भक्तियोग:।

इयत्ता चौथीचे सर्व श्लोक प्रिंट करा

हे पान शेअर करण्यासाठी स्कॅन करा

श्लोक क्र. १०१ ते ११० (गायिका--परिज्ञा)

 ॐ श्रीपरमात्मने नमः।

ओम्। श्रीपरमात्म्याला नमस्कार असो.

Om. Salutations to the Highest Self.

अथ द्वादशोऽध्यायः।

आता बाराव्या अध्यायाला प्रारंभ होत आहे–

Now starts the twelfth chapter.

अर्जुन उवाच–

अर्जुन म्हणाला–

Arjuna said–

एवं सततयुक्ता ये 
भक्तास्त्वां पर्युपासते । 
ये चाप्यक्षरमव्यक्तं 
तेषां के योगवित्तमाः ।।१।।

अशाप्रकारे नेहमी योगयुक्त होऊन जे भक्त तुझी उपासना करतात, आणि जे अव्यक्त अशा अविनाशी तत्त्वाची उपासना करतात, त्यांच्यापैकी सर्वोत्तम योगी कोणाला म्हणावे?

The devotees who worship Thee being always in communion with Thee and those who propitiate the Imperishable and Unmanifest aspect of Reality – of these two, which one is the more adept Yogi?

श्रीभगवानुवाच–

श्रीभगवान म्हणाले–

The Lord said–

मय्यावेश्य मनो ये 
मां नित्ययुक्ता उपासते। 
श्रद्धया परयोपेता: 
ते मे युक्ततमा मताः ।।२।।

माझ्या ठायी मनाला ठेवून, नेहमी योगयुक्त होऊन आत्यंतिक श्रद्धेने जे माझी उपासना करतात, तेच माझ्या मते सर्वश्रेष्ठ योगी होत. 

Those who worship Me with unflinching faith, keeping their mind always in me and thus being always in communion with Me, are the most adept Yogis– this is My opinion.

ये त्वक्षरमनिर्देश्यम् 
अव्यक्तं पर्युपासते। 
सर्वत्रगमचिन्त्यं च 
कूटस्थमचलं ध्रुवम् ।।३।।

परंतु जे अविनाशी असून,अमुक हेच म्हणून दाखवता येत नाही, असे जे अव्यक्त,सर्वत्र विद्यमान असलेले, अचिन्त्य, कूटस्थ, अचल आणि शाश्वत तत्त्व आहे त्या तत्त्वाची जे लोक उपासना करतात–

Those who worship the Imperishable, which can’t be designated as being such and such, the Unmanifest, All-pervading, which is beyond thought, existing at the root of the world-illusion, unmoving, and eternal–

सन्नियम्येन्द्रियग्रामं 
सर्वत्र समबुद्धयः । 
ते प्राप्नुवन्ति मामेव 
सर्वभूतहिते रताः ।।४।।

आणि त्यासाठी सर्व इंद्रियांच्या समुदायाला नियंत्रित करून, सर्वत्र समत्वबुद्धी ठेवतात आणि सर्व जीवांच्या हितासाठी झटत राहतात तेदेखील शेवटी मलाच येऊन मिळतात.

And by controlling the group of sense organs, being equal to all everywhere, and toiling for the welfare of all beings, attain Me alone. 

क्लेशोऽधिकतरस्तेषाम्
अव्यक्तासक्तचेतसाम् । 
अव्यक्ता हि गतिर्दुःखं 
देहवद्भिरवाप्यते ।।५।।

परंतु अव्यक्तामध्ये ज्यांचे मन आसक्त आहे त्यांना अधिक कष्ट सहन करावे लागतात कारण देहधारी मनुष्याला अव्यक्त तत्त्वाचा मार्ग खरोखरच कष्टानेच चोखाळता येतो.

But those whose mind is attracted to the Unmanifest, undergo hardships; because for an embodied being, forging the way in the field of the Unmanifest is always very difficult.

ये तु सर्वाणि कर्माणि 
मयि संन्यस्य मत्पराः। 
अनन्येनैव योगेन 
मां ध्यायन्त उपासते ।।६।।

परंतु जे सर्व कर्मांचा माझ्या ठायी त्याग करून, मत्परायण होऊन अनन्यभावाने  माझे ध्यान करत माझी उपासना करतात–

But those, who renouncing all actions in Me, remaining steadfast in Me, worship Me with unwavering communion,by meditating on me– 

तेषामहं समुद्धर्ता 
मृत्युसंसारसागरात्। 
भवामि न चिरात्पार्थ 
मय्यावेशितचेतसाम् ।।७।।

अशा माझ्याच ठिकाणी चित्त ठेवणाऱ्या त्या लोकांचा हे पार्थ, मी या मृत्युमय संसारसागरातून सत्वर उद्धार करतो.

