श्लोक ३१ ते ५०

श्लोक ऐका--गायिका कु.परिज्ञा पुरी
⬇ फाईल डाउनलोड करा (Download MP3)
परोक्षे कार्यहन्तारं 
प्रत्यक्षे प्रियवादिनम्।
वर्जयेत्तादृशं मित्रं 
विषकुम्भं पयोमुखम्।।३१।।

जो आपल्यासमोर गोड बोलणारा आणि आपल्या पाठीमागे आपल्या कार्याचा नाश करणारा असेल अशा मित्राचा आपण त्याग करावा. कारण तो मुखाजवळ अमृत असणाऱ्या पण आतून विषाने भरलेल्या हंड्याप्रमाणे आहे.

He who resorts to flattering you in front but destroys your work behind your back-- that kind of friend should be avoided, just like a jar filled below with poison but having milk at the mouth.

न कश्चित्कस्यचिन्मित्रं 
न कश्चित्कस्यचिद्रिपु:। 
व्यवहारेण जायन्ते 
मित्राणि रिपवस्तथा।।३२।।

वस्तुत: कुणीही कोणाचा मित्र किंवा शत्रू नसतो. व्यवहारामुळेच काहीजण आपले मित्र तर काहीजण शत्रू होतात.

Nobody is the friend of anybody nor is he the enemy of anybody. Only because of his dealings / work friends and enemies are created.

किं कुलेन विशालेन 
विद्याहीनस्य देहिनः । 
अकुलीनोऽपि विद्यावान् 
देवैरपि स पूज्यते।।३३।।

माणसाकडे विद्या नसेल तर नुसतं मोठ्या कुळात जन्म होऊन काय उपयोग? जरी मोठ्या घरी जन्मलेला नसला तरी माणसाजवळ विद्या असेल तर तो देवांनाही पूज्य होतो.

Only being born in a high family is of little importance if one doesn’t have knowledge. But the man of knowledge, even if he is born in a not very reputed family, he is worshiped even by the gods.

धनानि जीवितं चैव 
परार्थे प्राज्ञ उत्सृजेत्।
सन्निमित्ते वरं त्यागो 
विनाशे नियते सति।।३४।।

दुसऱ्याकरिता आपले धन आणि वेळ पडल्यास अगदी जीविताचाही त्याग करण्यात मागेपुढे पाहू नये. जर मरण अटळच आहे तर चांगल्या कारणासाठी केलेला त्याग श्रेष्ठच मानला पाहिजे.

A man should sacrifice his wealth or even his life itself for the sake of others. If death is the finality of life, then sacrifice made for a good cause is indeed commendable.

आलस्यं हि मनुष्याणां 
शरीरस्थो महारिपु:।
नास्त्युद्यमसमो बन्धु: 
कुर्वाणो नावसीदति।।३५।।

खरोखर आळस हा मनुष्याच्या शरीरातील मोठा शत्रू आहे. उद्योगासारखा मनुष्याचा बंधू नाही. जो प्रयत्न करतो तो कधीच नाश पावत नाही. 

Laziness is a very great foe residing in the body of man. There is no relative like the effort. He who does the effort, never gets destroyed.

विवादो धनसम्बन्धो 
याचनं चातिभाषणम्।
आदानमग्रत: स्थानं 
मैत्रीभङ्गस्य हेतव:।।३६।।

वाद घालणे, पैशाची देवघेव, उसने मागणे, मर्यादा सोडून बोलणे, सर्व गोष्टी मित्राकडून सतत घेत राहणे आणि मित्राच्या पुढे जाण्याची इच्छा ही मैत्री तुटण्याची कारणे आहेत.

Quarreling, money- relations, demanding (money etc), excessive talking, borrowing and striving to stay in the front (competition) are the causes of breaking a friendship.

व्यसने मित्रपरीक्षा 
शूरपरीक्षा रणाङ्गणे ।
विनये भृत्यपरीक्षा 
दानपरीक्षा च दुर्भिक्षे ।।३७।।

संकट काळात मित्राची परीक्षा होते, युद्धभूमीवर शूराची परीक्षा होते, नम्रतेमध्ये सेवकाची परीक्षा होते आणि दानाची परीक्षा दुष्काळात होते.

A friend is tested in the time of calamity, the test of a brave person happens in the battlefield. Humility is the test of a servant and the test of generosity takes place in the time of extreme scarcity.

