श्लोक १०१ ते १३०

श्लोक ऐका--गायिका कु.मुक्ता तोडकर
⬇ फाईल डाउनलोड करा (Download MP3)
अनुगन्तुं सतां वर्त्म
कृत्स्नं यदि न शक्यते।
स्वल्पमप्यनुगन्तव्यं 
मार्गस्थो नावसीदति।।१०१।।

सज्जनांच्या मार्गाचे पूर्णपणे अनुसरण करणे शक्य नसेल, तरी थोडे तरी अनुकरण करावे. या मार्गावर चालणारा माणूस कधीही दुःखी होत नाही.

If it is not possible to follow the path of the virtuous completely, one should follow it at least a little. One who stays on this path never comes to grief

प्रत्यहं प्रत्यवेक्षेत 
नरश्चरितमात्मनः।
किं नु मे पशुभिस्तुल्यं 
किं नु सत्पुरुषैरिति ।।१०२।।

माणसाने दररोज स्वतःच्या चरित्राचे परीक्षण करावे—माझे वागणे पशूंसारखे आहे की सत्पुरुषांसारखे?

Every day, a person should examine their own conduct—asking whether it is like that of a beast or like that of a righteous person.

सद्भिरेव सहासीत 
सद्भिः कुर्वीत सङ्गतिम्।
सद्भिर्विवादं मैत्त्रीं च 
नासद्भिः किञ्चिदाचरेत्।।१०३।।

सज्जनांसोबतच बसावे, त्यांचीच संगत करावी. वाद किंवा मैत्री सुद्धा सज्जनांशीच करावी; दुर्जनांशी कोणताही व्यवहार करू नये.

One should sit only with the virtuous and seek their company. Engage in arguments or friendship only with the good; never have any dealings with the wicked.

न द्विषन्ति न याचन्ते 
परनिन्दां न कुर्वते।
अनाहूता न चायान्ति 
तेनाश्मानोऽपि देवताः।।१०४।।

ते द्वेष करत नाहीत, काही मागत नाहीत, निंदा करत नाहीत आणि न बोलावता कुठेही जात नाहीत; म्हणूनच दगड असूनही ते देव मानले जातात.

They do not hate, they do not beg, they do not slander, and they do not go anywhere uninvited; that is why even stones are worshipped as deities.

पठतो नास्ति मूर्खत्वं 
जपतो नास्ति पातकम्।
मौनिनः कलहो नास्ति 
न भयं चास्ति जाग्रतः।।१०५।।

जो वाचतो (शिकतो) त्याला मूर्खत्व येत नाही, जो जप करतो त्याला पाप लागत नाही, जो मौन पाळतो त्याचे भांडण होत नाही आणि जो जागृत असतो त्याला भीती नसते.

There is no foolishness for one who studies, no sin for one who chants, no quarrel for one who remains silent, and no fear for one who is vigilant.

गतेऽपि वयसि ग्राह्या
विद्या सर्वात्मना बुधैः।
यद्यपि स्यान्न फलदा
सुलभा सान्यजन्मनि ।।१०६।।

वय निघून गेले तरी विद्वानांनी सर्वतोपरी विद्या ग्रहण करावी. जरी या जन्मात ती फलद्रूप झाली नाही, तरी पुढच्या जन्मात ती सहज प्राप्त होते.

Even in old age, knowledge should be acquired by the wise with all their soul. Even if it does not bear fruit in this life, it becomes easily accessible in the next birth.

सुमन्त्रिते सुविक्रान्ते
सुकृतौ सुविचारिते।
प्रारम्भे कृतबुद्धीनां
सिद्धिरव्यभिचारिणी।।१०७।।

उत्तम नियोजन, पराक्रम, कार्यकुशलता आणि सखोल विचार करून काम सुरू करणाऱ्या बुद्धिवान लोकांना यश नक्कीच मिळते.
For the wise who start a task with good counsel, great valor, efficiency, and deep reflection, success is inevitable.


नालसाः प्राप्नुवन्त्यर्थान्
न शठा न च मायिनः।
न च लोकरवाद्भीता:
न च शश्वत्प्रतीक्षिणः।।१०८।।

आळशी, लबाड, कपटी, लोकनिंदेला घाबरणारे आणि केवळ नशिबाची किंवा काळाची वाट पाहणारे लोक कधीही यश किंवा धन प्राप्त करू शकत नाहीत.

Wealth and success are not attained by the lazy, the deceitful, the treacherous, those afraid of public opinion, or those who constantly wait for fate.

विषादप्यमृतं ग्राह्यम्
अमेध्यादपि काञ्चनम्।
नीचादप्युत्तमां विद्यां
स्त्रीरत्नं दुष्कुलादपि।।१०९।।

विषातूनही अमृत (काढून) घ्यावे, घाणीतूनही सोने उचलून घ्यावे. हलक्या वृत्तीच्या माणसाकडूनही उत्तम विद्या शिकावी आणि वाईट कुळातील असली तरी गुणवान स्त्रीचा स्वीकार करावा.