Of those whose minds are thus always poised in me, I, without delay, become the saviour from this deadly transmigratory existence.

मय्येव मन आधत्स्व 
मयि बुद्धिं निवेशय। 
निवसिष्यसि मय्येव 
अत ऊर्ध्वं न संशयः ।।८।।

म्हणून तू माझ्याच ठिकाणी चित्त ठेव , माझ्याच ठिकाणी तुझी बुद्धी राहू दे म्हणजे तू मग इथून पुढे माझ्यामध्येच निवास करशील यात काहीही संशय नाही.

Therefore, keep your mind steadfast in Me, let your intelligence be directed towards Me alone. Thence forward you will reside in Me alone– there is no doubt about this.

अथ चित्तं समाधातुं 
न शक्नोषि मयि स्थिरम्। 
अभ्यासयोगेन ततो माम् 
इच्छाप्तुं धनञ्जय ।।९।।

आता अशा प्रकारे तू माझ्याठायी चित्त स्थिर ठेवण्यास समर्थ नसशील तर हे धनंजया, चित्ताला पुन्हा पुन्हा ओढून आणून माझ्याठिकाणी स्थिर करणे या अभ्यासयोगाचा आश्रय करून मला प्राप्त करण्याची इच्छा धर.

But if you are not able to keep your mind steadfast in Me, then resort to Abhyasa (repeatedly turning the mind towards Me). Thus wish to attain Me through being in communion with me through Abhyasa.

अभ्यासेऽप्यसमर्थोऽसि 
मत्कर्मपरमो भव। 
मदर्थमपि कर्माणि 
कुर्वन्सिद्धिमवाप्स्यसि ।।१०।।

असा अभ्यास करण्यासाठीही तू समर्थ नसशील तर माझ्यासाठीच सर्व कर्मे करणारा हो. माझ्यासाठी कर्मे करता करताही तुला सिद्धी मिळेल.

Then again, if you are not even able to do this Abhyasa, then be the one who performs all his acts for My sake alone. Thus doing everything for My sake, you will attain the goal of liberation.

अथैतदप्यशक्तोऽसि 
कर्तुं मद्योगमाश्रितः। 
सर्वकर्मफलत्यागं 
ततः कुरु यतात्मवान् ।।११।।‌

हे करण्यासाठीही तू अशक्त असशील तर स्वत:वर नियंत्रण ठेवून नंतर माझ्या योगाचा (कर्मयोगाचा) आश्रय घे आणि सर्व कर्मांच्या फलांचा त्याग कर. 

If you can not do even this, then resort to My-yoga (Karma-yoga) being self-controlled and then by giving up all the fruits of your actions. 

श्रेयो हि ज्ञानमभ्यासात् 
ज्ञानाद्ध्यानं विशिष्यते। 
ध्यानात्कर्मफलत्याग:
त्यागाच्छान्तिरनन्तरम् ।।१२।।

शास्त्राने होणारे ज्ञान हे नुसत्या मनाला ओढून एका ठिकाणी आणण्याच्या अभ्यासापेक्षा श्रेष्ठ आहे. या शास्त्रज्ञानापेक्षा त्या तत्त्वाचे ध्यान करणे श्रेष्ठ आहे आणि ध्यानापेक्षाही कर्मफलांचा त्याग श्रेष्ठ होय कारण त्यागाने लगेचच शांती प्राप्त होते.

Scriptural knowledge is better than mere Abhyasa, meditation is even better than scriptural knowledge, and renouncing the fruits of actions is better than meditation, for this renouncement gives peace instantly. 

अद्वेष्टा सर्वभूतानां 
मैत्रः करुण एव च । 
निर्ममो निरहङ्कारः 
समदुःखसुखः क्षमी ।।१३।।

कोणत्याही जीवाचा द्वेष न करणारा, सर्वांविषयी मैत्रीभाव आणि करुणा बाळगणारा, ममत्व आणि अहंकाररहित, सुखदु:खांना समान मानणारा, क्षमाशील–

He who does not hate any being but behaves in a friendly manner and compassionately with all, who is free from attachment and egotism, who is equanimous in happiness and sorrow, and always forgiving– 

सन्तुष्टः सततं योगी 
यतात्मा दृढनिश्चयः। 
मय्यर्पितमनोबुद्धिः 
यो मद्भक्तः स मे प्रियः ।।१४।।

नेहमी संतुष्ट राहणारा, योगपरायण, स्वत:वर नियंत्रण मिळवलेला, मला प्राप्त करण्याचा दृढनिश्चय केलेला, मलाच ज्याने मन आणि बुद्धी अर्पण केली आहे असा जो माझा भक्त तो मला प्रिय आहे.

The Karma Yogi, who is always content, self-controlled, has a firm resolve and through it has surrendered his mind and intellect to Me, such a devotee is dear to Me.

