श्लोक २८१ ते ३३०

श्लोक ऐका--गायिका कु. मुक्ता तोडकर
⬇ फाईल डाउनलोड करा (Download MP3)
आयुर्वेदलक्षणम्--

हिताहितं सुखं दु:खम्
आयुस्तस्य हिताहितम्।
मानं च तच्च यत्रोक्तम्
आयुर्वेद: स उच्यते।।२८१।।

हितकारक आणि अहितकारक, सुखकारक आणि दुःखकारक असे चार प्रकारचे आयुष्य; आणि त्या चारही प्रकारच्या आयुष्यासाठी काय हितकारक आहे व काय अहितकारक आहे, तसेच आयुष्याचे प्रमाण (मर्यादा) आणि स्वरूप ज्या शास्त्रामध्ये सांगितले आहे, त्याला 'आयुर्वेद' असे म्हणतात.

​That science is designated as Ayurveda which deals with four types of life viz favourable, unfavourable , happy and unhappy ; along with what is good and bad for these four types of life, its span, and its very nature.

आरोग्यलक्षणम्--

समदोषः समाग्निश्च
समधातुमलक्रियः।
प्रसन्नात्मेन्द्रियमनाः
स्वस्थ इत्यभिधीयते।।२८२।।

ज्याचे दोष, अग्नी, धातू आणि मलविसर्जन क्रिया समतोल आहेत आणि ज्याचे मन, इंद्रिये व आत्मा प्रसन्न आहेत, तोच खरा 'स्वस्थ' होय.

One whose doshas, digestive fire, body tissues, and excretory functions are in equilibrium, and whose mind, senses, and spirit are cheerful, is called a healthy person.


पुरुषार्थस्य आधार:--

धर्मार्थकाममोक्षाणाम्
आरोग्यं मूलमुत्तमम्।
रोगास्तस्यापहर्तारः
श्रेयसो जीवितस्य च।। २८३।।

धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चारही पुरुषार्थांचे 'आरोग्य' हेच सर्वोत्तम मूळ आहे. रोग हे त्या आरोग्याचे, मनुष्याच्या कल्याणाचे आणि जीविताचेही हरण करणारे आहेत.

Health is the supreme foundation for achieving the four goals of life: Dharma, Artha, Kama, and Moksha. The deceases are the stealers of health,welfare and life also.


ब्राह्ममूहूर्ते जागरणम्--

ब्राह्मे मुहूर्ते उत्तिष्ठेत्
स्वस्थो रक्षार्थमायुषः।
तत्र सर्वार्थसिद्ध्यर्थं
स्मरेच्च जगदीश्वरम् ।।२८४।।

आयुष्याच्या रक्षणासाठी निरोगी माणसाने ब्राह्म मुहूर्तावर उठावे आणि ईश्वराचे (जगदीश्वराचे) स्मरण करावे.

A healthy person should wake up during Brahma-muhurta to protect their health and remember the Divine Lord.

आहारास्य महत्त्वम्--

न रागान्नाप्यविज्ञानाद्
आहारमुपयोजयेत्।
परीक्ष्य हितमश्नीयात्
देहो ह्याहारसम्भवः।।२८५।।

केवळ चवीसाठी किंवा अज्ञानामुळे अन्न खाऊ नये; ते हितकारक आहे का हे तपासूनच खावे, कारण शरीर अन्नापासूनच बनते.

One should not consume food out of passion or ignorance; eat only after examining what is beneficial, as the body is a product of food.

पथ्यौषधे--

पथ्ये सति गदार्तस्य
किमौषधनिषेवणैः।
पथ्येऽसति गदार्तस्य
किमौषधनिषेवणैः।।२८६।।

जर रुग्ण योग्य पथ्य पाळत असेल, तर त्याला औषधाची गरज नाही; आणि जर तो पथ्य पाळत नसेल, तर औषधाचा काही उपयोग नाही.

If a patient follows a wholesome diet, what is the need for medicine? If a patient does not follow a wholesome diet, what is the use of medicine?

मिताहार:--

सुस्निग्धमधुराहार:
चतुर्थांशविवर्जितः।
भुज्यते शिवसंप्रीत्यै
मिताहारः स उच्यते।।२८७।।

स्निग्ध, मधुर आणि पोटाचा एक चतुर्थांश भाग रिकामा ठेवून जो आहार घेतला जातो, त्याला 'मिताहार' म्हणतात.

A wholesome, sweet, and oily diet, leaving one-fourth of the stomach empty, is called Mitahara.


