श्लोक ७१ ते १००

श्लोक ऐका--गायिका कु.परिज्ञा पुरी
⬇ फाईल डाउनलोड करा (Download MP3)
आयुषः क्षण एकोऽपि 
सर्वरत्नैर्न लभ्यते । 
नीयते तद् वृथा येन 
प्रमादः सुमहानहो ।।७१।।

आयुष्याचा एक क्षणदेखील सर्व रत्ने देऊनही परत मिळत नाही. म्हणून जो मनुष्य तो वाया घालवतो तो केवढी मोठी चूक करत असतो!

Even a single moment of life can’t be obtained again by paying with all the precious stones. So what a great blunder he commits who whiles away that moment.

जले तैलं खले गुह्यं 
पात्रे दानं मनागपि । 
प्राज्ञे शास्त्रं स्वयं याति 
विस्तारं वस्तुशक्तितः ।।७२।।

पाण्यामध्ये पडलेले तेल, दुष्ट माणसाला माहीत झालेली गुप्त गोष्ट, पात्र माणसाला केलेले थोडेदेखील दान आणि बुद्धिमान माणसाजवळील शास्त्रज्ञान या गोष्टी आपल्या स्वाभाविक शक्तीने आपोआपच पसरत जातात.

Oil dropped in water, the secret known to an unscrupulous person, charity done to a worthy fellow and the knowledge possessed by the intelligent person– all these go on expanding of their own accord because of their natural intrinsic force.

अस्थिरं जीवितं लोके 
अस्थिरे धनयौवने । 
अस्थिराः पुत्रदाराश्च 
धर्मकीर्तिद्वयं स्थिरम् ।।७३।।

या जगात जीवन अतिशय अस्थिर आहे. तीच गोष्ट धन, तारुण्य, पत्नी आणि मुलेबाळे यांचीही आहे. फक्त धर्माचरण आणि कीर्ति या दोन गोष्टी जगात स्थिर असतात.

In this world, life, wealth, youth, children and  wife– all these are extremely transient. Only meritorious conduct and fame are the only two things which are permanent. 

षड् दोषाः पुरुषेणेह 
हातव्या भूतिमिच्छता। 
निद्रा तन्द्रा भयं क्रोधः 
आलस्यं दीर्घसूत्रता ।।७४।।

वैभवाची इच्छा करणाऱ्या माणसाने जगामध्ये या सहा गोष्टी टाळल्या पाहिजेत– अति झोप, स्वप्नाळू वृत्ती, भय, क्रोध, आळस आणि दिरंगाई.

The person who desires prosperity in this world should forsake six things – excessive sleep, daydreaming, fear, anger, lassitude and procrastination.

किमप्यस्ति स्वभावेन 
सुन्दरं वाप्यसुन्दरम् । 
यदेव रोचते यस्मै 
भवेत् तत्तस्य सुन्दरम् ।।७५।।

या जगात कोणतीही गोष्ट मूलत:च सुंदर अगर कुरूप असते का? ज्याला जे आवडते ते त्याच्यासाठी सुंदर असते.

In this world is there anything that is inherently beautiful or ugly ? Whatever the thing one likes is beautiful for him.

बलवानपि निस्तेजाः 
कस्य नोऽभिभवास्पदम् । 
निःशङ्कं दीयते लोकैः 
पश्य भस्मचये पदम् ।।७६।।

बलवान असूनही जो तेजस्विता दाखवत नाही असा मनुष्य कोणाकडून बरे अपमानित व्हायचा राहील? पहा आग विझून गेल्यावर थंड झालेल्या राखेच्या ढिगावर लोक नि:शंकपणे पाय देतात.

From whom the person who is strong but lacks vitality doesn't receive insults? See–after the fire is well burnt out, people put their feet in the heap of ashes without any hesitation.

लोभात्क्रोधः प्रभवति 
लोभात्कामः प्रजायते । 
लोभान्मोहश्च नाशश्च 
लोभः पापस्य कारणम् ।।७७।।

लोभापासून क्रोध जन्मतो, क्रोधापासूनच काम आणि मोह जन्मतात. त्याच्यामुळेच माणूस नाशाप्रत जातो. लोभ हेच पापाचे कारण आहे.

