श्लोक क्र. १०१ ते ११० (गायिका--परिज्ञा)
एते सत्पुरुषा: परार्थघटका: स्वार्थं परित्यज्य ये
सामान्यास्तु परार्थमुद्यमभृता: स्वार्थाविरोधेन ये।
तेऽमी मनुष्यराक्षसाः परहितं स्वार्थाय निघ्नन्ति ये
ये निघ्नन्ति निरर्थकं परहितं ते के न जानीमहे।।३२१।।
सामान्यास्तु परार्थमुद्यमभृता: स्वार्थाविरोधेन ये।
तेऽमी मनुष्यराक्षसाः परहितं स्वार्थाय निघ्नन्ति ये
ये निघ्नन्ति निरर्थकं परहितं ते के न जानीमहे।।३२१।।
जे स्वहिताकडे दुर्लक्ष करून इतरांच्या हितासाठी झटतात ते सत्पुरुष होत.जे स्वहिताला धक्कालागणार नही या बेताने दुसऱ्याचे हित करतात ते सामान्य लोक होत. जे स्वार्थासाठी दुसऱ्याच्या हिताला बाधा आणतात ते मनुष्यरूपी राक्षस होत.परंतु जे कोणत्याही कारणाशिवाय इतरांचे नुकसान करतात, त्याना काय म्हणावे हेच आम्हाला कळत नाही!
Those are sainty persons who are engaged in charitable work even at the expense of their own welfare. The generality are those who are engaged in benevolent actions without damaging their own good. Those are the monsters in human form who destroy other peoples' good for their own welfare. But those who destroy others' good for no reason at all , we don't know what they should be called.
य: प्रीणयेत्सुचरितै: पितरं स पुत्रो
यद्भर्तुरेव हितमिच्छति तत्कलत्रम्।
तन्मित्रमापदि सुखे च समक्रियं
यदेतत्त्रयं जगति पुण्यकृतो लभन्ते।। ३२२।।
जो आपल्या चांगल्या वर्तनाने वडिलांना समाधान देईल असा पुत्र, जी सदैव आपल्या पतीचे हित चिंतिते अशी पत्नी , जो सुख आणि दुःखाच्या काळात ही आपल्याशी एकसारखेच वागतो असा मित्र –या तीन गोष्टी जगात पुण्यवंतालाच मिळतात.
The son who pleases his father by his good behaviour, the wife who always wishes the welfare of her husband, the friend whose behaviour remains unchanged during our period of distress or happiness-- In this world, only the doers of meritorious deeds have these three things.
रत्नैर्महार्हैस्तुतुषुर्न देवा
न भेजिरे भीमविषेण भीतिम्।
सुधां विना न प्रययुर्विरामं
न निश्चितार्थाद्विरमन्ति धीरा:।। ३२३।।
समुद्र मंथन करीत असताना अनेक अमूल्य रत्ने मिळून ही देवांचे समाधान झाले नाही.मंथनातून प्राप्त झालेल्या महाभयंकर हलाहल विषाने ते घाबरले नाहीत.अमृत मिळविल्याशिवाय त्यांनी आपले प्रयत्न थांबविले नाहीत.खरोखरच धैर्यवान माणसे आपले निश्चित ध्येय गाठल्याशिवाय थांबत नाहीत.
While churning the celestial ocean the gods didn't feel satisfied even after getting the priceless jewels; they didn't get frightened by the formidable poison Halahala; before getting the nectar they didn't take any rest.Thus the courageous people never stop before achieving their goal.
उद्योगिनं पुरुषसिंहमुपैति लक्ष्मी:
दैवेन देयमिति कापुरुषा वदन्ति।
दैवं निहत्य कुरु पौरुषमात्मशक्त्या
यत्ने कृते यदि न सिध्यति कोऽत्र दोष:।।३२४।।
लक्ष्मी प्रयत्नरत अशा पराक्रमी पुरुषाजवळच राहते. नशिबात असेल तर मिळेल असे भित्रे लोक म्हणत असतात. म्हणून नशिबावर अवलंबून न राहता स्वतःच्या आत्मशक्तीवर विश्वास ठेवून प्रयत्न कर. असा प्रयत्न करूनही जर यश मिळाले नाही तर त्यात दोष तो कोणता?
The goddess of wealth stays with the lion among men who is industrious. 'Fate should give' is the rant of only the cowardly. Therefore leaving fate aside, do efforts relying on your own strength. Even after doing effort you do not succeed, then what fault will be in that?
विपदि धैर्यमथाभ्युदये क्षमा
सदसि वाक्पटुता युधि विक्रम:।
यशसि चाभिरुचिर्व्यसनं श्रुतौ
प्रकृतिसिद्धमिदं हि महात्मनाम्।।३२५।।
संकटकाळी धैर्य,उत्कर्षकाळात क्षमाशीलता , सभेमध्ये वक्तृत्व, युध्दात पराक्रम, कीर्ती प्राप्त करण्याची आवड आणि ज्ञान संपादनाचे व्यसन हा श्रेष्ठ व्यक्तींचा स्वभावच असतो.
Courage in the time of calamity, forbearance in the time of prosperity, eloquence in the assembly of men, and valour in war, interest in acquiring fame and addiction to knowledge --these tendencies are verily natural to the great people.
