श्रीगणपतिस्तोत्रम्।

इयत्ता चौथीचे सर्व श्लोक प्रिंट करा

हे पान शेअर करण्यासाठी स्कॅन करा

श्लोक क्र. १०१ ते ११० (गायिका--परिज्ञा)

​।। विनियोगः।।

अस्य श्री संकटनाशन गणेश स्तोत्र मंत्रस्य, नारद ऋषिः, श्री संकटनाशन विघ्नेश्वर देवता, अनुष्टुप् छन्दः, श्री लम्बोदर प्रसाद सिद्ध्यर्थे जपे विनियोगः।

​या श्री संकटनाशन गणेश स्तोत्र मंत्राचे ऋषी 'नारद' आहेत, देवता 'श्री संकटनाशन विघ्नेश्वर' आहे आणि छंद 'अनुष्टुप' आहे. श्री लंबोदराची (गणपतीची) कृपा आणि इच्छित सिद्धी प्राप्त करण्यासाठी या जपाचा विनियोग केला जातो.

​Of this Sri Sankata Nashana Ganesha Stotra mantra, Narada is the Seer (Rishi), Sri Sankata Nashana Vighneshwara is the Deity (Devata), and Anushtubh is the Meter (Chhandas). It is recited to attain the grace and blessings of Lord Lambodara.


।। स्तोत्रम्।।

नारद उवाच--

प्रणम्य शिरसा देवं 
गौरीपुत्रं विनायकम् ।। 
भक्तावासं स्मरेन्नित्यम्
आयुःकामार्थसिद्धये ।।१।।

जो भक्तांचे निवासस्थान आहे अशा पार्वतीचा पुत्र गणेशाला, डोके झुकवून नमस्कार करून दीर्घायुष्य आणि कामनांच्या सिद्धीसाठी त्याचे नेहमी स्मरण करावे.

Bowing down with the head to Vinayaka, the son of Gauri, who is the abode of his devotees, one should always remember him for the attainment of longevity and fulfilment of one’s desires.

प्रथमं वक्रतुण्डं च 
एकदन्तं द्वितीयकम् ।। 
तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं 
गजवक्त्रं चतुर्थकम् ।।२।।

त्याचे वक्रतुण्ड हे पहिले नाव , एकदन्त हे दुसरे, कृष्णपिङ्गाक्ष हे तिसरे, गजवक्त्र हे चौथै,

Vakratunda,the first of his name,  Ekadanta, the second, Krishnapingaksha, the third, Gajavaktra the fourth,

लम्बोदरं पञ्चमं च 
षष्ठं विकटमेव च ।। 
सप्तमं विघ्नराजेन्द्रं 
धूम्रवर्णं तथाष्टमम् ।।३।।

लंबोदर हे पाचवे आणि विकट हे सहावे, विघ्नराजेंद्र हे सातवे तसेच धूम्रवर्ण हे आठवे,

Lambodara, the fifth, Vikata the sixth, Vighnarajendra , the seventh as also Dhumravarna the eighth,

नवमं भालचन्द्रं च 
दशमं तु विनायकम् । 
एकादशं गणपतिं 
द्वादशं तु गजाननम् ।।४।।

भालचंद्र हे नववे, विनायक हे दहावे, गणपती हे अकरावे आणि गजानन हे बारावे,

Bhalachandra, the ninth, Vinayaka, the tenth, Ganapati, the eleventh and Gajanana,the twelfth,

द्वादशैतानि नामानि 
त्रिसन्ध्यं यः पठेन्नरः ।
न च विघ्नभयं तस्य 
सर्वसिद्धिकर: प्रभु: ।।५।।

ही गणेशाची बारा नावे त्रिकाल संध्या करताना जो मनुष्य म्हणेल त्याला विघ्नांचे भय असणार नाही, कारण गणेश सर्व सिद्धी देणारा आहे.

The man who utters these twelve names during the three Sandhya-vandanas, will never encounter the fear of calamities as this Lord is the conferer of all higher powers.


विद्यार्थी लभते विद्यां 
धनार्थी लभते धनम् ।
पुत्रार्थी लभते पुत्रान् 
मोक्षार्थी लभते गतिम् ।।६।।

विद्यार्थ्याला त्यामुळे विद्या मिळेल, धनेच्छूला धन मिळेल, पुत्रार्थी माणसा पुत्रप्राप्ती होईल आणि मुमुक्षूला मोक्षदेखील मिळेल.

The student will attain knowledge; he who desires wealth will get money; he who wants a child will get it and he who wants liberation will also attain it.  

।। फलश्रुति:।।

जपेत् गणपतिस्तोत्रं 
षड्भिर्मासैः फलं लभेत् । 
संवत्सरेण सिद्धिं च 
लभते नात्र संशयः ।।७।।

या गणपतिस्तोत्राच्या पठनाने सहा महिन्यात वांछित फळ मिळेल आणि एका वर्षात सिद्धी प्राप्त होईल याबाबतीत कोणताही संशय नाही.

If one recites this stotra for six months, he will attain its fruits. In one year this stotra will confer higher powers, there is no doubt about it.

अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च 
लिखित्वा यः समर्पयेत् । 
तस्य विद्या भवेत्सर्वा: 
गणेशस्य प्रसादतः ।।८।।

हे स्तोत्र लिहून जो आठ ब्राह्मणांना प्रदान करेल त्याला गणेशकृपेने सर्व विद्या प्राप्त होतील.

He who writes this stotra and gives it away to eight Brahmins, will please Ganesha and attain all Vidyas. 

इति श्रीनारदपुराणे सङ्कटनाशनं श्रीगणपतिस्तोत्रं सम्पूर्णम् ।

असे हे श्रीनारद पुराणातील संकटनाशक श्रीगणपतिस्तोत्र पूर्ण झाले.

Thus ends the Ganapati Stotra from the Narada Purana, which destroys all calamities.
_______________________________________


गायिका-- कु. परिज्ञा पुरी