Greed begets anger, lust and delusion. It takes man to his own destruction. It is the root cause of sinfulness.

विद्या विवादाय धनं मदाय 
खलस्य शक्ति: परपीडनाय।
साधोस्तु सर्वं विपरीतमेतत् 
ज्ञानाय दानाय च रक्षणाय।।७८।।

दुष्ट माणसाचे ज्ञान हे वाद घालण्यासाठी, धन हे उन्मत्तपणा करण्यासाठी, तर शक्ती ही दुसऱ्यांना त्रास देण्यासाठी उपयोगाला येते. सज्जनाचे मात्र हे सर्व उलट असते-- त्याची विद्या अधिक ज्ञान मिळविण्यासाठी, धन हे दान करण्यासाठी आणि शक्ती दुबळ्यांच्या रक्षणासाठी कामी येते.

The knowledge of a villain is for argumentation, his wealth is for arrogance and his strength is utilised for pestering others. All this is the opposite in the case of a righteous person-- his knowledge is for acquiring more knowledge, his wealth is for giving away in charity and his strength is utilised for protecting the weak.

पिबन्ति नद्य: स्वयमेव नाम्भ: 
स्वयं न खादन्ति फलानि वृक्षा:।
धाराधरो वर्षति नात्महेतो: 
परोपकाराय सतां विभूतय:।।७९।।

नद्या स्वतःचे पाणी स्वतः पीत नाहीत. वृक्ष स्वतःच आपली फळे खात नाहीत. मेघ स्वतःसाठी पाऊस पाडत नाही. सज्जनांचे ऐश्वर्य हे नेहमी परोपकार करण्यासाठीच असते.

The rivers certainly don't drink their own water. Trees don't eat their own fruits. The clouds don't rain for any selfish purpose. The wealth of the righteous is only for helping others.

न चोरहार्यं न च राजहार्यं 
न भ्रातृभाज्यं न च भारकारि।
व्यये कृते वर्धत एव नित्यं 
विद्याधनं सर्वधनप्रधानम्।।८०।।

ज्याची चोरी होऊ शकत नाही,राजा सत्ताधारी जे धन कररूपाने घेऊ शकत नाही.जे भावंडांमध्ये विभागले जाऊ शकत नाही आणि ज्याचे ओझे होत नाही, खर्च केले असता जे सदैव वाढते, असे विद्या धन सर्व धनांमध्ये श्रेष्ठ आहे.

It is not subject to being stolen by thieves, it is not taken away by the king in the form of taxes, it need not be divided among brothers. Moreover, if it is distributed among others , it always grows. Thus among all kinds of wealth knowledge is the prime wealth.
श्लोक ऐका--गायिका कु.परिज्ञा पुरी
⬇ फाईल डाउनलोड करा (Download MP3)
पूर्वजन्मकृतं कर्म 
तद्दैवमिति कथ्यते।
तस्मात् पुरुषकारेण 
यत्नं कुर्यादतन्द्रित:।।८१।।

पूर्व जन्मात केलेल्या कर्मांना या जन्मात नशीब असे म्हणतात. म्हणून माणसाने या जन्मात आळसाचा त्याग करून पराक्रम केला पाहिजे.
The actions done in previous births are called 'fate' in the present birth. Therefore , resorting to manliness and becoming free from lassitude, a man should do the utmost efforts.

यौवनं धनसम्पत्ति: 
प्रभुत्वमविवेकिता।
एकैकमप्यनर्थाय
किमु यत्र चतुष्टयम्।।८२।।

तारुण्य, धनसंपदा, इतरांचे स्वामित्व आणि अविवेक म्हणजे चांगलं वाईट समजण्याच्या क्षमतेचा अभाव या चारांपैकी एकेक गोष्टच केवढ्यातरी अनर्थाला कारणीभूत होते. मग जर या चारही गोष्टी एकत्र आल्या तर तिथला अनर्थ काय वर्णावा?
 