प्रथमे नार्जिता विद्या
द्वितीये नार्जितं धनम्।
तृतीये नार्जितं पुण्यं
चतुर्थे किं करिष्यति ।।३८।।

आयुष्याच्या पहिल्या भागात विद्या मिळविली नाही, दुसऱ्या भागात धनार्जन केले नाही, तिसऱ्या भागात पुण्य संपादन केले नाही तर चौथ्या भागात हातून काय होणार? (माणसाचे आयुष्य शंभर वर्षे मानून त्याची ब्रह्मचर्य गृहस्थ वानप्रस्थ आणि संन्यास या चार आश्रमांमध्ये विभागणी केलेली आहे.) 

Knowledge was not gained during the first part of life, nor was wealth attained in the second, nor was any merit procured in the third by virtuous deeds then in the last fourth part what can be accomplished? ( Life is divided into four parts viz Brahmacharya, Grihastha, Vanaprastha and Sannyasa.)

काव्यशास्त्रविनोदेन 
कालो गच्छति धीमताम्।
व्यसनेन तु मूर्खाणां 
निद्रया कलहेन वा।।३९।।

बुद्धिमान माणसांचा काळ, काव्य, शास्त्र आणि तत्संबद्ध करमणुकीमध्ये जातो. मूर्ख माणसे मात्र आपला वेळ व्यसने, झोप आणि भांडणे यात घालवत असतात.

The intelligent spend their time in poetry, studying the scriptures and the entertainment related to these. Whereas the low-witted while away their time in addictions , sleeping and quarreling. 

वनानि दहतो वह्ने: 
सखा भवति मारुत:।
स एव दीपनाशाय 
कृशे कस्यास्ति सौहृदम्।।४०।।

अग्नी वनांना जाळू लागला म्हणजे वारा त्याचा मित्र बनतो (आणि त्याला वनं जाळायला मदत करतो.) पण तोच वारा इवल्याशा दिव्याच्या ज्योतीचा नाश होण्यास कारणीभूत होतो. खरंच दुबळ्याशी कोण बरे मैत्री करेल?

When fire burns forests, the wind becomes the friend of the fire. That same wind causes the extinguishing of the fire in a lamp. Whosoever is the friend of the weak?
श्लोक ऐका--गायिका कु.परिज्ञा पुरी
⬇ फाईल डाउनलोड करा (Download MP3)
अपि स्वर्णमयी लङ्का 
न मे लक्ष्मण रोचते।
जननी जन्मभूमिश्च 
स्वर्गादपि गरीयसी।।४१॥

(राम लक्ष्मणाला म्हणतात) जरी लंका सोन्याची असली तरीही ती मला आवडत नाही. कारण आपली आई आणि जन्मभूमी ही स्वर्गाहूनही श्रेष्ठ असते.
(Ram says to Laxman) Even if Lanka is made of gold, I don’t like it. For our own mother and the motherland are greater than even heaven.

संसारकटुवृक्षस्य 
द्वे फले अमृतोपमे।
सुभाषितरसास्वाद: 
सङ्गति: सुजनै: सह।।४२।।

संसाररूपी वृक्ष कडू असला तरी त्याची दोन फळे मात्र खरंच अमृतासमान आहेत ती म्हणजे-- सुभाषितांच्या रसाचे आस्वादन आणि सज्जनांचा सहवास.

Only two fruits of the otherwise bitter tasting tree called the world are comparable to the nectar viz. the enjoyment derived from learning subhashitas and the company of good people.

सुखार्थी चेत् त्यजेद्विद्यां 
विद्यार्थी चेत् त्यजेत्सुखम्।
सुखार्थिन: कुतो विद्या 
कुतो विद्यार्थिन: सुखम्।।४३।।

सुखाची इच्छा असेल तर विद्येचा त्याग करावा लागेल आणि विद्या हवी असेल तर सुखावर पाणी सोडावं लागेल. कारण सुखार्थी लोकांना विद्या कशी मिळेल ? आणि विद्येची इच्छा करणाऱ्यांना सुख कसे मिळेल?

If one wants indulgence, they should forget learning. If one wants to attain knowledge, one should let go of indulgence. For those who want indulgence, how can learning be possible? And for those who want to attain knowledge, how can they  indulge themselves?