Amrit (nectar) should be accepted even from poison, and gold even from filth. Supreme knowledge should be taken even from a low-born person, and a jewel-like woman even from an ignoble family.

लुब्धमर्थेन गृह्णीयात्
क्रुद्धमञ्जलिकर्मणा।
मूर्खं छन्दानुवृत्त्या च
तत्त्वार्थेन च पण्डितम्।।११०।।

लोभी माणसाला धनाने वश करावे, रागीट माणसाला हात जोडून (नम्रतेने) शांत करावे. मूर्ख माणसाला त्याच्या मर्जीप्रमाणे वागून जिंकावे आणि विद्वानाला सत्य सांगून प्रभावित करावे.

A greedy person should be won over with wealth, and an angry person by joining hands (humility). A fool should be handled by following his whims, and a wise person by telling the truth.

श्लोक ऐका--गायिका कु.मुक्ता तोडकर
⬇ फाईल डाउनलोड करा (Download MP3)
अहन्यहनि भूतानि
गच्छन्तीह यमालयम्।
शेषा: स्थिरत्वमिच्छन्ति
किमाश्चर्यमत: परम्।। १११।।    

दररोज अनेक जीव मृत्युलोकी जात असतात. तरीसुद्धा उरलेले जीव जणू काही या जगात आपलं अस्तित्व कायमस्वरुपी आहे असे समजतात यापेक्षा अधिक आश्चर्यकारक गोष्ट ती कोणती?

Everyday the embodied beings go to the abode of Yama, the god of death and what greater wonder there can be that they constantly desire stability in this world.

अहिंसा सत्यवचनं
सर्वभूतेषु चार्जवम्।
क्षमा चैवाप्रमादश्च
यस्यैते स सुखी भवेत्।।११२।।

ज्याच्या अंगी अहिंसा, खरे बोलणे, सर्व प्राणिमात्रांबद्दल कपटरहित वृत्ती , क्षमाशीलता व कर्तव्यदक्षता हे गुण असतात तो मनुष्य निश्चितपणे समाधानी राहीलच.

Non-violence, truthfulness, guileless attitude towards all beings, fortitude, and non-negligence of duties-- one who has these, will become happy in this world.

आगमानां हि सर्वेषाम्
आचार: श्रेष्ठ उच्यते।
आचारप्रभवो धर्मो
धर्मादायुर्विवर्धते।।११३।।

सर्व शास्त्रोक्त कर्तव्यांमध्ये सदाचरण हेच सर्वश्रेष्ठ आहे असे सांगितले जाते. कारण सदाचरणातूनच धर्माचरण निर्माण होते,जे मनुष्याचे आयुष्य वाढविते.

Among all scriptural duties, good conduct is said to be the most excellent because it produces religious merit which in turn certainly lengthens the span of life.

काल: कर्षति भूतानि
काल: संहरते प्रजा:।
काल: सुप्तेषु जागर्ति
कालो हि दुरतिक्रम:।।११४।।

काळ सर्व सजीवांना मृत्यूकडे ओढून नेत आहे.तोच सर्व जीवांचा नाश करतो.जेव्हा सर्व सजीव झोपलेले असतात तेव्हा तो काळच फक्त जागा असतो. काळाला बदलणे,त्यावर मात करणे अशक्य आहे.

Time drags all embodied beings towards their doom. He annihilates them. He is the one who is awake amidst all sleepers. Certainly He is impossible to transcend.

निर्गुणस्य हतं रूपं 
दुःशीलस्य हतं कुलम्।
असिद्धस्य हता विद्या 
अभोगस्य हतं धनम्॥११५।।

गुणहीन व्यक्तीच्या रूपाचा नाश होतो (रूप व्यर्थ ठरते), दुराचारी व्यक्तीचे कुळ व्यर्थ ठरते, ज्याला कौशल्य नाही त्याची विद्या नष्ट होते आणि जो उपभोग घेत नाही त्याचे धन व्यर्थ जाते.

Beauty is wasted on the virtueless; a noble lineage is ruined by bad character. Knowledge becomes meaningless without skill, and wealth is futile if it is never enjoyed.

किं कुलेन विशालेन 
विद्याहीनेन  देहिनाम्। 
दुष्कुलं चापि विदुष: 
देवैरपि हि पूज्यते॥११६।।

विद्या नसलेल्या मानवाच्या मोठ्या कुळाचा काय उपयोग? नीच कुळात जन्मलेला असला तरी विद्वान व्यक्तीची देवांकडूनही पूजा केली जाते.