Youth, wealth, authority and lack of discrimination of these four each one can singly wreck havoc. What catastrophe it will bring where all four of these are present in one place!!

धर्मार्थकाममोक्षाणां 
यस्यैकोऽपि न विद्यते।
अजागलस्तनस्यैव 
तस्य जन्म निरर्थकम् ।।८३।।

असा माणूस की ज्याने जीवनात धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चार पुरुषार्थांपैकी एकाचे ही पालन केले नाही, त्याचे जीवन बकरीच्या गळ्यापाशी लोंबणाऱ्या खोट्या स्तनाप्रमाणे निरर्थक असते

He who doesn't pursue / doesn't have even a single one of the fourfold aims of human life viz-- Dharma, Artha, Kama and Moksha, his life is futile like the wattles hanging from the throat of the she-goat.

आयु: कर्म च वित्तं च 
विद्या निधनमेव च।
पञ्चैतानि सृज्यन्ते 
गर्भस्थस्यैव देहिन:।।८४।।

आईच्या गर्भात असतानाच गर्भाची जीवन- मर्यादा,त्याची कर्तव्ये, सांपत्तिक स्थिती , विद्या आणि मृत्यू या पाच गोष्टी निश्चितपणे ठरत असतात.

Of the embodied soul, five things are certainly determined while he is residing in the mother's womb-- his life span , his duties, wealth, knowledge and  his death also.

मातृवत् परदारेषु 
परद्रव्येषु लोष्टवत्।
आत्मवत्सर्वभूतेषु 
य: पश्यति स पण्डित: ।।८५।।

जो माणूस परस्त्रीशी आईप्रमाणे व्यवहार करतो,परक्याची संपत्ती मातीच्या ढेकळाप्रमाणे तुच्छ मानतो,जो सर्व प्राणीमात्रांना स्वतःप्रमाणे मानून त्यांच्याशी व्यवहार करतो तोच खरा ज्ञानी मनुष्य होय.

He who looks upon the wife of another person as one's own mother; considers the wealth of others as worthless as a mere lump of earth and who looks upon all beings as his own Self is indeed the man of wisdom.

ईर्ष्यी घृणी त्वसन्तुष्ट: 
क्रोधनो नित्यशङ्कित:।
परभाग्योपजीवी च 
षडेते दु:खभागिन:।।८६।।

इतरांशी ईर्ष्या करणारा , त्यांचा तिरस्कार करणारा, सदैव असमाधानी असणारा, तापट स्वभावाचा, नेहमी साशंक असणारा  आणि इतरांच्या जीवावर जगणारा या सहा प्रकारच्या माणसांच्या वाट्याला नेहमी दु:खच येते.

One who is jealous, hateful, always dissatisfied, irate or always full of doubts and one who lives off on the fortune of others --these six kinds of persons are always subject to unhappiness.

माता मित्रं पिता चेति 
स्वभावात् त्रितयं हितम्।
कार्यकारणतश्चान्ये 
भवन्ति हितबुद्धय:।।८७।।

आई, वडील व मित्र हे तिघे स्वभावतःच आपले कल्याण चिंतणारे असतात.इतर सर्वजण कोणत्यातरी बाह्य कारणानेच आपले हित करण्याची इच्छा करतात.

Mother, friend and father – these three intrinsically wish for our welfare. All others are our well wishers only because of some external circumstances.
 
गुणाः सर्वत्र पूज्यन्ते 
पितृवंशो निरर्थकः। 
वासुदेवं नमस्यन्ति 
वसुदेवं न मानवाः ।।८८।।

गुणांमुळेच सर्वत्र सन्मान मिळतो, पितृवंशाला काहीही अर्थ नाही. (मोठ्या वंशात जन्म झालेला असला तरी त्याचा काहीही उपयोग नाही) पहा– लोक वासुदेवाला (कृष्णाला) नमस्कार करतात , वसुदेवाला (कृष्णाच्या वडिलांना) नाही.

