श्लोक ५१ ते ७०

श्लोक ऐका--गायिका कु.परिज्ञा पुरी
⬇ फाईल डाउनलोड करा (Download MP3)
आदानस्य प्रदानस्य 
कर्तव्यस्य च कर्मणः । 
क्षिप्रमक्रियमाणस्य 
कालः पिबति तद्रसम्।।५१।।

देण्या-घेण्याचे व्यवहार तसेच आपले कर्तव्यकर्म हे जर वेळीच केले नाही तर काळ त्याचे औचित्य नाहीसे करून टाकतो.

If the acts of giving and accepting, as also one’s own duties are not done fast, time consumes away their appropriateness.

चिन्तनीया हि विपदाम्
आदावेव प्रतिक्रिया । 
न कूपखननं युक्तं 
प्रदीप्ते वह्निना गृहे।।५२।।

पुढे येणाऱ्या संकटाच्या प्रतीकाराच्या उपायाचे आधीच चिंतन केले पाहिजे. घराला आग लागल्यावर पाण्यासाठी विहीर खणणे योग्य नसते.

One should think of the means of obviating calamities before they strike. It is not appropriate to dig a well when one’s house has caught fire.

अभ्यासेन क्रियाः सर्वा: 
अभ्यासात् सकलाः कलाः । 
अभ्यासात् ध्यानमौनादि 
किमभ्यासस्य दुष्करम्।।५३।।

अभ्यासाने सर्व क्रिया करता येतात, कला आत्मसात होतात, ध्यान साधते आणि मौनही आचरता येते.अभ्यासाने साधणार नाही अशी कोणती गोष्ट आहे?

With practice one can do any act, acquire any art, do meditation or observe complete silence. What is there that can’t be achieved by practice?

विषादप्यमृतं ग्राह्यं
बालादपि सुभाषितम्।
अमित्रादपि सद्वृत्तम्
अमेध्यादपि काञ्चनम्।।५४।।

विषामधूनही अमृत स्वीकारावे; लहान मुलाकडून / अज्ञानी माणसाकडूनही उत्तम वचन स्वीकारावे; शत्रूकडूनही सदाचार शिकावा; घाणीत पडलेले असले तरी सोने उचलून घ्यावे.

Nectar should be taken out even if it lies in poison. A good saying should be accepted even from a child / dim witted person. Good conduct should be learnt even from the enemy. Gold lying even in filth should be accepted.
 
न प्रहृष्यति सन्माने 
नापमाने च कुप्यति।
न क्रुद्ध: परुषं ब्रूयात्  
स वै साधूत्तम: स्मृत:॥५५।।

जो सन्मान झाल्याने आनंदून जात नाही, आणि अपमानाने रागवत नाही; जो क्रुद्ध होऊन कठोर वचने बोलत नाही तोच उत्तम सज्जन होय असे म्हणतात.

He who doesn't feel overly happy if he is honoured, who doesn't get angry upon being insulted and never utters harsh words because of anger is said to be an excellent gentleman.

कीटोऽपि सुमन:सङ्गात् 
आरोहति सतां शिर:।
अश्मापि याति देवत्वं 
महद्भि: सुप्रतिष्ठित:।। ५६।।

फुलांच्या संगतीत राहिल्याने क्षुद्र अशा कीटकालाही सज्जनांच्या मस्तकावर आरूढ होण्याचे भाग्य मिळते. महाजनांनी चांगल्या रीतीने प्राणप्रतिष्ठा केलेल्या दगडालाही देवपण प्राप्त होते. (असा सत्सङ्गतीचा महिमा आहे)

An insect also ascends the head of the righteous people by its association with the flowers. A stone also is deified when it is consecrated by the great people.(Such is impact of the association with the good people) 

तृणानि भूमिरुदकं 
वाक्चतुर्थी च सूनृता । 
एतान्यपि सतां गेहे 
नोच्छिद्यन्ते कदाचन।।५७।।

तृणाचे आसन, बसण्यासाठी,  जागा,पाणी आणि चौथी गोष्ट म्हणजे मंगल आणि सत्य वाणी या गोष्टींची सज्जनांच्या घरामध्ये कधीही कमतरता असत नाही.

