|
इयत्ता चौथीचे सर्व श्लोक प्रिंट करा |
हे पान शेअर करण्यासाठी स्कॅन करा |
श्लोक क्र. १०१ ते ११० (गायिका--परिज्ञा)
मनोबुद्ध्यहङ्कारचित्तानि नाहं
न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे ।
न च व्योम भूमिर्न तेजो न वायु:
चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् ॥१॥
न च व्योम भूमिर्न तेजो न वायु:
चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् ॥१॥
मी मन, बुद्धी, अहंकार, चित्त हे अन्त:करणचतुष्टय नाही. मी कान, जीभ, नासिका आणि नेत्र ही ज्ञानेंद्रिये नाही आणि आकाश, पृथ्वी, तेज आणि वायू ही महाभूतेही नाही. मी केवळ चैतन्य आणि आनंदरूप शिव आहे, शिवच आहे.
I’m not the fourfold inner organ viz.the mind, the intellect, the ego and the memory. Nor am I the sense organs viz the ear, the tongue, the nose and the eye. I'm Not the great elements viz the ether, the earth, the fire and the wind. I’m Shiva, Consciousness and Bliss alone.
न च प्राणसंज्ञो न वै पञ्चवायु:
न वा सप्तधातुर्न वा पञ्चकोश:।
न वाक्पाणिपादं न चोपस्थपायु
चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् ॥२॥
मी प्राण या नावाने गणला जाणारा पदार्थ नाही, प्राण, अपान, व्यान उदान, समान अशा पाच प्रकारचा वायू नाही, रस,रक्त, मांस, अस्थि, मज्जा मेद आणि शुक्र या सात प्रकारचा धातू नाही, किंवा अन्नमय, प्राणमय, मनोमय, आनंदमय आणि विज्ञानमय असा पाच प्रकारचा कोषही नाही. तोंड, हात, पाय जननेन्द्रिय आणि गुदा ही कर्मेंद्रिये म्हणजेही मी नव्हे.मी केवळ चैतन्य आणि आनंदरूप शिव आहे, शिवच आहे.
I’m not Prana or the fivefold vital air viz. Prana, Apana, Vyana, Udana and Samana,nor am I the sevenfold Dhatu viz. Rasa, Rakta, Mamsa, Asthi, Majja, Meda and Shukra.I’m not the organ of speech, hands, feet, the organs of reproduction and excretion.I’m Shiva, Consciousness and Bliss alone.
न मे द्वेषरागौ न मे लोभमोहौ
मदो नैव मे नैव मात्सर्यभावः।
न धर्मो न चार्थो न कामो न मोक्ष:
चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् ॥३॥
मला कोणतीही आसक्ती आणि द्वेष नाहीत. लोभ आणि मोह नाहीत, मद आणि मत्सरही नाही. हे षड्रिपू माझ्यात ना हीत. मला धर्म, अर्थ, काम, मोक्ष या चतुर्विध पुरुषार्थांपैकी काहीही साध्य करण्यासारखे नाही कारण मी केवळ चैतन्य आणि आनंदस्वरूप शिवच आहे.
I don’t have any of the six inner enemies viz attachment, aversion, greed, delusion, hauteur and jealousy. I don’t have any of the fourfold aims of life viz righteous duty, procurement of wealth, enjoyment and liberation.I’m Shiva, Consciousness and Bliss alone
न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं
न मन्त्रो न तीर्थं न वेदा न यज्ञाः।
अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता
चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् ॥४॥
मला पाप, पुण्य, सुख, दु:ख काहीही नाही. माझ्यासाठी कोणताही मंत्र, तीर्थ, वेद आणि यज्ञही नाहीत.मी उपभोगाची क्रिया, भोग्य पदार्थ आणि भोक्ताही नाही.कारण मी केवळ चैतन्य आणि आनंदस्वरूप शिवच आहे.
I don’t have merit or sin, happiness or unhappiness. There is no mantra, holy place, veda or sacrifice for me. I’m not the action of enjoyment, the thing enjoyed or the enjoyer. I’m Shiva, Consciousness and Bliss alone
न मे मृत्युशङ्का न मे जातिभेदः
पिता नैव मे नैव माता न जन्म।
न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्य:
चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् ॥५॥
मला मृत्यूचे भय नाही. मला कोणताही जातिभेद नाही, मला माता पिता किंवा जन्मही नाही. मला कोणीही बांधव नाही माझा कोणीही गुरू नाही आणि शिष्यही नाही.कारण मी केवळ चैतन्य आणि आनंदस्वरूप शिवच आहे.
I don't have the fear of death, nor the distinction of caste. I don’t have a mother, father nor am I ever born. I don’t have any relations, nor Guru nor disciple.I’m Shiva, Consciousness and Bliss alone
अहं निर्विकल्पो निराकाररूपो
विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणि।
सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्ध:
चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् ॥६॥
मी भेदरहित, निराकार आणि सर्व इन्द्रियांना व्यापून टाकून सर्वत्र विद्यमान असणारा आहे. मी सदैव समस्थितीत असून मला मोक्ष आणि बंध दोन्हीही नाहीत.कारण मी केवळ चैतन्य आणि आनंदस्वरूप शिवच आहे.
I’m devoid of all dualities, formless, and exist everywhere pervading all the senses. I’m always the same. I don’t have liberation or bondage.I’m Shiva, Consciousness and Bliss alone
इति श्रीमच्छङ्कराचार्यविरचितं निर्वाणषट्कं संपूर्णम् ॥
अशा प्रकारे श्रीशंकराचार्यांनी रचलेले निर्वाणषट्क पूर्ण झाले.
Thus concludes the Nirvana-shatakam composed by Shri Shankaracharya.