पुरुषोत्तमयोग:।

इयत्ता चौथीचे सर्व श्लोक प्रिंट करा

हे पान शेअर करण्यासाठी स्कॅन करा

श्लोक क्र. १०१ ते ११० (गायिका--परिज्ञा)

 ॐ श्रीपरमात्मने नमः।

ओम्। श्रीपरमात्म्याला नमस्कार असो.

Om. Salutations to the Highest Self.

अथ पञ्चदशोऽध्यायः।

आता पंधराव्या अध्यायाला प्रारंभ होत आहे–

Now starts the fifteenth chapter.

श्रीभगवान् उवाच–

श्री भगवान म्हणाले–

Thus said the Lord–

ऊर्ध्वमूलमधःशाखम् 
अश्वत्थं प्राहुरव्ययम्। 
छन्दांसि यस्य पर्णानि 
यस्तं वेद स वेदवित् ।।१।।

मुळे वरच्या बाजूला (ब्रह्मलोकापर्यंत) आणि फांद्या खाली (पाताळलोकापर्यंत) असलेला ज्याची पाने म्हणजे वेदमंत्र आहेत असा, हा अविनाशी असा (संसाररूपी) अश्वत्थवृक्ष आहे कसे म्हणतात.

It is said that the tree of this transmigratory existence is imperishable and has its roots upwards (upto the  Brahmaloka) and branches downwards (reaching the Patala). The mantras of the Veda are its leaves. He who knows this tree is the knower of the Veda.

अधश्चोर्ध्वं प्रसृतास्तस्य शाखा
गुणप्रवृद्धा विषयप्रवालाः। 
अधश्च मूलान्यनुसन्ततानि 
कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके ।।२।।

त्या अश्वत्थाच्या सत्त्व ,रज , तम या गुणांनी वाढलेल्या, इन्द्रियांचे विषय हेच ज्यांचे कोंब आहे अशा शाखा खाली आणि वरही पसरलेल्या आहेत आणि त्याची मुळे खाली मनुष्यलोकातदेखील विस्तारलेली आहेत, जी जीवाला त्याच्या कर्माचे अनुसरण करत या जगाशी बांधतात.

The branches of that tree are spread above and below also. They are nourished by the three gunas of prakriti and have shoots in the form of sense objects. Its roots are also spread downwards  in the Martya Loka and bind the jivas following their karma. 

न रूपमस्येह तथोपलभ्यते 
नान्तो न चादिर्न च सम्प्रतिष्ठा। 
अश्वत्थमेनं सुविरूढमूलम् 
असङ्गशस्त्रेण दृढेन छित्त्वा ।।३।।

या वृक्षाचे असले हे रूप मनुष्यलोकी राहणाऱ्याच्या दृष्टिक्षेपात येत नाही. त्याचा आदी, अन्त आणि तो वृक्ष कशावर आधारलेला आहे हेही समजत नाही. अतिशय घट्ट मुळे असणाऱ्या या वृक्षाला अनासक्तिरूप बलशाली शस्त्राने छेदून–

In this loka, no one can comprehend its image as such. Nor can one find its beginning or end. By cutting this deep rooted Ashvattha, with the sharp weapon of non attachment–

ततः पदं तत्परिमार्गितव्यं 
यस्मिन्नगता न निवर्तन्ति भूयः। 
तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये 
यतः प्रवृत्तिः प्रसृता पुराणी ।।४।।

नंतर ‘मी त्याच आदिपुरुषाला शरण जातो की ज्याच्यापासून ही अनादि कर्मप्रवृत्ती निर्माण झाली आहे.’ या भावनेने त्या पदाचा शोध घ्यावा की जिथे पोहोचल्यावर जीव या जगात पुन्हा परत येत नाही. 

And then with the resolve, ‘I must reach that pirusha from whom this primordial inclination to act has come forth,’ one must seek that state reaching which the jivas don’t come back to this world.

निर्मानमोहा जितसङ्ग‌दोषा 
अध्यात्मनित्या विनिवृत्तकामाः । 
द्वन्द्वैर्विमुक्ताः सुखदुःखसंज्ञैः 
गच्छन्त्यमूढाः पदमव्ययं तत् ।।५।।

ज्यांचा जगाविषयीचा मोह नष्ट झाला आहे, ज्यांनी आसक्तीचा दोष जिंकला आहे, जे नेहमी आत्मपरायण आहेत, ज्यांच्या सर्व कामना नष्ट झाल्या आहेत, जे सुख आणि दु:ख ही नावे असणाऱ्या द्वन्द्वांपासून मुक्त झाले आहेत, ते बुद्धिमान लोक त्या अविनाशी पदापर्यंत पोहोचतात.

Those intelligent persons, who are free from conceit and delusion,who have conquered the failing of attachment, always given to spirituality,  whose desires have vanished, who are devoid of dualities called joys and sorrows, reach that immutable state.