अञ्जलिस्थानि पुष्पाणि 
वासयन्ति करद्वयम् । 
अहो सुमनसां प्रीतिः 
वामदक्षिणयोः समा।।४४।।

ओंजळीत घेतलेली फुले दोन्ही हातांना सारख्याच प्रमाणात सुगंधित करतात. त्याचप्रमाणे सज्जनांचे डाव्या आणि उजव्या– दोन्ही प्रकारच्या माणसांवर सारखेच प्रेम असते.

The flowers placed in the cupped hands make both the hands fragrant alike. Even so, the kind hearted people are affectionate towards the virtuous and the not-so-virtuous people alike.

यथा चित्तं तथा वाचो 
यथा वाचस्तथा क्रियाः । 
चित्ते वाचि क्रियायां च
साधूनामेकरूपता।।४५।।

सज्जन माणसाच्या जसे मनात असते तसेच वाणीमध्ये उतरते आणि जसे वाणीत असते तशीच त्याची कृती घडते. सज्जन माणसांच्या ठिकाणी अशा प्रकारे मन, वाणी आणि कृती या सर्वांची एकरूपता दिसून येते.

Just as is their mind, so also is their speech and just as they speak so also is their action.Thus the virtuous people show unity in their mind, speech and action.

षड्रसा: पुरुषेणेह 
भोक्तव्या बलमिच्छता।
अम्लस्तिक्त: कषायश्च 
मधुरो लवण: कटु:।।४६।।

या जगात बलाची इच्छा करणाऱ्या माणसाने आंबट, कडू, तुरट, गोड, खारट आणि तिखट या सहा रसांचे सेवन केले पाहिजे.

The person who is desirous of strength in this world should eat food containing all the six tastes viz. sour, bitter, astringent, sweet, salty and pungent.

ज्ञानतृष्णा गुरौ निष्ठा 
सदाध्ययनदक्षता । 
एकाग्रता महत्त्वेच्छा
विद्यार्थिगुणपञ्चकम्।।४७।।

ज्ञानाची तहान, गुरूवरील निष्ठा, शिकण्यामध्ये नेहमी तत्परता, एकाग्रता आणि मोठे बनण्याची इच्छा ही विद्यार्थ्याची पाच लक्षणे आहेत.

Thirst for knowledge, faith in the Guru, always being alert while learning, concentration and ambition are the five characteristics of the student.

काकदृष्टिर्बकध्यानं 
श्वाननिद्रा तथैव च । 
अल्पाहारी गृहत्यागी  
पञ्च विद्यार्थिनां गुणाः।।४८।।

कावळ्यासारखी तीक्ष्ण नजर, (शिकण्याच्या संधीचा शोध घेणे) बगळ्यासारखे ध्यान करणे (शिकताना एकाग्र होणे) कुत्र्याप्रमाणे हलकी झोप (झोपेत कालापव्यय होऊ न देणे) अल्प आहार घेणे आणि घराचा त्याग करणे (घराविषयी आसक्त होऊन न राहणे) हे विद्यार्थ्याचे पाच गुण आहेत.

The sight of the crow (always looking for an opportunity to learn) , concentration like the heron, sleeping lightly like the dog, eating frugally and giving up the attachment to home are the five virtues of the student.
 
पादौ हस्तौ जानुनी द्वे 
वक्षश्चाथ ललाटकम्।
अष्टाङ्गेन स्पृशेद्भूमिं 
साष्टाङ्गप्रणतिश्च सा।।४९।।

दोन पाय, दोन हात,दोन गुडघे, छाती आणि कपाळ या शरीराच्या आठ अंगांनी जमिनीस स्पर्श करावा म्हणजे तो साष्टाङ्ग नमस्कार होतो.

Two feet, two hands, two knees, the chest and also the forehead-- with these eight parts of the body one should touch the ground. It is called salutation with eight parts of the body.

अन्यायोपार्जितं द्रव्यं 
दश वर्षाणि तिष्ठति।
प्राप्ते चैकादशे वर्षे 
समूलं तद्विनश्यति।।५०।।

अन्यायाने मिळवलेले धन दहा वर्षापर्यंत टिकते आणि अकरावे वर्ष सुरू झाले की मुळापासून नष्ट होते.

The wealth acquired by unscrupulous means remains for ten years. But when it reaches the eleventh year, it gets completely destroyed.
हे पान शेअर करा
QR Code