिममहाराष्ट्र प्रांत
# शैक्षणिक अर्हता--
- एम.ए.संस्कृत (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ)
- बी एड् संस्कृत, इंग्रजी (कविकुलगुरू कालिदास विद्यापीठ,नागपुर )
- इंडियन नॉलेज सिस्टिम्स अभ्यासक्रम प्रमाणपत्र (केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालय)
- सरल मानक संस्कृत अभ्यासक्रम प्रमाणपत्र (केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालय)
- शासकीय अनिवार्यतेनुसार फेब्रुवारी २०२६ मध्ये CTET परीक्षा उत्तीर्ण (१२४ /१५० गुण)
# प्रशासकीय आणि संघटनात्मक अनुभव--
- अध्यापन अनुभव– महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी पुणे या संस्थेच्या सासवड येथील वाघीरे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात २००४ पासून आजवर गेली २२ वर्षे इयत्ता आठवी ते दहावी या वर्गांना संस्कृत विषयाचे अध्यापन.
- समन्वय कार्य--२०२० मध्ये झालेल्या महाराष्ट्र राज्यातील संस्कृत शिक्षकांच्या ऑनलाइन राज्यस्तरीय प्रशिक्षणांकरता नागपूर येथील कवी कुलगुरू कालिदास विद्यापीठ आणि संस्कृत भारती यांच्यातर्फे राज्यस्तरीय प्रशिक्षण समन्वयक (State Coordinator) म्हणून कार्य
- संघटनकार्य--
- २०१७ पासून आजतागायत संस्कृत भारतीच्या बारामती जिल्ह्याचा संयोजक म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.
- २०२० पासून संस्कृत भारतीच्या श्लोकशिक्षण आयामाचा पश्चिम महाराष्ट्र प्रांताचा प्रमुख म्हणून जबाबदारी आहे.
- विशेष उपक्रम--
- या आयामातर्फे गेली सहा वर्षे पश्चिम महाराष्ट्राच्या दीडशेहून अधिक शाळांमध्ये श्लोकपठन स्पर्धा घेतल्या जातात. हजारो विद्यार्थी त्यामध्ये सहभागी होतात.
- २०२४ आणि २०२५ मध्येही ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीत दर शनिवारी श्लोक-शिक्षकांची १० ऑनलाईन प्रशिक्षणे आयोजित केली आणि त्यासाठी प्रशिक्षक म्हणून काम केले.
# लेखन आणि संशोधन--
- प्रकाशन--चैतन्यलोक, ब्रह्मास्त्र, हिमसंस्कृतवार्ता या संस्कृत दैनिकांमधून अनेक विषयांवर शंभरहून अधिक संस्कृत लेख प्रकाशित.
- अनुवादकार्य-- रमण महर्षींच्या Who am I?, Self Enquiry या लघुपुस्तिकांचा संस्कृतमध्ये अनुवाद. स्कंदपुराणातील अरुणाचलमाहात्म्य या स्थलपुराणाचे सरल संस्कृतमध्ये रूपांतर.
- अभ्यासक्रम निर्मिती-- राष्ट्रिय शैक्षणिक धोरण २०२० मधील ५+३+३+४ याआराखड्यानुसार बालवाटिकेपासून बारावीपर्यंतच्या सर्व इयत्तांसाठी संस्कृत श्लोकशिक्षणाच्या स्तरित पूरक अभ्यासक्रमाची (Graded Supplementary Curriculum) निर्मिती.
# डिजिटल योगदान--
- आर्यभारती हा संस्कृत विषयावरील यूट्यूब चॅनलचे संचालन
आर्यभारती यूट्यूब चॅनल पहा--- https://youtube.com/@abhitdkr9?si=bqW1TWApYwRgvueA
- संस्कृत श्लोकशिक्षणासाठी 'श्लोकशिक्षणम्' या ब्लॉग स्वरूपातील डिजिटल प्लॅटफॉर्मची निर्मिती (सदरचा ब्लॉग)
- श्लोकभारती या अन्य ब्लॉगवर १५१ श्लोकांचा पदच्छेद,अन्वय तसे मराठी, हिंदी, इंग्रजी,सरल संस्कृत या चार भाषांमध्ये अनुवाद
श्लोकभारती या ब्लॉगला भेट द्या--- https://shlokbharati.blogspot.com/
- माझे संस्कृत वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेले सरल संस्कृतमधील पुस्तकांचे अनुवाद आणि आणि इतर लेख यांच्यासाठी तयार केलेला आर्यमन्तव्यम् हा ब्लॉग
आर्यमन्तव्यम् या ब्लॉगला भेट द्या--- https://aryamantavam.blogspot.com/
Scan to share this page![]()