न तद्भासयते सूर्यो 
न शशा‌ङ्को न पावकः। 
यद्गत्वा न निवर्तन्ते 
तद्धाम परमं मम ।।६ ।।

ज्या पदाला पोहोचल्यावर जीव या जगात माघारी येत नाही; त्या पदाला (ते स्वयंप्रकाश असल्याने) सूर्य,चंद्र किंवा अग्नी प्रकाशित करत नाही. तेच माझे श्रेष्ठ धाम आहे.

Reaching which state, the jiva doesn't come back to this world, and which is not illumined by the sun,moon or fire, that state is my supreme abode.

ममैवांशो जीवलोके 
जीवभूतः सनातनः। 
मनःषष्ठानीन्द्रियाणि 
प्रकृतिस्थानि कर्षति ।।७।।

जीवलोकामध्ये जीवाचे स्वरूप धारण करणारा जो, तो माझाच सनातन अंश आहे. प्रकृतीमध्ये असणारी मन आणि इतर पाच ज्ञानेंद्रिये ही सहाजण तो आपल्याबरोबर खेचून नेतो.

In this jiva-loka the one who has become jiva is my eternal part. It draws with it the senses with the mind being the sixth among them.

शरीरं यदवाप्नोति 
यच्चाप्युत्क्रामतीश्वरः। 
गृहीत्वैतानि संयाति 
वायुर्गन्धानिवाशयात् ।।८।।

तो जेव्हा शरीर प्राप्त करतो किंवा  शरीरातून बाहेर पडतो तेव्हा ,वारा जसा गंधाला त्याच्या उत्पत्तिस्थानापासून दूर घेऊन जातो त्याप्रमाणे तो या सहा इन्द्रियांना आपल्याबरोबर नेत असतो.

Just as the wind takes away the fragrance from its source, even so it (the jiva) takes with it these senses, when it enters a body or leaves it.

श्रोत्रं चक्षुः स्पर्शनं च 
रसनं घ्राणमेव च। 
अधिष्ठाय मनश्चायं 
विषयानुपसेवते ।।९।।

कान, डोळे, त्वचा, जीभ आणि नाक याबरोबरच मन यांचा शासक बनून हा जीवात्मा विषयांचा उपभोग घेतो.

Governing the ear, the eye, the skin, the tongue and the nose, as well as the mind, it enjoys the sense objects.

उत्क्रामन्तं स्थितं वापि 
भुञ्जानं वा गुणान्वितम् । 
विमूढा नानुपश्यन्ति 
पश्यन्ति ज्ञानचक्षुषः ।।१०।।

शरीर सोडून जाणाऱ्या, शरीरात राहणाऱ्या, सत्वादी गुणांनी युक्त होऊन भोग भोगणाऱ्या या जीवात्म्याला ज्ञानरूपी डोळे असलेले लोक पाहू शकतात; मूर्खांना मात्र तो दिसत नाही. 

Deluded persons do not see him leaving the body, or staying in it and enjoying sense-objects in tune with the gunas viz Sattva etc. But those endowed with the eye of wisdom see it.

यतन्तो योगिनश्चैनं 
पश्यन्त्यात्मन्यवस्थितम्। 
यतन्तोऽप्यकृतात्मानो 
नैनं पश्यन्त्यचेतसः ।।११।।

आध्यात्मिक साधक त्याला स्वत:च्या आतमध्ये स्थित असलेला पाहतात. परंतु विवेकबुद्धी नसलेले अस्थिर चित्ताचे लोक प्रयत्न करूनही त्याला पाहू शकत नाहीत.  

Those yogis striving for liberation see him residing in their hearts. But those who are of unsound mind and are imprudent don’t see him at all.

यदादित्यगतं तेजो 
जगद्भासयतेऽखिलम् । 
यच्चन्द्रमसि यच्चाग्नौ 
तत्तेजो विद्धि मामकम् ।।१२।।

सबंध जगाला प्रकाशित करणारे जे सूर्यामधले तेज आहे , जे चंद्रामध्ये आणि अग्नीमध्ये आहे, ते मूलत: माझेच तेज आहे असे तू जाण.

Know the fact that the brilliance of the sun, which illumines the whole world, as also that of the moon and the fire, in truth, belongs to Me. 

गामाविश्य च भूतानि 
धारयाम्यहमोजसा। 
पुष्णामि चौषधीः सर्वाः 
सोमो भूत्वा रसात्मकः ॥१३॥

प.थ्वीमध्ये प्रवेश करून मी माझ्या ओजाने सर्व जीवांना धारण करतो. रसात्मक चंद्र बनून मीच सर्व वनस्पतींचे पोषण करतो.

Entering the earth, I sustain all beings with my power. I also nourish all vegetation by becoming the succulence generating moon.