The seat made of grass, a place for lying down, water, and the fourth namely benedictory speech– these are never in short supply in the house of a noble person.

सङ्ग: सर्वात्मना त्याज्य: 
स चेत्त्यक्तुं न शक्यते।
स सद्भि: सह कर्तव्य: 
सन्त: सङ्गस्य भेषजम्।।५८।।

आसक्ती सर्वथा टाळली पाहिजे पण ती जर टाळता येतच नसेल तर ती सज्जनांच्या सहवासात राहून बाळगावी. कारण संतांचा सहवास हे आसक्तीवरचे रामबाण औषध आहे.

Attachment should be avoided by all means. But if one can not  avoid it completely then it should be borne in the accompaniment of the virtuous people. For the company of the good people is a potent medicine for attachment.

पुस्तकस्था तु या विद्या 
परहस्तगतं धनम्।
कार्यकाले समुत्पन्ने 
न सा विद्या न तद्धनम्।।५९।।

पुस्तकात शिरून बसलेली विद्या आणि परक्याच्या हातात असलेले धन हे दोन्हीही कामाची वेळ आल्यावर उपयोगास येत नाही.

The knowledge which is contained only in the books and wealth which is in the hands of (in the possession of ) others is useless when the time of work arises.

विद्वत्वं च नृपत्वं च 
नैव तुल्यं कदाचन।
स्वदेशे पूज्यते राजा 
विद्वान् सर्वत्र पूज्यते।।६०।।

विद्वत्ता व राजेपणा यांची तुलना कधीही होऊ शकत नाही.राजा हा त्याच्या राज्यात वंदनीय असतो परंतु विद्वान् व्यक्ती तिच्या ज्ञानाच्या सामर्थ्याने सर्व जगात वंदनीय असते. 

Erudition and kingliness are never comparable with each other; for a king is honoured in his own country whereas a learned man is honoured everywhere.
श्लोक ऐका--गायिका कु.परिज्ञा पुरी
⬇ फाईल डाउनलोड करा (Download MP3)
गौरवं प्राप्यते दानात् 
न तु वित्तस्य सञ्चयात् । 
स्थितिरुच्चैः पयोदानां 
पयोधीनामधः स्थितिः।।६१।।

दान केल्यानेच गौरव प्राप्त होतो; पैसा साठवून ठेवल्याने नाही. पहा– पाणी देणारे मेघ आकाशात उंच ठिकाणी असतात तर ते साठवून ठेवणारा समुद्र नेहमी खाली असतो.
Greatness is attained by charity and not by accumulating wealth. See– the clouds which give  water are high up in the sky but the ocean which accumulates water is below on the ground.

साधूनां दर्शनं पुण्यं 
तीर्थेभ्य: साधवो वरम्।
कालेन फलते तीर्थं 
सद्य: साधुसमागम:।।६२।।

साधूंचे दर्शन श्रेष्ठ आहे. तीर्थांपेक्षा साधु श्रेष्ठ आहेत कारण तीर्थाटनाचे फळ काही काळाने  मिळते परंतु साधूंच्या सत्संगाचे फळ लगेचच प्राप्त होते.

Meeting with the righteous people is meritorious. The good people are even better than the sacred places, as the sacred places confer merit after the passage of a certain time whereas living with the righteous fructifies instantly.

वित्तं बन्धु: वय: कर्म 
विद्या भवति पञ्चमी।
एतानि मान्यस्थानानि 
गरीयो यद्यदुत्तरम्।।६३।।

धनसम्पत्ती, नातलग, वय, कर्म आणि पाचवी विद्या या मान देण्याच्या गोष्टी आहेत. यामध्येही प्रत्येक नंतरची गोष्ट आधीच्या गोष्टीपेक्षा श्रेष्ठ असते. (केवळ धनापेक्षा ज्याला मोठे नातलग आहेत त्याला अधिक मान; त्याच्यापेक्षाही वयाने ज्येष्ठ असणाऱ्याला, त्याहीपेक्षा कर्माने मोठ्या झालेल्या आणि त्याच्यापेक्षा ज्ञानी माणसाला अधिक मान असतो)

Wealth, relatives, age, actions and knowledge are the five things to be respected. Of these, the thing which comes afterwards is more respectable than the preceding one. (The  person who has many relatives is more respectable than the one who has mere wealth and so on)

प्रियवाक्यप्रदानेन 
सर्वे तुष्यन्ति जन्तवः । 
तस्मात् तदेव वक्तव्यं 
वचने किं दरिद्रता।।६४।।

गोड बोलण्याने सर्व जीवांना संतोष लाभतो. म्हणून तसेच बोलावे. बोलण्यात दारिद्र्य कशाला?