प्रारभ्यते न खलु विघ्नभयेन नीचै:
प्रारभ्य विघ्नविहता विरमन्ति मध्या:।
विघ्नै: पुन: पुनरपि प्रतिहन्यमाना:
प्रारब्धमुत्तमजना न परित्यजन्ति।।३२६।।
संकटे किंवा अडचणी येतील या भितीने निकृष्ट लोक कार्यास सुरुवातच करत नाहीत.मध्यम क्षमतेचे लोक कामाला प्रारंभ तर करतात,पण अडचणी आल्यावर काम अर्धवटच सोडून देतात.परंतु उत्कृष्ट लोक संकटांचे पुन्हा पुन्हा आघात होत असतानाही हाती घेतलेले काम सोडून देत नाहीत.
Fearing the calamities that may befall, the people of the lower order do not even start the work. The people of the middle order stop doing the work which they have started , after having been smitten by calamities. But the excellent people never give up what they have started, even when they are repeatedly beaten down by calamities.
निन्दन्तु नीतिनिपुणा यदि वा स्तुवन्तु
लक्ष्मी: समाविशतु गच्छतु वा यथेष्टम्।
अद्यैव वा मरणमस्तु युगान्तरे वा
न्याय्यात्पथ: प्रविचलन्ति पदं न धीरा:।।३२७।।
नीतिनिपुण लोक निंदा करोत किंवा स्तुती करोत, लक्ष्मी तिच्या इच्छेप्रमाणे त्यांच्याकडे येऊ दे अथवा जाऊ दे, मृत्यू आज होऊ दे किंवा युगाच्या शेवटी होऊ दे, धैर्यवान मनुष्याची पावले न्याय्य मार्गापासून कधीच ढळत नाहीत.
Let those who are well-versed in moral behaviour criticise or praise ; let the Goddess of wealth --Laxmi come or go as she pleases; let there be death today or at the end of the yuga, the courageous people never retract their feet from the path of righteousness.
प्रथमवसि पीतं तोयमल्पं स्मरन्त:
शिरसि निहितभारा नारिकेला नराणाम्।
ददति जलमनल्पास्वादमाजीवितान्तं
न हि कृतमुपकारं साधवो विस्मरन्ति ।।३२८।।
लहान वयात प्यालेले थोडेसेच पाणी लक्षात ठेऊन, नारळाचे वृक्ष डोक्यावर आयुष्यभर नारळांचे ओझे वाहत, स्वत:च्या जीवनाच्या अंतापर्यंत माणसांना अत्यंत चविष्ट पाणी देत राहतात. खरोखरच सज्जन लोक त्यांच्यावर कोणीही केलेले उपकार कधीही विसरत नाहीत.
Remembering the little water given to them in their formative years, the coconut trees, throughout their whole life bear the burden of coconuts on their heads and give the people very sweet water unto their last moment of life. Indeed, the noble people never forget the good acts of others towards them.
केयूरा न विभूषयन्ति पुरुषं हारा न चन्द्रोज्ज्वला
न स्नानं न विलेपनं न कुसुमं नालङ्कृता मूर्धजा:।
वाण्येका समलङ्करोति पुरुषं या संस्कृता धार्यते
क्षीयन्ते खलु भूषणानि सततं वाग्भूषणं भूषणम् ।।३२९।।
बाजूबंद, चंद्राप्रमाणे तेजस्वी अशा माळा, स्नान करणे, सुगंधित अशा चंदनादींचा लेप लावणे, फुले किंवा सजविलेली केशरचना, यामुळे पुरुषाला शोभा येत नाही. सुसंस्कृत वाणी हीच एकटी पुरुषाला खऱ्या अर्थाने अलंकृत करते. अन्य अलंकार काळानुसार झिजत जातात. परंतु सुसंस्कृत वाणी हाच माणसाचा कायम टिकणारा दागिना आहे.
Armlets, garlands which are lustrous like the moon, ablutions, anointing, flowers, or decorated hair-- these do not adorn a man. Only a refined speech adorns him in the true sense. All other ornaments are subject to erosion. The refined speech is the only true ornament.
विद्या नाम नरस्य रूपमधिकं प्रच्छ्न्नगुप्तं धनं
विद्या भोगकरी यश:सुखकरी विद्या गुरूणां गुरु:।
विद्या बन्धुजनो विदेशगमने विद्या परं दैवतं
विद्या राजसु पूज्यते न तु धनं विद्याविहीन: पशु:।।३३०।।
विद्या हे मनुष्याचे अप्रकट आणि गुप्त असे धन आहे. विद्या भोगांची प्राप्ती करून देणारी, यश आणि सुख देणारी आहे. विद्या ही गुरूंचीही गुरू आहे. परदेशात विद्या हीच आपली बांधव असते.विद्या हेच सर्वश्रेष्ठ दैवत आहे. राजदरबारात धन नव्हे तर विद्याच माणसाला सन्मान मिळवून देते. म्हणूनच अशी ही विद्या ज्याच्याजवळ नाही असा माणूस म्हणजे साक्षात पशूच होय.
Knowledge is the augmentation of a man's handsome appearance. It is his well-concealed and protected wealth. It makes one capable of enjoying life's pleasures and also gives happiness and fame. It is undoubtedly the teacher of teachers. It is the only relative of man who is travelling in a foreign land. It is the supreme deity. Only knowledge commands respect in the courts of a king and not wealth. So one who is devoid of knowledge, is a veritable brute.
______________________________________
गायिका -- कु मुक्ता तोडकर