॥ श्लोकपठनस्पर्धा ॥

मराठीत वाचा.......... Read in English

# श्लोकपठन स्पर्धा – ओळख, नियोजन आणि नोंदणी

  • विद्यार्थ्यांपर्यंत संस्कृतच्या माध्यमातून सुसंस्कार पोहचावेत, या उद्देशाने २०२० पासून संस्कृत भारतीच्या श्लोकशिक्षण आयामातर्फे पश्चिममहाराष्ट्र प्रांतात (कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक या सात जिल्ह्यांमध्ये) ही विशेष स्पर्धा आयोजित केली जाते. 
  • राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये मूल्य शिक्षणावर मोठा भर देण्यात आलेला आहे संस्कृत आणि त्यातील सुभाषिते हे मूल्य शिक्षणाचे उत्तम साधन आहे. म्हणून या स्पर्धेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. 
  • गेल्या वर्षी या स्पर्धेत पश्चिम महाराष्ट्र प्रांतातील १७६ शाळा आणि सुमारे ५००० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

१. स्पर्धेचे स्वरूप आणि स्तर

ही स्पर्धा बालवाटिकेपासून ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी इयत्तानिहाय घेतली जाते (एकूण १५ गट). स्पर्धा एकूण तीन स्तरांवर पार पडते:

  • शालेय स्तर (आपल्या शाळेतच)
  • जनपद स्तर (जिल्हा स्तरावर)
  • प्रांत स्तर (विभागीय स्तरावर)

२. शिक्षकांसाठी नोंदणी आणि प्रशिक्षण

  • पात्रता: शाळेत संस्कृत विषय असण्याची अट नाही. संस्कृतवर प्रेम करणारा कोणताही शिक्षक/शाळा नोंदणी करू शकते. 
  • प्रशिक्षण: ज्या शिक्षकांना संस्कृतचे पूर्वज्ञान नाही, त्यांना जुलै ते सप्टेंबर दरम्यान दर शनिवारी ऑनलाईन प्रशिक्षण दिले जाते.
  • नियोजन: नोंदणीनंतर शिक्षकांचा व्हॉट्सॲप ग्रुप केला जातो. शिक्षकांनी शाळेतील कोणत्याही एका इयत्तेच्या सर्व मुलांना स्पर्धेत सहभागी करून घ्यावे.
  • शक्यतो आपल्या शाळेतील सर्वात लहान इयत्ता निवडावी म्हणजे पुढील वर्षी सलगता राहील.
  • विद्यार्थिसंख्या: एका इयत्तेचे किमान दहा विद्यार्थी असणे बंधनकारक राहील. जास्तीत जास्त कितीही संख्या चालू शकते.

३. सराव आणि साधने

  • विद्यार्थ्यांच्या सरावासाठी या ब्लॉगवर अभ्यासक्रम, मराठी/इंग्रजी अर्थ आणि शुद्धोच्चारणाचे ऑडिओ नमुने उपलब्ध आहेत.
  • ब्लॉगवरील उजव्या हाताला साईडबारमध्ये स्पर्धेसाठी श्लोकांच्या लिंक्स दिल्या आहेत.

# स्पर्धेचे वेळापत्रक, पुरस्कार आणि गुणदान निकष--

कार्यक्रम / टप्पा कालावधी / तारीख
शिक्षक नोंदणी१५ ते ३० जून
पाठांतर कालावधीजुलै ते १० सप्टेंबर
जिल्हास्तरीय स्पर्धा४ ऑक्टोबर
प्रांतस्तरीय स्पर्धा२२ नोव्हेंबर

टीप: संस्कृतभारती आवश्यकतेनुसार या वेळापत्रकात बदल करू शकते.

२. गुणदान आणि इयत्तानिहाय निकष

परीक्षकांकडून निष्पक्षपातीपणे खालील निकषांवर गुणदान केले जाईल:

  • बालवाटिका ते ५ वी: केवळ शुद्ध उच्चारण आणि लयबद्ध पठन.
  • ६ वी ते ८ वी: शुद्ध उच्चारण, लयबद्ध पठन आणि श्लोकाचा अर्थ.
  • ९ वी ते १२ वी: शुद्ध उच्चारण, लयबद्ध पठन, श्लोकाचा अर्थ आणि समीक्षणात्मक मत.

३. प्रवेश शुल्क आणि गौरव

शुल्क: स्पर्धेसाठी प्रति विद्यार्थी २० रुपये नाममात्र शुल्क आहे. त्यापैकी १० रुपये संस्कृतभारतीच्या खात्यावर जमा करावेत. उरलेले १० रुपये शाळा व्यवस्थापनाकडेच ठेवून त्यातून सहभाग प्रमाणपत्रांचे प्रिंटिंग करावे.

पुरस्कार:

  • शालेय स्तर: डिजिटल सहभाग प्रमाणपत्र.
  • जिल्हा स्तर: मेडल आणि प्रमाणपत्र.
  • प्रांत स्तर: ट्रॉफी आणि प्रमाणपत्र.
  • सर्वाधिक सहभाग असणाऱ्या शाळेला 'फिरता चषक' दिला जाईल.

पश्चिम महाराष्ट्र प्रान्त पदाधिकारी
पदनाम नाव आणि मोबाईल नंबर
प्रान्त श्लोकशिक्षण प्रमुख अभिजित तोडकर (9145908156)
प्रान्त सहप्रमुख वैखरी कुलकर्णी  (9970289910)
महानगर कार्यप्रमुख १ मनाली सावळे (8275066032)
महानगर कार्यप्रमुख २ भक्ती कापरे (8975533463)

 

पुणे महानगर भाग प्रमुख
अनु. महानगरातील भाग भाग प्रमुख आणि मोबाईल नंबर
1 हडपसर दीपिका दीक्षित (7385640032)
2 विद्यापीठ उपलब्ध नाही
3 येरवडा गोपीनाथ पालोदकर (7057941657)
4 सिंहगड मेघना आगवेकर (9158294681)
5 कात्रज क्रांती खुळगे (9850047921)
6 कसबा वृषाली केळकर (9822495100)
7 संभाजी भाग स्वाती पाठक (9764923597)
8 पर्वती ज्ञानदा कस्तुरे (7304584504)

 

शेष प्रान्त जनपद प्रमुख
अनु. जनपद जनपदप्रमुख आणि मोबाईल नंबर
1 सोलापुर निखिल बडवे (9970676090)
2 कोल्हापुर सुविद्या लेले (9890255455)
3 सातारामाधुरी कुलकर्णी (9822616366)
भारती काळे (986008709)
4 पुणे ग्रामीण मीरा रामायणे (727677645)
5 बारामतीसनतकुमार खोत (9028732233)
6 पिंपरी चिंचवड रोहिणी स्वामी (8983117227)
7 अहिल्यानगरदिनेश मुळे (9975097034)
अनीता माळी (9850147340)
8 नाशिक आनंद देसाई (9822133364)
हे पान शेअर करा
QR Code