यस्मान्नोद्विजते लोको 
लोकान्नोद्विजते च यः। 
हर्षामर्षभयोद्वेगै:
मुक्तो यः स च मे प्रियः।।१५।।

ज्याच्यामुळे जगाला उद्वेग होत नाही आणि जगामुळे जो स्वत:ही संत्रस्त होत नाही असा हर्ष, क्रोध,भय आणि उद्वेग यांच्यापासून जो मुक्त असतो, तोच मला प्रिय आहे.

Because of whom the world doesn’t get perturbed, nor does he get disturbed by the world; he who is free from extreme joy, anger, fear or anxiety, is dear to me.

अनपेक्षः शुचिर्दक्ष:
उदासीनो गतव्यथः। 
सर्वारम्भपरित्यागी 
यो मद्भक्तः स मे प्रियः।।१६।।

जो अपेक्षारहित आहे; काया, वाचा मनाने जो पवित्र आहे; कर्तव्यांमध्ये दक्ष आहे; कर्मफलाच्या बाबतीत जो उदासीन आहे; ज्याच्या सर्व मानसिक पीडा नष्ट झाल्या आहेत ; मनाच्या संकल्प-विकल्पाने होणाऱ्या सर्व प्रकारच्या काम्य कर्मांचा ज्याने त्याग केला आहे; असा जो माझा भक्त, तो मला प्रिय आहे. 

One who has no desire,is pure, dutiful, dispassionate and free of mental pain, who has renounced the initiative behind the commencement of all actions– such a devotee is beloved to me.

यो न हृष्यति न द्वेष्टि 
न शोचति न काङ्क्षति। 
शुभाशुभपरित्यागी 
भक्तिमान्यः स मे प्रियः।।१७।।

जो कशानेही अत्यानंदित होत नाही आणि कोणाचाही द्वेष करत नाही; जो शोक करत नाही आणि कशाचीच इच्छा करत नाही; ज्याने शुभ आणि अशुभ या संकल्पनाच मनातून काढून टाकल्या आहेत असा जो भक्तिमान मनुष्य, तो मला प्रिय आहे.

One who doesn’t get extremely happy over something, or doesn’t hate anything, nor does he deplore about or covet anything; who has renounced the notions of good and bad, who is full of devotion is dear to me.

समः शत्रौ च मित्रे च 
तथा मानापमानयोः। 
शीतोष्णसुखदुःखेषु 
समः सङ्गविवर्जितः।।१८।।

शत्रू आणि मित्र, मान आणि अपमान शीत आणि उष्ण, सुख आणि दु:ख या सर्वांबाबत जो सम बुद्धी बाळगतो ; जो आसक्तिरहित आहे—

One who is equal to friend and foe, as also to honour and dishonour, heat and cold, happiness and sorrow, who is free from attachment–

तुल्यनिन्दास्तुतिर्मौनी 
सन्तुष्टो येन केनचित्। 
अनिकेतः स्थिरमति:
भक्तिमान्मे प्रियो नरः।।१९।।

जो निंदा-स्तुती समान मानतो; मौन धारण करतो; जे काही मिळेल त्यातच संतुष्ट असतो; कोणत्याही आश्रयाविना राहतो; ज्याची बुद्धी स्थिर आहे  असा भक्तिमान मनुष्य मला प्रिय आहे.

Behaves equanimously in the instances of calumny and praise, observes silence, is content with whatever he gets, has no fixed abode, and whose intellect is unwavering, that person full of devotion is dear to me.

ये तु धर्म्यामृतमिदं 
यथोक्तं पर्युपासते। 
श्रद्दधाना मत्परमा 
भक्तास्तेऽतीव मे प्रियाः।।२०।।

जे भक्त या धर्मरूपी अमृताचे मी सांगितल्याप्रमाणे अनुष्ठान करतात; ते सश्रद्ध आणि मत्परायण असणारे भक्त आहेत, ते मला अत्यंत प्रिय आहेत.

Those devotees who are full of faith and have Me as their goal, and who practice this nectarine-preaching conducive to religious merit, as has been said by Me, are indeed very dear to me.

ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे भक्तियोगो नाम द्वादशोऽध्यायः।

ओम् तत् सत्। अशाप्रकारे श्रीमद्भगवद्गीतारूप उपनिषदातील ब्रह्मविद्यान्तर्गत योगशास्त्र या विषयावरील कृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादामधला ‘भक्तियोग’ नावाचा बारावा अध्याय पूर्ण झाला.

Om tat sat. Now is complete the twelfth chapter of the Upanishad called Shrimad-bhagavad-geeta, which delineates the Yogashastra under the subject of the knowledge of Brahman, in the form of dialogue between Arjuna and Shri Krishna.