श्लोक १११ ते १२०

श्लोक क्र. १०१ ते ११० (गायिका--मुक्ता)



अहन्यहनि भूतानि
गच्छन्तीह यमालयम्।
शेषा: स्थिरत्वमिच्छन्ति
किमाश्चर्यमत: परम्।। १११।।    

दररोज अनेक जीव मृत्युलोकी जात असतात. तरीसुद्धा उरलेले जीव जणू काही या जगात आपलं अस्तित्व कायमस्वरुपी आहे असे समजतात यापेक्षा अधिक आश्चर्यकारक गोष्ट ती कोणती?

Everyday the embodied beings go to the abode of Yama, the god of death and what greater wonder there can be that they constantly desire stability in this world.

अहिंसा सत्यवचनं
सर्वभूतेषु चार्जवम्।
क्षमा चैवाप्रमादश्च
यस्यैते स सुखी भवेत्।।११२।।

ज्याच्या अंगी अहिंसा, खरे बोलणे, सर्व प्राणिमात्रांबद्दल कपटरहित वृत्ती , क्षमाशीलता व कर्तव्यदक्षता हे गुण असतात तो मनुष्य निश्चितपणे समाधानी राहीलच.

Non-violence, truthfulness, guileless attitude towards all beings, fortitude, and non-negligence of duties-- one who has these, will become happy in this world.

आगमानां हि सर्वेषाम्
आचार: श्रेष्ठ उच्यते।
आचारप्रभवो धर्मो
धर्मादायुर्विवर्धते।।११३।।

सर्व शास्त्रोक्त कर्तव्यांमध्ये सदाचरण हेच सर्वश्रेष्ठ आहे असे सांगितले जाते. कारण सदाचरणातूनच धर्माचरण निर्माण होते,जे मनुष्याचे आयुष्य वाढविते.

Among all scriptural duties, good conduct is said to be the most excellent because it produces religious merit which in turn certainly lengthens the span of life.

काल: कर्षति भूतानि
काल: संहरते प्रजा:।
काल: सुप्तेषु जागर्ति
कालो हि दुरतिक्रम:।।११४।।

काळ सर्व सजीवांना मृत्यूकडे ओढून नेत आहे.तोच सर्व जीवांचा नाश करतो.जेव्हा सर्व सजीव झोपलेले असतात तेव्हा तो काळच फक्त जागा असतो. काळाला बदलणे,त्यावर मात करणे अशक्य आहे.

Time drags all embodied beings towards their doom. He annihilates them. He is the one who is awake amidst all sleepers. Certainly He is impossible to transcend.

नवप्रभाते निर्मलं चेतः 
स्यात् सदा प्रहृष्टता।
या प्रसन्ना मनोवृत्तिः, 
सा दिनं शुभयत्यहो॥११५।।

नव्या पहाटे मन निर्मळ असावे आणि नेहमी प्रसन्नता असावी. जी प्रसन्न मनोवृत्ती असते, ती संपूर्ण दिवस शुभ (मंगलमय) करते.

In the new dawn, the mind should be pure and always full of joy. Indeed, a cheerful mindset is what makes the entire day auspicious.

निर्गुणस्य हतं रूपं 
दुःशीलस्य हतं कुलम्।
असिद्धस्य हता विद्या 
अभोगस्य हतं धनम्॥११६।।

गुणहीन व्यक्तीच्या रूपाचा नाश होतो (रूप व्यर्थ ठरते), दुराचारी व्यक्तीचे कुळ व्यर्थ ठरते, ज्याला कौशल्य नाही त्याची विद्या नष्ट होते आणि जो उपभोग घेत नाही त्याचे धन व्यर्थ जाते.

Beauty is wasted on the virtueless; a noble lineage is ruined by bad character. Knowledge becomes meaningless without skill, and wealth is futile if it is never enjoyed.

किं कुलेन विशालेन 
विद्याहीनेन  देहिनाम्। 
दुष्कुलं चापि विदुष: 
देवैरपि हि पूज्यते॥११७।।

विद्या नसलेल्या मानवाच्या मोठ्या कुळाचा काय उपयोग? नीच कुळात जन्मलेला असला तरी विद्वान व्यक्तीची देवांकडूनही पूजा केली जाते.

What is the use of a great lineage for one who lacks knowledge? Even a person from an humble background is worshipped by the gods if they are learned.

सर्वे क्षयान्ता निचयाः 
पतनान्ताः समुच्छ्रयाः।
संयोगा विप्रयोगान्ता:
मरणान्तं च जीवितम्।।११८।।

सर्व साठ्यांचा शेवट हा क्षयात (संपण्यात) होतो, सर्व उंचावलेल्या गोष्टींचा शेवट पतनात होतो, सर्व भेटींचा शेवट विरहात होतो आणि जीवनाचा शेवट मृत्यूत होतो.

All accumulations end in exhaustion; all rises end in a fall. All unions end in separation, and life ends in death.

सुखार्थी चेत् त्यजेद्विद्यां 
विद्यार्थी चेत् त्यजेत्सुखम्।
सुखार्थिनः कुतो विद्या 
कुतो विद्यार्थिनः सुखम्॥११९।।

सुखाची इच्छा असेल तर विद्या सोडावी आणि विद्या मिळवायची असेल तर सुखाचा त्याग करावा. सुख शोधणाऱ्याला विद्या कोठून मिळणार? आणि विद्या मिळवणाऱ्याला सुख कोठून मिळणार?

If one seeks comfort, one should give up learning; if one seeks knowledge, one should give up comfort. How can a seeker of ease gain knowledge, and how can a seeker of knowledge find ease?

अभ्यासेन क्रियाः सर्वाः 
अभ्यासात् सकलाः कलाः।
अभ्यासाद् ध्यानमौनादि 
किमभ्यासस्य दुष्करम् ।।१२०।।

सरावाने सर्व क्रिया साध्य होतात, सरावानेच सर्व कला आत्मसात होतात. सराव केल्याने ध्यान आणि मौन सुद्धा शक्य होते; मग सरावासाठी अशक्य असे काय आहे?

All actions are mastered through practice; all arts are perfected through practice. Even meditation and silence are achieved through practice; what indeed is impossible for practice to achieve?


______________________________________

ध्वनिमुद्रणम्।

गायिका--कु मुक्ता तोडकर