सर्वदेवनमस्कारा:।

इयत्ता चौथीचे सर्व श्लोक प्रिंट करा

हे पान शेअर करण्यासाठी स्कॅन करा

श्लोक क्र. १०१ ते ११० (गायिका--परिज्ञा)

गणेशः--

पार्वतीनन्दनं शम्भो:
आनन्दपरिवर्धनम्।
भक्तानन्दकरं नित्यं 
मयूरेशं नमाम्यहम्॥

पार्वतीचा पुत्र असणाऱ्या, शङ्करांचा आनंद वृद्धिंगत करणाऱ्या आणि भक्तांना नेहमी आनंद देणाऱ्या मयूरेशाला मी नमस्कार करतो.

I bow down to Mayuresha, the son of Parvati, who gives happiness to his father Shankara as also to his own devotees. 

विष्णु:--

विष्णुः शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं 
विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गम् । 
लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् 
वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ।।

शांत आकृती असणाऱ्या, भुजंगावर शयन करणाऱ्या, ज्याच्या नाभीतून कमळ जन्मले आहे असा, देवांचा देव, विश्वाचा आधार, आकाशाप्रमाणे अनन्त, मेघांप्रमाणे वर्ण आणि शुभलक्षणांनी युक्त शरीर असणारा, लक्ष्मीचा पती, कमळाच्या पाकळ्यांप्रमाणे प्रमाणे सुंदर नेत्र असणारा, योग्यांना ध्यानातून ज्याचा साक्षात्कार होतो असा, संसाराचे भय नाहीसे करणारा, सर्व लोकांचा स्वामी असलेल्या विष्णूला मी नमस्कार करतो.

I bow down to Vishnu who has a peaceful posture, who is lying on the serpent,from whose navel the lotus is born, God of gods,the support of the universe, who is like the infinite sky, who has the colour of the clouds, whose body bears all auspicious signs, the spouse of Laxmi, whose eyes are beautiful like the lotus petals, whom yogis know through meditation, who dispels the fright of transmigratory existence, who is the Lord of all the worlds. 

कृष्णः--

वसुदेवसुतं देवं 
कंसचाणूरमर्दनम् ।
देवकीपरमानन्दं 
कृष्णं वन्दे जगद्गुरुम् ।।

वसुदेवाचा मुलगा असलेल्या , कंस आणि चाणूर यांचा नाश करणाऱ्या आणि देवकीला अत्यंत आनंदित करणाऱ्या जगद्गुरू कृष्णाला मी नमस्कार करतो.

I bow down to Krishna, the son of Vasudeva, who had destroyed Kamsa and Chanura, who gives immense happiness to this mother Devaki, and who is the world-teacher. 

सरस्वती--

नमस्ते शारदे देवि 
काश्मीरपुरवासिनि । 
त्वामहं प्रार्थये नित्यं 
विद्यादानं च देहि मे ।।

हे काश्मीरनिवासिनी शारदादेवी, तुला नमस्कार. मी तुझी नित्य प्रार्थना करतो की मला विद्येचे दान दे.

Oh Sharade, the dweller of Kashmir province, I bow down to thee. I always pray to thee to give me knowledge.

सूर्यः--

ध्येयः सदा सवितृमण्डलमध्यवर्ती 
नारायणः सरसिजासनसन्निविष्टः 
केयूरवान् मकरकुण्डलवान् किरीटी 
हारी हिरण्मयवपुर्धृतशङ्खचक्रः ।।

सूर्यबिंबाच्या मध्ये कमलासनावर विराजमान असलेल्या, बाजूबंद, मकरकुंडले  मुकुट आणि हार धारण केलेल्या, सुवर्णाप्रमाणे तेजस्वी शरीर असलेल्या , शङ्ख आणि चक्र धारण केलेल्या नारायणाचे नेहमी ध्यान करावे.

We should constantly meditate on Narayana who is sitting on a lotus at the center of the solar orb, wearing armlets, the makara-shaped earrings, crown, necklaces, who has a lustrous body like gold and who bears the conch and the discus in his hands.

देवी--

नमो देव्यै महादेव्यै 
शिवायै सततं नमः । 
नमः प्रकृत्यै भद्रायै 
नियताः प्रणता: स्म ताम् ।।

महादेवीला, शिवपत्नीला सतत नमस्कार. प्रकृतीला, कल्याणकारिणी अशा या देवीला नमस्कार. आमच्या बहिर्गामी इंद्रियांवर ताबा मिळवून आम्ही तिला सतत नमस्कार करत राहतो.

Again and again salutations to Mahadevi, Shiva’s consort. Salutations to prakriti, the one who is auspicious. We, with our external senses controlled , always bow down to her.

शिव:--

ध्यायेन्नित्यं महेशं रजतगिरिनिभं चारुचन्द्रावतंसं
रत्नाकल्पोज्वलाङ्गं परशुमृगवराभीतिहस्तं प्रसन्नम् । 
पद्मासीनं समन्तात् स्तुतममरगणैर्व्याघ्रकृत्तिं वसानं 
विश्वाद्यं विश्वबीजं निखिलभयहरं पञ्चवक्त्रं त्रिनेत्रम् ।।

चांदीच्या पर्वताप्रमाणे तेजस्वी, सुंदर असा चंद्ररूपी अलंकार धारण केलेल्या, रत्नांप्रमाणे उज्ज्वल शरीर असणाऱ्या, चार हातांनी परशु, मृग, वरमुद्रा आणि अभयमुद्रा धारण केलेल्या, प्रसन्नमुख, पद्मासनावर बसलेल्या, सर्व बाजूंनी देवगण ज्याची स्तुती करत आहेत अशा, व्याघ्रचर्म धारण करणाऱ्या, विश्वाचे आदिकारण आणि त्याचे बीज असणाऱ्या, सर्व भयांचा नाश करणाऱ्या, पाच मुखे आणि तीन नेत्र असणाऱ्या महेश्वराचे नेहमी ध्यान करावे.

We should always meditate on the Lord Maheshwara, whose body resembles a silver-mountain, who wears the beautiful ornament of the moon, whose body has a lustre like the gems, who bears the Parashu,the deer and the benedictory and fearlessness hand gestures with his hands, who is of a cheerful countenance, who is sitting in a lotus, who is being eulogized by the gods from all sides, wearing the tiger skin, who is the one existent before the creation and is its seed, one who dispels all fears , who has five faces with three eyes in each.