What is the use of a great lineage for one who lacks knowledge? Even a person from an humble background is worshipped by the gods if they are learned.

सर्वे क्षयान्ता निचयाः 
पतनान्ताः समुच्छ्रयाः।
संयोगा विप्रयोगान्ता:
मरणान्तं च जीवितम्।।११७।।

सर्व साठ्यांचा शेवट हा क्षयात (संपण्यात) होतो, सर्व उंचावलेल्या गोष्टींचा शेवट पतनात होतो, सर्व भेटींचा शेवट विरहात होतो आणि जीवनाचा शेवट मृत्यूत होतो.

All accumulations end in exhaustion; all rises end in a fall. All unions end in separation, and life ends in death.

सुखार्थी चेत् त्यजेद्विद्यां 
विद्यार्थी चेत् त्यजेत्सुखम्।
सुखार्थिनः कुतो विद्या 
कुतो विद्यार्थिनः सुखम्॥११८।।

सुखाची इच्छा असेल तर विद्या सोडावी आणि विद्या मिळवायची असेल तर सुखाचा त्याग करावा. सुख शोधणाऱ्याला विद्या कोठून मिळणार? आणि विद्या मिळवणाऱ्याला सुख कोठून मिळणार?

If one seeks comfort, one should give up learning; if one seeks knowledge, one should give up comfort. How can a seeker of ease gain knowledge, and how can a seeker of knowledge find ease?

अभ्यासेन क्रियाः सर्वाः 
अभ्यासात् सकलाः कलाः।
अभ्यासाद् ध्यानमौनादि 
किमभ्यासस्य दुष्करम् ।।११९।।

सरावाने सर्व क्रिया साध्य होतात, सरावानेच सर्व कला आत्मसात होतात. सराव केल्याने ध्यान आणि मौन सुद्धा शक्य होते; मग सरावासाठी अशक्य असे काय आहे?

All actions are mastered through practice; all arts are perfected through practice. Even meditation and silence are achieved through practice; what indeed is impossible for practice to achieve?

अर्थनाशं मनस्तापं
गृहे दुश्चरितानि च।
वञ्चनं चापमानं च
मतिमान्न प्रकाशयेत् ।।१२०।।

​धनाचा नाश, मनाचे दुःख, घरातील दोष, फसवणूक आणि आपला झालेला अपमान; या गोष्टी बुद्धिमान माणसाने कोणासमोरही उघड करू नयेत.

A wise person should not reveal their loss of wealth, mental distress, domestic scandals, being cheated, or their own humiliation.

श्लोक ऐका--गायिका कु.परिज्ञा पुरी
⬇ फाईल डाउनलोड करा (Download MP3)
कर्मायत्तं फलं पुंसां
बुद्धि: कर्मानुसारिणी।
तथापि सुधिया भाव्यं
सुविचार्यैव कुर्वता।। १२१।।

मनुष्याच्या कर्माचे फळ हे त्या कर्मांवरच अवलंबून असते.आणि मनुष्याची बुध्दी त्याच्या गत कर्मांचा पाठपुरावा करत असते.तरी ही पूर्वकर्मांच्या फळांविषयी विचार मंथन करूनच मनुष्याने कृती करणे योग्य आहे.

The fruit of the action is dependent on the action itself. And the intellect of man always follows the (impressions left by) his past actions. Yet the intelligent man should certainly do everything only after thinking it out well. (He should not leave anything to mere chance)

वृक्षाग्रवासी न च पक्षिराज:
त्रिनेत्रधारी न च शूलपाणि:।
त्वग्वस्त्रधारी न च सिद्धयोगी
जलं च बिभ्रन्न घटो न मेघ:।।१२२।।

तो झाडाच्या शेंड्यावर राहातो पण गरुड नाही, त्याला तीन डोळे आहेत पण तो त्रिनेत्रधारी  व त्रिशूल धारण करणारा शंकर नाही.तो त्वचारुपी वल्कले धारण करतो पण योगी नाही त्याच्या मध्ये पाणी आहे पण तो ढग नाही आणि घडा ही नाही.सांगा बरे तो कोण आहे? (ही सर्व वैशिष्ट्ये नारळामध्ये असतात म्हणून या कोड्याचे उत्तर 'नारळ' आहे.)

