|
बालवाटिका २ चे सर्व श्लोक प्रिंट करा |
हे पान शेअर करण्यासाठी स्कॅन करा |
श्लोक क्र. ११ ते २० (गायिका--परिज्ञा)
जननी जन्मभूमिश्च
जाह्नवी च जनार्दनः।
जनकः पञ्चमश्चैव
जकाराः पञ्च दुर्लभाः।।११।।
जाह्नवी च जनार्दनः।
जनकः पञ्चमश्चैव
जकाराः पञ्च दुर्लभाः।।११।।
जननी (आई) ,जन्मभूमी, जाह्नवी (गंगा) , जनार्दन (विष्णू), आणि पाचवा जनक (वडील) हे पाच जकार दुर्लभ आहेत.
The mother, the motherland, the Ganges , the deity Vishnu and the father --these five whose Samskrit names start with the letter 'ज' are very difficult to attain.
स्थानभ्रष्टा न शोभन्ते
दन्ता: केशा नखा नरा:।
इति विज्ञाय मतिमान्
स्वस्थानं न परित्यजेत् ।।१२।।
आपल्या स्थानावरून बाजूला झालेले दात, केस, नखे आणि माणसे शोभून दिसत नाहीत, हे जाणून शहाण्या माणसाने आपले स्थान कधीही सोडू नये.
Such teeth, hair, nails and persons as are dislodged from their position, do not look good. Knowing this the intelligent should never forsake his position.
सुलभा: पुरुषा राजन्
सततं प्रियवादिन:।
अप्रियस्य च पथ्यस्य
वक्ता श्रोता च दुर्लभ:।।१३।।
हे राजा, सतत तोंडावर गोड बोलणारी माणसं सहज मिळतात. पण कानाला गोड न वाटणारं पण हिताचं सांगणारा आणि ते ऐकून घेणारा हे दोघेही दुर्मिळ असतात.
O king, sweet-talkers are always easy to find. But the person whose words are unpleasant to the ear but are beneficial in reality, and the person who listens to such words, both are very rare to find.
पुण्यस्य फलमिच्छन्ति
पुण्यं नेच्छन्ति मानवा:।
फलं पापस्य नेच्छन्ति
पापं कुर्वन्ति नित्यश:।।१४।।
माणसे पुण्याच्या फलाची इच्छा करतात पण पुण्य मात्र करत नाहीत. आणि ती पापाच्या फळाची इच्छा करत नाहीत पण पाप मात्र नेहमी करतात.
Humans want the good fruits of the good deeds (such as the attainment of heaven after death) but don't want to do such deeds. They don't want the fruit of evil deeds (such as the attainment of hell after death) but always engage themselves in doing them.
अष्टादशपुराणेषु
व्यासस्य वचनद्वयम्।
परोपकार: पुण्याय
पापाय परपीडनम् ।।१५।।
अठरा पुराणांमधे व्यासांची दोनच सारभूत अशी वचने आहेत. ती म्हणजे– परोपकार हा पुण्याला कारणीभूत होतो तर परपीडा ही पापाला करणीभूत होते.
In all the eighteen Puranas, the two sayings of Vyasa are the most prominent– helping others is the cause of merit, whereas persecution of others is sinful.
गते शोको न कर्तव्यो
भविष्यं नैव चिन्तयेत्।
वर्तमानेन कालेन
वर्तयन्ति विचक्षणा: ।।१६।।
गेलेल्याचा फार शोक करू नये व भविष्याचीही फार चिंता करू नये. विचारी लोक नेहमी वर्तमानकाळाचा विचार करून वागतात.
One should not lament about what is past, nor should one keep thinking about the future. The intelligent people go by only the present time.
वृथा वृष्टि: समुद्रेषु
वृथा तृप्तस्य भोजनम् ।
वृथा दानं समर्थस्य
वृथा दीपो दिवापि च।।१७।।
समुद्रात पाऊस पडणे व्यर्थ आहे, तृप्त झालेल्याला भोजन देणे व्यर्थ आहे, समर्थाला केलेल्या दानाचा उपयोग नाही तसेच दिवसा दिवा पेटवणे व्यर्थ आहे. (माणसाने अशी निष्फळ कामे करून शक्ती वाया घालवू नये)
Rains over the oceans are fruitless, so also giving meals to the satiated, charity to the wealthy and lighting lamps in the daytime.( One should not waste their energy in such fruitless works)
चन्दनं शीतलं लोके
चन्दनादपि चन्द्रमा: ।
चन्द्रचन्दनयोर्मध्ये
शीतला साधुसङ्गति:।।१८।।
या जगामधे चंदन हे शीतल आहे, चंदनापेक्षाही चंद्र शीतल आहे. पण चंद्र व चंदन यांच्यापेक्षाही सज्जनांची संगत अधिक शीतल आहे.
In this world, the sandalwood is cool or soothing. Compared to sandalwood, the moon is cooler. And the association with good people is even more soothing than both the sandalwood and the moon.
गङ्गा पापं शशी तापं
दैन्यं कल्पतरुस्तथा ।
पापं तापं च दैन्यं च
घ्नन्ति सन्तो महायशा:।।१९।।
गंगा पाप नाहीसे करते, चंद्र ताप नाहीसा करतो व कल्पवृक्ष दैन्य नाहीसे करतो. परंतु थोर अंत:करणाचे सज्जन लोक पाप, ताप व दैन्य हे तीनही नाहीसे करतात.
The Ganges destroys sin, the moon annihilates mental suffering, and the wish fulfilling tree destroys poverty. But the righteous people of great fame destroy all the three --sin, mental suffering and poverty.
नरस्याभरणं रूपं
रूपस्याभरणं गुण:।
गुणस्याभरणं ज्ञानं
ज्ञानस्याभरणं क्षमा।।२०।।
रूप हा मनुष्याचा दागिना आहे, गुण हा रूपाचा दागिना आहे, ज्ञान हा गुणाचा दागिना आहे तर क्षमा हा ज्ञानाचा दागिना आहे.
Good looks are the ornament of man, virtue is the ornament of good loo
ks, knowledge is the ornament of virtue and forbearance is the ornament of knowledge.
---------------------------------------------------------------------------