श्लोक २१ ते ३०

बालवाटिका ३ चे सर्व श्लोक प्रिंट करा

हे पान शेअर करण्यासाठी स्कॅन करा

श्लोक क्र. २१ ते ३० (गायिका--परिज्ञा)



तक्षकस्य विषं दन्ते 
मक्षिकायाश्च मस्तके । 
वृश्चिकस्य विषं पुच्छे 
सर्वाङ्गे दुर्जनस्य तत्।।२१।।

नागाचे विष त्याच्या दांतात असते. मधमाशीचे विष तिच्या तोंडात असते. विंचवाचे विष त्याच्या नांगीत असते. पण दुर्जनाच्या सर्वांगातच विष असते. 

The poison of the serpent lies in its teeth ; of the honey-bee , in its head ; of the scorpion , in its tail. But in case of the wicked person the poison lies in his whole body.

अर्थेन भेषजं लभ्यं 
न ह्यारोग्यं कदापि च।
अर्थेन ग्रन्थसम्भार: 
ज्ञानं लभ्यं प्रयत्नत: ।।२२।।

पैशाने औषध विकत घेता येते, आरोग्य मात्र कधीही नाही. पैशाने ग्रंथाचा ढीग मिळेल पण ज्ञान मात्र प्रयत्नांनीच मिळवावे लागते.

Medicines can be bought with money but not health. Money can buy stacks of books but knowledge has to be earned through our own efforts.

कुसुमं वर्णसम्पन्नं 
गन्धहीनं न शोभते। 
न शोभते क्रियाहीनं 
मधुरं वचनं तथा ।।२३।।

रंगाने आकर्षक असलेले पण गंधहीन फूल शोभून दिसत नाही. त्याप्रमाणेच कृतीची जोड नसलेले नुसते गोड गोड बोलणे शोभून दिसत नाही. 

A flower having colours but no fragrance doesn't feel beautiful. Likewise only sweet talk which is not accompanied by appropriate action doesn't shine out.

क्षणश: कणशश्चैव 
विद्यामर्थं च साधयेत् ।
क्षणत्यागे कुतो विद्या 
कणत्यागे कुतो धनम् ।।२४।।

क्षणाक्षणाने विद्या मिळवावी व कणाकणाने धन मिळावावे. क्षणाचा त्याग केला तर विद्या कशी मिळेल व कणाचा त्याग केला तर धन कसे मिळेल ? 

Knowledge should be gained by the moment and wealth by bits. If moments are wasted, How can one attain knowledge? If bits are wasted , how can one attain wealth?

अलसस्य कुतो विद्या 
अविद्यस्य कुतो धनम् । 
अधनस्य कुतो मित्रम् 
अमित्रस्य कुत: सुखम्।।२५।।

आळशी माणसाला विद्या कोठून मिळणार ? ज्याच्याकडे विद्या नाही त्याला धन कसे मिळणार ? ज्याच्याकडे धन नाही त्याला मित्र कसे मिळाणार ? ज्याला मित्र नाहीत त्याला सुख कसे मिळणार ? 

From where will a lazy person get knowledge? How can a person without knowledge attain wealth? How can a poor person have friends? And how can a person without friends attain happiness?

यत्र नार्यस्तु पूज्यन्ते 
रमन्ते तत्र देवता:।
यत्रैतास्तु न पूज्यन्ते 
सर्वास्तत्राफला: क्रिया:।। २६।।

जिथे स्त्रियांचा सन्मान केला जातो, तिथे देवता रममाण होतात. पण जिथे त्यांचा सन्मान होत नाही तिथं माणसांच्या सर्व क्रिया निष्फळ होतात.

The gods dwell there, where women are given respect. But where they are not respected, all undertakings are rendered fruitless.

हंस: श्वेतो बक: श्वेत: 
को भेदो बकहंसयो: । 
नीरक्षीरविवेके तु 
हंसो हंसो बको बक:।।२७।।

हंस पांढर्‍या रंगाचा आहे, बगळा पांढर्‍या रंगाचा आहे, मग हंस व बगळा यात फरक काय ? दूध व पाणी वेगळे करण्याच्या बाबतीत हंस हा हंस असतो व बगळा हा बगळा असतो. (कसोटीच्या प्रसंगातच  माणसा-माणसांमधला खरा फरक स्पष्ट होतो. जसे पाणी आणि दूध यांच्या मिश्रणातून दूध वेगळे करण्याची क्षमता हंसात असते पण बगळ्यात असत नाही, असे कवी म्हणतात.)

The swan is white, so is the heron. Then what difference is there between the swan and the heron? In the event of segregating water and milk from their mixture, the swan is swan and the heron is heron. (Even if two people look alike outwardly, the real difference between them stands out when a challenging task is put before them)

उद्यमेन हि सिद्ध्यन्ति 
कार्याणि न मनोरथैः । 
न हि सुप्तस्य सिंहस्य 
प्रविशन्ति मुखे मृगाः।।२८।।

प्रयत्नांनीच कार्ये सफळ होतात, केवळ मनोरथांनी नाही. (सिंह जंगलाचा राजा असला तरी) झोपलेल्या सिंहाच्या तोंडात पशू काही आपोआप येऊन पडत नाहीत. (त्यासाठी त्याला शिकारीचा उद्योग करावाच लागतो.)

Efforts are absolutely necessary to attain success in our doings. Even if the lion is the king of the jungle, the preys don’t drop into his mouth of their own accord. (He has to hunt for them like everybody else)

अयं निज: परो वेति 
गणना लघुचेतसाम्।
उदारचरितानां तु 
वसुधैव कुटुम्बकम्।। २९।।

कोत्या मनाची माणसे 'हा आपला आणि तो परका' अशी गणना करत असतात.पण उदार चारित्र्याची माणसे सबंध पृथ्वीच आपले कुटुंब आहे असे समजतात.

This person is mine and that is not – this kind of calculation is the characteristic of the narrow-minded.Those who are broad- minded, deem the whole earth as their own family.

बालो वा यदि वा वृद्धो 
युवा वा गृहमागत:।
तस्य पूजा विधातव्या 
सर्वस्याभ्यागतो गुरु:।। ३०।।

घरी आलेले लहान मूल असो, युवक असो वा वृद्ध असो, त्याचा आदरसत्कार केला पाहिजे.कारण अतिथी हा सर्वांचा गुरूच असतो.

He who has come to your house, may he be a child or a youth or an elderly person, one must honour him duly, for the guest is the teacher of all.

--------------------------------------------------------

ध्वनिमुद्रणम्।

गायिका--कु परिज्ञा पुरी