Talking sweetly to all beings gives happiness to them. Therefore one should always talk sweetly. Why show paucity in speech?

नमन्ति फलिनो वृक्षाः 
नमन्ति गुणिनो जनाः । 
शुष्कवृक्षाश्च मूर्खाश्च 
न नमन्ति कदाचन।।६५।।

फळभार धारण करणारे वृक्ष खाली झुकतात. गुणी लोकही नम्र असतात. वाळलेली झाडे आणि मूर्ख माणसे यांना मात्र कधी आदरानं खाली झुकणं माहीत नसतं.

The trees laden with fruit bow down, so do the virtuous people also. The dried out trees and the dim-witted never bow to others in respect.

अर्थनाशं मनस्तापं 
गृहे दुश्चरितानि च । 
वञ्चनं चापमानं च 
मतिमान्न प्रकाशयेत्।।६६।।

धनाचा नाश, झालेला मनस्ताप, घरातील चुकीची वर्तणूक, झालेली फसवणूक आणि अपमान या गोष्टी बुद्धिमान माणसाने कधीही लोकांत उघड करू नयेत.

The intelligent man should not divulge his loss of wealth, mental anguish, the bad behaviour in his own home and being deceived or disrespected by somebody.

उदये सविता रक्तः 
रक्तश्चास्तमने तथा । 
सम्पत्तौ च विपत्तौ च 
महतामेकरूपता ।।६७।।

सूर्य उगवताना तांबडा असतो आणि मावळतानाही. त्याप्रमाणेच महान लोक संपत्ती आणि विपत्तीत एकसारखेच राहतात.

The sun is red when it rises and it is red when it sets. The great persons are changeless in the times of prosperity and downfall also.

अमन्त्रमक्षरं नास्ति 
नास्ति मूलमनौषधम् । 
अयोग्यः पुरुषो नास्ति 
योजकस्तत्र दुर्लभः।।६८।।

ज्याचा मंत्र बनणार नाही असे कोणतेही अक्षर नाही; ज्याचा औषधी उपयोग नाही असे कोणतेही मूळ नाही; कोणीही मनुष्य अयोग्य असत नाही. परंतु या सर्वांची योग्य जागी योजना करणाराच अत्यंत दुर्मिळ असतो.

No letter is there which can not be used as a mantra. There is no root which doesn’t have medicinal properties. No person is absolutely incompetent. But there is always the scarcity of the one who appoints these in there proper field of work.

विसृज्य शूर्पवद्दोषान् 
गुणान् गृह्णन्ति साधव:।
दोषग्राही गुणत्यागी 
चालनीव हि दुर्जन:।।६९।।

सज्जन लोक सुपासारखं (सूप कोंडा बाजूला करून उत्तम धान्य स्वीकारते त्याप्रमाणे) दोष टाकून देऊन गुणांचा स्वीकार करतात पण दुर्जन मात्र खरोखर चाळणीप्रमाणे (चाळण जशी कोंडा घेते आणि चांगलं पीठ टाकून देते त्याप्रमाणे) गुण टाकून देऊन दोषांचाच स्वीकार करणारे असतात.

Good persons accept the good qualities and give up the bad ones just like the winnowing basket whereas the wicked persons, just like the sieve, accept the bad and give up the good things.

छायामन्यस्य कुर्वन्ति 
तिष्ठन्ति स्वयमातपे।
फलान्यपि परार्थाय 
वृक्षा: सत्पुरुषा इव।।७०।।

स्वत: उन्हात उभे राहून इतरांसाठी सावली देतात, त्यांची फळेही इतरांसाठीच असतात.असे हे वृक्ष सत्पुरुषांप्रमाणेच आहेत.

They themselves stand in the harsh sun and  make cool shade for others.Their fruits are also for the enjoyment of others. So the trees are just like the righteous people.
हे पान शेअर करा
QR Code