He resides on the tee-top but he is not eagle, the king of birds; he has three eyes but he is not the trident-wielder God Shankara;he wears his skin as clothes but he is not an accomplished _yogi_; he holds water,yet he is not an earthen vessel or the cloud.(So who is he?) (All this description fits the coconut. So 'coconut' is the answer of this riddle)

अस्थि नास्ति शिरो नास्ति
बाहुरस्ति निरङ्गुलि:।
नास्ति पादद्वयं गाढम्
अङ्गमालिङ्गति स्वयम्।। १२३।।

याला हाडे नाहीत, डोके नाही.याला हात ( बाहु) आहेत पण ( त्याला) बोटेच नाहीत! त्याला (दोन) पाय ही नाहीत पण तो स्वतः च शरीराला घट्ट मिठी मारतो.सांगा बरे हा कोण? (ही सर्व वैशिष्ट्ये कोणा मनुष्याची नाहीत तर अंगात घातल्या जाणाऱ्या शर्टाची आहेत . म्हणून कोड्याचे उत्तर आहे 'युतकम् ')

It doesn't have bones nor the head.It has arms but they are fingerless. It doesn't have a pair of legs. By itself,it embraces the body tightly. (What is it?) (All these are the characteristics of 'shirt' (युतकम्).So shirt  is the answer)

अतिक्रान्तं हि यत्कार्यं
पश्चाच्चिन्तयते नर:।
तच्चास्य न भवेत्कार्यं
चिन्तया च विनश्यति।।१२४।।

योग्य वेळी न केल्या गेलेल्या कामाबद्दल मनुष्य जर नंतर चिंता करत राहील तर ते काम तर पूर्ण होणार नाहीच उलट चिंता करण्यामुळे त्याचा नाश होईल.

If a man keeps worrying afterwards about the work whose time is gone, verily the work remains unaccomplished, nay, he himself gets destroyed by his worry.

अतो हास्यतरं लोके
किञ्चिदन्यन्न विद्यते।
यत्र दुर्जनमित्याह
दुर्जन: सज्जनं स्वयम्।।१२५।।

जेव्हा एखादा दुर्जन मनुष्य एखाद्या सज्जन व्यक्तीची दुर्जन म्हणून अवहेलना करतो तेव्हा यासारखी हास्यास्पद गोष्ट जगात दुसरी कोणतीही नसते.

There is nothing more laughable in this world than this, that the villain himself calls the righteous man as   villain.

अनाहूत: प्रविशति
अपृष्टो बहु भाषते।
अविश्वस्ते विश्वसिति
मूढचेता नराधम:।।१२६।।

जिथे बोलावणे नाही अशा ठिकाणी जाणारा, विचारले नसतानाही बडबडून आपले मत मांडणारा, आणि अविश्वसनीय माणसांवर विश्वास ठेवणारा मनुष्य खरोखरच मूर्ख आणि अधम असतो.

He who enters into things without being called upon; speaks excessively without being asked; trusts the person who is not trustworthy; is truly a dim-witted and lowly fellow.

अन्यान्परिवदन्साधु:
यथा हि परितप्यते।
तथा परिवदनन्यान् 
तुष्टो भवति दुर्जन:।।१२७।।

दुसऱ्यांची निंदा करण्यात सज्जनांना जसे दुःख होते तसेच दुर्जनांना दुसऱ्यांची निंदा करण्यात आनंद वाटतो.

Just as the righteous person feels pain while vilifying others, verily in the same manner,the villain feels satisfied while vilifying them.

अभ्यावहति कल्याणं 
विविधं वाक्सुभाषिता।
सैव दुर्भाषिता राजन्
अनर्थायोपपद्यते।।१२८।।

हे राजा! गोड शब्दांत सांगितलेली गोष्ट अनेक प्रकारे कल्याणकर होते पण तीच गोष्ट कठोर शब्दांत सांगितली तर मात्र मोठ्या अनर्थाचे कारण होऊ शकते.

O king, speech uttered in a good way entails various kinds of welfare but verily the same speech uttered in a bad way becomes the cause for disaster.

अर्थं महान्तमासाद्य
विद्यामैश्वर्यमेव वा।
विचरत्यसमुन्नद्धो
य: स पण्डित उच्यते।।१२९।।

खूप मोठ्या प्रमाणावर ऐश्वर्य आणि विद्या संपादन केल्यानंतरही ज्यांचे वर्तन अत्यंत नम्रपणाचे व सुस़स्कृतपणाचे असते त्यांना पंडित असे म्हणतात.

Even after obtaining great wealth, knowledge or prosperity he who remains devoid of haughter is verily called pundit.

अश्रद्धा परमं पापं
श्रद्धा पापप्रमोचनी।
जहाति पापं श्रद्धावान्
सर्पो जीर्णामिव त्वचम्।।१३०।।

कशावरही श्रध्दा नसणे हे मोठे पाप आहे.श्रध्दा पापांपासून मुक्ती देते.जो मनुष्य श्रद्धावान असतो तो साप ज्याप्रमाणे कात टाकतो तशी पापे टाकून देऊन मुक्त होतो.

Lack of faith (in scriptures or Guru) is a great sin. Faith is the absolver of sins. One who is faithful gives up sin just as a serpent gives up its slough.
हे पान शेअर करा
QR Code