अहं वैश्वानरो भूत्वा 
प्राणिनां देहमाश्रितः। 
प्राणापानसमायुक्तः 
पचाम्यन्नं चतुर्विधम् ।।१४।।

मी वैश्वानर अग्नी बनून प्राण्यांच्या देहाचा आश्रय घेतो आणि प्राण, अपान यांनी युक्त होऊन भक्ष्य भोज्य, लेह्य आणि पेय हे चार प्रकारचे अन्न पचवतो.

I become Viahwanara, the fire in the stomach and residing in the bodies of all beings, digest four types of food helped by the vital airs–the prana and the apana.

सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो 
मत्तः स्मृतिर्ज्ञानमपोहनं च । 
वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो 
वेदान्तकृद्वेदविदेव चाहम् ।।१५।।

मी सर्वांच्या हृदयामध्ये राहतो. माझ्यामुळेच स्मृती, ज्ञान आणि ती नष्ट होणे हा गोष्टी घडतात. सर्व वेदांच्या अभ्यासाने मीच जाणला जातो. वेदान्ताचा कर्ता आणि वेदांचा ज्ञाताही मीच आहे.

I reside in the heart of all beings. The faculty of remembrance and knowledge as also their absence happen only because of Me. I am the One knowable by the Vedic studies as also the creator of the Vedanta and the knower of the Veda.

द्वाविमौ पुरुषौ लोके 
क्षरश्चाक्षर एव च। 
क्षरः सर्वाणि भूतानि 
कूटस्थोऽक्षर उच्यते ।।१६।।

या जगात विनाशी आणि अविनाशी असे दोन पुरुष (घटक) आहेत. उत्पन्न झालेले सर्व प्राणी हे विनाशशील आहेत तर त्यांच्या मुळाशी असलेला जीवात्मा हा अविनाशी आहे. 

There are two entities in this world– that which is perishable ( Kshara-purush) and that which is imperishable (Akshara-purusha). Perishable are all the embodied beings whereas the jivatman or the individual soul embedded in it is said to be the imperishable.

उत्तमः पुरुषस्त्वन्यः 
परमात्मेत्युदाहृतः। 
यो लोकत्रयमाविश्य 
बिभर्त्यव्यय ईश्वरः ।।१७।।

तथापि या दोघांहूनही वेगळा असलेला परमात्मा अथवा ईश्वर म्हणून ओळखला जाणारा अविनाशी पुरुष आहे, जो त्रैलोक्यामध्ये प्रवेश करून त्याचे भरण पोषण करत असतो.

But the entity which is different from these two, called the Supreme Soul or the Lord, enters the three worlds and sustains them. 

यस्मात्क्षरमतीतोऽहम् 
अक्षरादपि चोत्तमः । 
अतोऽस्मि लोके वेदे च 
प्रथितः पुरुषोत्तमः ।।१८।।

असा तो मी परमात्मा विनाशशील पुरुषाच्या पलीकडे असून आणि अविनाशी पुरुषापेक्षा (जीवात्म्यापेक्षा) उत्तम आहे म्हणून जगात आणि वेदांमध्येही मी ‘पुरुषोत्तम’ म्हणून प्रसिद्ध आहे.

Thus, as I am beyond the perishable and more excellent than the imperishable, in the world and the Vada ,I am known as Purushottama. 

यो मामेवमसम्मूढो 
जानाति पुरुषोत्तमम् । 
स सर्वविद्भजति मां 
सर्वभावेन भारत ।।१९।।

जो बुद्धिमान मनुष्य याप्रकारे मला म्हणजे पुरुषोत्तमाला जाणतो, तो सर्वकाही जाणणारा असून सर्व भावांनी तो माझीच उपासना करतो.

O Bharata, thus the sane person who knows Me as Purushottama, is indeed the knower of everything and he serves me with all his being.

इति गुह्यतमं शास्त्रम् 
इदमुक्तं मयानघ। 
एतद्बुध्वा बुद्धिमान्स्यात् 
कृतकृत्यश्च भारत ।।२०।।

हे निष्पाप अर्जुना, असे हे अत्यंत गोपनीय असलेले शास्त्र मी तुला सांगितले. हे जाणून मनुष्य शहाणा आणि कृतकृत्य होतो.

Oh blemishless Arjuna, this that I’ve told you is the most secret scriptural knowledge. Knowing this a person becomes intelligent and accomplished.

ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे पुरुषोत्तमयोगो नाम पञ्चदशोऽध्यायः ।।

ओम् तत् सत्। अशाप्रकारे श्रीमद्भगवद्गीतारूप उपनिषदातील ब्रह्मविद्यान्तर्गत योगशास्त्र या विषयावरील कृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादामधला ‘भक्तियोग’ नावाचा बारावा अध्याय पूर्ण झाला.

Om tat sat. Now is complete the twelfth chapter of the Upanishad called Shrimad-bhagavad-geeta, which delineates the Yogashastra under the subject of the knowledge of Brahman, in the form of dialogue between Arjuna and Shri Krishna.
________________________________________________________________________________