|
इयत्ता चौथीचे सर्व श्लोक प्रिंट करा |
हे पान शेअर करण्यासाठी स्कॅन करा |
श्लोक क्र. १०१ ते ११० (गायिका--परिज्ञा)
प्रातः स्मरामि हृदि संस्फुरदात्मतत्त्वं
सच्चित्सुखं परमहंसगतिं तुरीयम् ।
यत्स्वप्नजागरसुषुप्तिमवैति नित्यं
तद्ब्रह्म निष्कलमहं न च भूतसङ्घः ॥१॥
सच्चित्सुखं परमहंसगतिं तुरीयम् ।
यत्स्वप्नजागरसुषुप्तिमवैति नित्यं
तद्ब्रह्म निष्कलमहं न च भूतसङ्घः ॥१॥
जे सत्-चित्-आनन्दस्वरूप आहे; परमहंस संन्याशांनी प्राप्त केलेली अंतिमावस्था म्हणजेच तुरीयावस्था हे ज्याचे स्वरूप आहे; स्वप्न जागृति आणि सुषुप्ती या जीवाच्या सर्व अवस्थांना जे जाणते; त्या हृदयामध्ये स्फुरणाऱ्या आत्मतत्त्वाचे मी पहाटेच्या वेळी स्मरण करतो. मी तेच अविभाज्य ब्रह्म आहे; पंचमहाभूतांचा समुदाय म्हणजे मी नव्हे.
I remember at dawn that principle called Atman which is ever-shining in the heart, which is of the nature of the state called Turiya,attained by paramhansa sannyasins, which is always the knower of all the three states of the jiva viz the waking, dream and dreamless sleep. I’m that partless Brahman alone and not this congregation of the five elements.
प्रातर्भजामि मनसा वचसामगम्यं
वाचो विभान्ति निखिला यदनुग्रहेण ।
यन्नेति नेतिवचनैर्निगमा अवोचन्
तं देवदेवमजमच्युतमाहुरग्र्यम् ॥२॥
ज्याच्या कृपेने सर्व वाणी प्रकाशित होते परंतु स्वत: मात्र जे मनाला आणि वाणीला अगम्य आहे आणि त्यामुळे वेदांनी ज्याचे वर्णन केवळ ‘हे नाही,हे नाही,’ अशा नकारदर्शक वाक्यांनी केलेले आहे अथवा ते ज्याला देवांचाही देव, स्वरूपापासून कधीही न ढळणारा, सर्वांचा आदी असे म्हणतात त्या ब्रह्मस्वरूपाचे मी प्रात:काळी स्तवन करतो.
At dawn ,I sing the praise of That Brahman which is beyond the ken of the mind and the speech and yet by whose grace all speech shines forth; whom the Vedas describe by the statements like ‘not this, not this’ or say that It is God of gods, changeless and existing before all.
प्रातर्नमामि तमसः परमर्कवर्णं
पूर्णं सनातनपदं पुरुषोत्तमाख्यम् ।
यस्मिन्निदं जगदशेषमशेषमूर्तौ
रज्ज्वां भुजङ्गम इव प्रतिभासितं वै ॥३॥
प्रात:काळी मी अंधकाराच्या पलीकडे असलेल्या, सूर्याप्रमाणे तेजस्वी, पूर्ण, शाश्वत अशा, सर्व आकारयुक्त पदार्थ ज्याच्यामध्ये राहतात आणि त्यामुळे संपूर्ण जगत् दोरीच्या ठिकाणी भासमान होणाऱ्या सर्पाप्रमाणे ज्याच्यामध्ये प्रतिभासित होते अशा पुरुषोत्तम या नावाने ओळखल्या जाणाऱ्या पदाला नमन करतो.
At dawn l bow down to that everlasting state called Purushottama, which is beyond all darkness , brilliant like the sun and complete; who comprises all shapes and therefore in whom the whole universe without exclusion of anything, is manifest.
श्लोकत्रयमिदं पुण्यं
लोकत्रयविभूषणम् ।
प्रातःकाले पठेद्यस्तु
प्रातःकाले पठेद्यस्तु
स गच्छेत्परमं पदम् ॥४॥
तिन्ही लोकांना अलंकृत करणाऱ्या पुण्यकारक अशा या तीन श्लोकांचे जो प्रात:काळी पठन करेल तो त्या परमपदाला पोहोचेल.
At dawn, he who recites this sacred triad of shokas which are the ornament of the three worlds, attains that Highest State.
_______________________________________
गायिका-- अंजली कादरी