Virtues are respected everywhere and not father’s high lineage. See–people bow down to Vaasudev (Krishna) and not to Vasudev, his father.

अनिष्टादिष्टलाभेऽपि 
न गतिर्जायते शुभा। 
यत्रास्ते विषसंसर्ग:
अमृतं तदपि मृत्यवे ।।८९।।

अनिष्ट मार्गाचा अवलंब करून जरी इष्ट गोष्ट प्राप्त झाली तरी तिचा परिणाम शुभ होत नाही. जसे विषाशी संपर्क आलेले अमृतदेखील मृत्यूलाच कारणीभूत होते. 

Even if one gets his desired thing using unfair means, it eventually leads to downfall. Even the nectar which is contaminated with poison leads to death only.

अलब्धमीहेद्धर्मेण 
लब्धं यत्नेन पालयेत् । 
पालितं वर्धयेन्नित्यं 
वृद्धं पात्रेषु निक्षिपेत् ।।९०।।

जे धन मिळालेले नाही ते धर्ममार्गाने मिळविण्याची इच्छा करावी. लाभलेल्या धनाचे प्रयत्नपूर्वक पालन करावे. पालन केलेल्याची धनाची नेहमी वाढ करावी आणि शेवटी वाढलेले धन पात्र मनुष्याला दान करावे.

Whatever wealth one has not obtained, one should desire to obtain it. Then one should protect what is procured. One should always try to increase this protected wealth. And the increased wealth should be given in charity to a worthy person. 
श्लोक ऐका--गायिका कु.परिज्ञा पुरी
⬇ फाईल डाउनलोड करा (Download MP3)
अन्नदानं महद्दानं 
विद्यादानं तत: परम्।
अन्नेन क्षणिका तृप्ति: 
यावज्जीवं च विद्यया।।९१।।

अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे परंतु ज्ञानदान हे त्याही पेक्षा श्रेष्ठ आहे. कारण अन्नदानाचे समाधान अल्पकाळासाठी मिळते पण ज्ञानदानामुळे मिळणारे समाधान हे जीवनाच्या अंतापर्यंत टिकते.

Giving away food is a great charity. Still greater charity is giving away knowledge. For the satisfaction gained by food is only momentary whereas that which is attained by knowledge is as long as life lasts.

यथा ह्येकेन चक्रेण 
रथस्य न गतिर्भवेत्।
तथा पुरुषकारेण 
विना दैवं न सिध्यति।।९२।।

जसा रथ एका चाकाने चालू शकत नाही, तसेच माणसाच्या प्रयत्नांशिवाय नुसते दैव फळ देत नाही.

Just as a chariot can’t run on a single wheel, even so, destiny can’t  give good fruits without the efforts of man.

आशा नाम मनुष्याणां 
काचिदाश्चर्यशृङ्खला । 
यया बद्धाः प्रधावन्ति 
मुक्तास्तिष्ठन्ति पङ्गुवत्।।९३।।

आशा नावाची माणसांकडे असणारी एक मोठी आश्चर्यकारक साखळी आहे, की जिने बांधलेली माणसं सतत धावत राहतात आणि तिच्यातून मुक्त झालेली पंगू माणसाप्रमाणे एकाच जागी बसून राहतात.

Hope is a very wonderous chain of man. Those who are bound by it are always running whereas those who are free from it remain stationary like the lame.

माता शत्रु: पिता वैरी 
येन बालो न पाठित:।
न शोभते सभामध्ये 
हंसमध्ये बको यथा।।९४।।

जे आई वडील आपल्या मुलाला शिक्षण देत नाहीत ते त्या मुलाचे शत्रूच होत. कारण ते अशिक्षित मूल शहाण्या लोकांच्या सभेत शोभून दिसत नाही, जसे हंसांच्या समूहात बगळा शोभून दिसत नाही.

The father and mother who don't educate their child are like his enemies. Because the child doesn't look good in the assembly of the wise just as a heron doesn't look good among a flock of swans.

