मधुराष्टकम्।

इयत्ता चौथीचे सर्व श्लोक प्रिंट करा

हे पान शेअर करण्यासाठी स्कॅन करा

श्लोक क्र. १०१ ते ११० (गायिका--परिज्ञा)

अधरं मधुरं वदनं मधुरं 
नयनं मधुरं हसितं मधुरम् ।
हृदयं मधुरं गमनं मधुरं 
मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥१॥

(श्रीकृष्णाचे) ओठ मधुर आहेत, मुख मधुर आहे, त्याचे डोळे, हसणं, हृदय आणि चालही मधुर आहे– माधुर्याचा अधिपती असलेल्या श्रीकृष्णाचं सर्वकाही मधुर आहे.

His lips are sweet, his face, eyes, laugh, his heart and his gait is also sweet.– Indeed everything is sweet about Krishna, the Lord of Sweetness.

वचनं मधुरं चरितं मधुरं 
वसनं मधुरं वलितं मधुरम् ।
चलितं मधुरं भ्रमितं मधुरं 
मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥२॥

त्याचं बोलणं मधुर, चरित्र मधुर, वस्त्रे मधुर आणि त्याची वळणदार आकृती, त्याचं चालणं, फिरणं मधुर आहे – माधुर्याचा अधिपती असलेल्या श्रीकृष्णाचं सर्वकाही मधुर आहे.

His speech, his character, his apparel, his comely pose, his going and wandering is also sweet.– Indeed everything is sweet about Krishna, the Lord of Sweetness.

वेणुर्मधुरो रेणुर्मधुरः 
पाणिर्मधुरः पादौ मधुरौ ।
नृत्यं मधुरं सख्यं मधुरं 
मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥३॥

त्याचा वेणू मधुर आहे, पावलांची धूळही मधुर आहे. त्याचे हात, पाय , नृत्य करणं आणि मैत्री करणंही मधुर आहे – माधुर्याचा अधिपती असलेल्या श्रीकृष्णाचं सर्वकाही मधुर आहे.

His flute is sweet, the dust of his feet, his hands and legs, his dance and his friendship is also sweet.– Indeed everything is sweet about Krishna, the Lord of Sweetness.

गीतं मधुरं पीतं मधुरं 
भुक्तं मधुरं सुप्तं मधुरम् ।
रूपं मधुरं तिलकं मधुरं 
मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥४॥

त्याचं गाणं, खाणं-पिणं, झोपणं मधुर आहे. त्याचं रूप, त्याच्या कपाळीचा तिलकही मधुरच आहे– माधुर्याचा अधिपती असलेल्या श्रीकृष्णाचं सर्वकाही मधुर आहे.

His singing, his eating and drinking, sleeping, his form, the tilak on his forehead is also sweet.– Indeed everything is sweet about Krishna, the Lord of Sweetness.

करणं मधुरं तरणं मधुरं 
हरणं मधुरं रमणं मधुरम् ।
वमितं मधुरं शमितं मधुरं 
मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥५॥

त्याचं काम करणं, त्याचं (संसाराला) तरून जाणं, (हृदय) हरण करणं आणि (लीलांमध्ये) रमणं, त्याचा अवखळपणा आणि त्याची शांतताही मधुर आहे.– माधुर्याचा अधिपती असलेल्या श्रीकृष्णाचं सर्वकाही मधुर आहे.

His working, his transcending the world, his stealing (the hearts of devotees) his indulgence in devine sport, his frolicking and his composure is also sweet – Indeed everything is sweet about Krishna, the Lord of Sweetness.

गुञ्जा मधुरा माला मधुरा 
यमुना मधुरा वीची मधुरा ।
सलिलं मधुरं कमलं मधुरं 
मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥६॥

त्यानं (अलंकार म्हणून घातलेल्या) गुञ्जा, फुलांच्या माळा, त्याची यमुना नदी, तिच्या लाटा, यमुने पाणी आणि त्यात उमलेली कमळंही मधुर आहेत.– माधुर्याचा अधिपती असलेल्या श्रीकृष्णाचं सर्वकाही मधुर आहे.

The gunja beads worn by him, his garland, the river Yamuna, the waves on her waters, the water and the lotuses in them are also sweet.– Indeed everything is sweet about Krishna, the Lord of Sweetness.

गोपी मधुरा लीला मधुरा 
युक्तं मधुरं मुक्तं मधुरम्।
दृष्टं मधुरं शिष्टं मधुरं 
मधुराधिपतेरखिलं मधुरं ॥७॥

कृष्णाच्या गोपी मधुर आहेत, त्यांच्याबरोबरची त्याची रासलीला मधुर आहे, त्याचं गोपींशी रममाण होणं आणि त्यांच्याशिवाय असणंही मधुर आहे. त्याचं पहाणं, त्याची अदबही मधुर आहे – माधुर्याचा अधिपती असलेल्या श्रीकृष्णाचं सर्वकाही मधुर आहे.

His gopis , his devine sport with them, their togetherness and also his being away from them, his look and also his humility is sweet– Indeed everything is sweet about Krishna, the Lord of Sweetness.

गोपा मधुरा गावो मधुरा 
यष्टिर्मधुरा सृष्टिर्मधुरा ।
दलितं मधुरं फलितं मधुरं 
मधुराधिपते रखिलं मधुरम् ॥८॥

त्याचे गोप आणि गायी, त्याची काठी मधुर आहे. त्याची जगन्निर्मिती, (दु:खरूपानं) त्यानं दिलेला त्रास,आणि (त्याचं मुक्तिरूप) फलितही मधुर आहे– माधुर्याचा अधिपती असलेल्या श्रीकृष्णाचं खरंच सर्वकाही मधुर आहे.

The cowherds, their cows, his staff is sweet. His whole creation is sweet. His giving us pain and the fruit of liberation thereof is also sweet – Indeed everything is sweet about Krishna, the Lord of Sweetness.
______________________________________


गायिका-- एम्. एस्. सुब्बुलक्ष्मी:।