|
बालवाटिका १ चे सर्व श्लोक प्रिंट करा |
हे पान शेअर करण्यासाठी स्कॅन करा |
श्लोक क्र. १ ते १० (गायिका--परिज्ञा)
वक्रतुण्ड महाकाय
सूर्यकोटिसमप्रभ।
निर्विघ्नं कुरु मे देव
सर्वकार्येषु सर्वदा।।१।।
ज्याचे तोंड सोंडेमुळे वक्र भासते, ज्याचे शरीर विशाल आहे, कोटी सूर्यांप्रमाणे ज्याचे तेज आहे अशा हे गणेशा, माझ्या सर्व कार्यांमधील विघ्नांना तू नेहमी दूर कर.
Oh Lord Ganesh, you ,whose mouth appears contorted,who has quite a huge body, whose lustre equals that of crores of suns, please make all my undertakings, always free from obstacles.
सरस्वति नमस्तुभ्यं
वरदे कामरूपिणि।
विद्यारम्भं करिष्यामि
सिद्धिर्भवतु मे सदा।।२।।
हे वर देणार्या, सर्वांच्या कामना पूर्ण करणार्या सरस्वती देवी, मी विद्येला आरंभ करत आहे. विद्या मिळवण्यात मला नेहमी यश मिळो.
Oh Goddess Saraswati, bestower of boons, one who fulfills desires of the devotees, I bow to Thee. I'm commencing my studies, please make them always fruitful.
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु:
गुरुर्देवो महेश्वर:।
गुरु: साक्षात् परब्रह्म
तस्मै श्रीगुरवे नम:।।३।।
गुरू हे ब्रह्मदेवच आहेत. गुरू हे विष्णुस्वरूप आणि शिवस्वरूपही आहेत. गुरू साक्षात् परब्रह्मच आहेत. त्या श्रीगुरूंना माझा नमस्कार.
Guru is verily Brahmadev, he is Vishnu and he is God Shiva. He is verily Para-brahman. Salutations to him.
पृथिव्यां त्रीणि रत्नानि
जलमन्नं सुभाषितम्।
मूढै: पाषाणखण्डेषु
रत्नसंज्ञा विधीयते।।४।।
पाणी, अन्न व सुभाषित ही पृथ्वीवरील तीन रत्ने आहेत. मूर्ख लोक मात्र दगडाच्या तुकड्यांना रत्न असे नाव देतात.
There are three real gems on earth viz. water, food and good utterances. Only the dim-witted give the name 'gem' to the pieces of stones.
सत्येन धार्यते पृथ्वी
सत्येन तपते रविः।
सत्येन वाति वायुश्च
सर्वं सत्ये प्रतिष्ठितम्।।५।।
सत्य पृथ्वीला धारण करते, सत्यामुळेच सूर्य प्रकाशतो आणि वारा वाहतो. सत्य हाच सगळ्याचा आधार आहे.
Truth bears the earth. Because of Truth, the sun shines and the wind blows. Verily everything is rooted in Truth only.
यथा देशस्तथा भाषा
यथा राजा तथा प्रजा।
यथा भूमिस्तथा तोयं
यथा बीजं तथाङ्कुरः।।६।।
जसा देश तशी भाषा, जसा राजा तशी प्रजा, जशी जमीन तसेच पाणी व जसे बीज तसाच अंकुर असतो. (कारणाचेच गुण कार्यामध्ये असतात)
Just as the territory is , so is the language spoken in it, just as the king is , so are his subjects. Just as the land is, so is the water found in it,Just as the seed is, so is the sprout. (The characteristics of the cause are found in the effect )
पक्षिणां बलमाकाशं
बालानां रोदनं बलम्।
दुर्बलस्य बलं राजा
मत्स्यानामुदकं बलम् ।।७।।
पक्ष्यांचे बळ आकाशात असते. मुलांचे बळ रडण्यात असते. राजा हा दुर्बळांचे बळ आहे तर माशांचे पाणी हे बळ आहे.
The sky is the strength of the birds, crying is the strength of the children, the king is the strength of the weak and water is the strength of the fish.
शैले शैले न माणिक्यं
मौक्तिकं न गजे गजे ।
साधवो न हि सर्वत्र
चन्दनं न वने वने।।८।।
प्रत्येक पर्वतावर रत्नमाणके मिळत नाहीत. प्रत्येक हत्तीच्या गंडस्थळात मोती आढळत नाहीत. सज्जन लोक सर्वत्र असत नाहीत. प्रत्येक वनात चंदनवृक्ष असत नाहीत. (चांगल्या गोष्टी नेहमी दुर्मिळ असतात)
Gems are not found in every mountain. Pearls are not found in every elephant. Gentlemen are not found everywhere. Sandal trees are not present in every forest. (All good things are always rare to find)
अहिंसा परमो धर्मः
तथाऽहिंसा परो दमः।
अहिंसा परमं दानम्
अहिंसा परमं तपः।। ९।।
अहिंसा हाच श्रेष्ठ धर्म आहे, अहिंसा हाच उत्तम इंद्रियसंयम आहे. अहिंसा हेच श्रेष्ठ दान आहे व अहिंसा हेच श्रेष्ठ तप आहे.
Non-violence is the excellent duty, it is the highest sense-control, it is the greatest charity and it is the highest penance.
आरोग्यं परमो लाभः
सन्तोषः परमं धनम्।
विश्वासः परमं मित्रं
राष्ट्रसेवा परं सुखम् ।।१०।।
आरोग्य हाच सर्वश्रेष्ठ लाभ आहे, संतोष हे सर्वश्रेष्ठ धन आहे. विश्वास हा सर्वश्रेष्ठ मित्र आहे व देशाची सेवा हे सर्वश्रेष्ठ सुख आहे.
Health is the greatest benefit, contentment is the greatest wealth, faith is the greatest friend and service to the nation is the greatest happiness.
----------------------------------------------------------------------------------------------------------