अभिवादनशीलस्य 
नित्यं वृद्धोपसेविन:।
चत्वारि तस्य वर्धन्ते 
आयुर्विद्या यशो बलम्।।९५।।

जो विनयशील असतो आणि वृद्धांच्या सेवेत तत्पर असतो त्याचे आयुष्य,विद्या,यश आणि शक्ती उत्तरोत्तर वाढत असते.

He who is accustomed to saluting the elders and is therefore humble ; who always serves the elders, of such a person four things increase-- his life, knowledge, fame and strength.

स्वच्छन्दत्वं धनार्थित्वं 
प्रेमभावोऽथ भोगिता।
अविनीतत्वमालस्यं 
विद्याविघ्नकराणि षट् ।।९६।।

स्वैर आचरण, धनसंपत्तीचा हव्यास, भौतिक सुखांची आवड, इंद्रियलोलुपता, उद्धटपणा आणि आळस हे सहा दुर्गुण माणसाच्या विद्यार्जनामध्ये बाधा आणतात.

Libertine behaviour, greed for money, attachment, enjoyment of sensual pleasures, arrogance and lethargy are the six obstacles in the path of knowledge.

विद्या ददाति विनयं 
विनयाद्याति पात्रताम्।
पात्रत्वाद्धनमाप्नोति 
धनाद्धर्मं तत: सुखम् ।।९७।।

ज्ञान मनुष्याला नम्रता देते.नम्रतेने तो पात्र बनतो.पात्र मनुष्याला धन मिळते त्यामुळे पुढे दानादी धर्मकृत्ये करता येतात. आणि धर्मामुळे त्याला सुख मिळते.

Knowledge gives humility to man. Because of humility he becomes qualified. Because of qualification he attains wealth. Wealth makes him able to perform religious duties. And from that he attains happiness.

अजरामरवत्प्राज्ञो 
विद्यामर्थं च चिन्तयेत्।
गृहीत इव केशेषु 
मृत्युना धर्ममाचरेत्।।९८।।

मी अजरामर आहे असा विचार करून शहाण्या माणसाने विद्या व संपत्ती मिळवावी. परंतु मृत्यू जणूकाय आपले केस धरून आपणास जीवनाच्या अंताकडे ओढून नेत आहे, अशा भावनेने धर्माचे आचरण करावे.

One should think about acquiring knowledge and wealth as if one is ageless and immortal. But one should do his duties or perform meritorious deeds like one has been grabbed in the hair by Death Itself.

अनेकसंशयोच्छेदि 
परोक्षार्थस्य दर्शकम्।
सर्वस्य लोचनं शास्त्रं 
यस्य नास्त्यन्ध एव स: ।।९९।।

शास्त्रे अनेक शंकांचे निरसन करतात; दृष्टिआड असणाऱ्या अलौकिक गोष्टी स्पष्ट करुन सांगतात. ती म्हणजे सर्वांचे डोळेच होत. ती शास्त्रे ज्याला अवगत नाहीत तो माणूस आंधळ्याप्रमाणेच असतो.

The scriptures are the destroyers of many a doubt, they are like the eyes for everybody which show the things beyond the normal ken of intelligence. Therefore the person devoid of the knowledge of the scriptures is like a veritable blind.

स जातो येन जातेन 
याति वंश: समुन्नतिम्।
परिवर्तिनि संसारे 
मृत: को वा न जायते।।१००।।

ज्याच्या जन्म घेण्याने त्याच्या कुळाचा उत्कर्ष होतो त्याचाच जन्म खऱ्या अर्थाने सफल म्हंटला पाहिजे.नाहीतर या नश्वर जगात मेलेला कोणता जीव पुन्हा जन्माला येत नाही?

Only he is truly born (his birth is meaningful) by whose birth (by his doings in life) his lineage attains eminence. Otherwise say which dead soul is not born again and again in this ever changing world? (According to the Hindu theory of transmigration an individual's soul, after his death, is certainly reborn in this world) 
हे पान शेअर करा
QR Code