जलप्राशननियम:--

अजीर्णे भेषजं वारि
जीर्णे वारि बलप्रदम्।
भोजने चामृतं वारि
भोजनान्ते विषप्रदम् ।।२८८।।

अपचनावर पाणी औषध आहे, पचन झाल्यावर बल देणारे, जेवताना अमृत पण जेवण झाल्यावर लगेच प्यायल्यास विषासारखे आहे.

Water acts as medicine in indigestion, gives strength after digestion, is like nectar during a meal, and poison after it.

रोगकारणम्--

रोगाः सर्वेऽपि मन्देऽग्नौ
सुतरामुदरानि च।
तस्मात् अग्निं सदा रक्षेत्
आहारेण मितेन च।।२८९।।

सर्व रोगांचे मूळ कमी झालेली पचनशक्ती हेच असते. म्हणून मोजका आहार घेऊन नेहमी पचनशक्तीचे रक्षण करावे.

All diseases are caused by weak digestive fire. Therefore, one should protect it through a balanced diet.

शरीररक्षणम्--

सर्वमन्यत् परित्यज्य
शरीरमनुपालयेत्।
तदभावे हि भावानां
सर्वाभावः शरीरिणाम्।।२९०।।

इतर सर्व गोष्टींचा त्याग करून आधी शरीराची काळजी घ्यावी. कारण शरीर नसेल, शरीरधारी जीवांचे शरीरच राहणार नसेल तर  जगातील सर्व गोष्टी त्यांच्यासाठी अस्तित्वात नसल्याप्रमाणे आहेत .

Leaving everything else aside, one should take care of the body. For the embodied beings,  in the absence of the body, everything else becomes non-existent.
श्लोक ऐका--गायिका कु. मुक्ता तोडकर
⬇ फाईल डाउनलोड करा (Download MP3)
खलः करोति दुर्वृत्तं
नूनं फलति साधुषु।
दशाननोऽहरत्सीतां
बन्धनं च महोदधेः।।२९१।।

दुष्ट माणूस वाईट कृत्य करतो, पण त्याचे फळ मात्र सज्जनांना भोगावे लागते. सीतेचे अपहरण रावणाने केले, पण समुद्राला मात्र (रामसेतूसाठी) बंधनात पडावे लागले.

The wicked person commits a misdeed, but the consequences often fall upon the virtuous. Ravana abducted Sita, but the great ocean had to suffer being bridged and bound.

बोद्धारो मत्सरग्रस्ताः
प्रभवः स्मयदूषिताः।
अबोधोपहताश्चान्ये
जीर्णमङ्गे सुभाषितम्।।२९२।।

जाणकार लोक मत्सराने ग्रासलेले आहेत, सत्ताधारी लोक गर्वाने आंधळे झाले आहेत आणि बाकीचे अज्ञानामुळे ग्रासलेले आहेत; त्यामुळे सुभाषिते (चांगले विचार) कोणालाही न समजता कवीच्या तोंडातच जुनी होऊन नष्ट होत आहेत.

The learned are consumed by envy, the powerful are tainted by pride, and others are overcome by ignorance; thus, wise sayings wither away within the creator themselves.

निर्वाणदीपे किमु तैलदानम्
चौरे गते वा किमु सावधानम्।
वयोगते किं वनिताविलासः
पयोगते किं खलु सेतुबन्धः।।२९३।।

विझलेल्या दिव्यामध्ये तेल टाकून काय उपयोग? चोर निघून गेल्यावर सावध राहून काय फायदा? तारुण्य निघून गेल्यावर विलासी वृत्तीचा काय उपयोग? आणि पाणी वाहून गेल्यावर धरण (सेतू) बांधून काय लाभ?

​What is the use of pouring oil into a lamp that has already gone out? What is the point of being cautious after the thief has already left? Of what use are sensual pleasures when youth has passed? Indeed, what is the point of building a dam after the water has already flown away?

सर्पाः पिबन्ति पवनं न च दुर्बलास्ते
शुष्कैस्तृणैर्वनगजा बलिनो भवन्ति।
कन्दैः फलैर्मुनिवराः क्षपयन्ति कालम्
संतोष एव पुरुषस्य परं निधानम्।।२९४।।

साप केवळ हवा पिऊन जगतात, तरीही ते दुर्बल नसतात; जंगली हत्ती केवळ वाळलेले गवत खाऊन बलवान होतात; श्रेष्ठ मुनी केवळ कंदमुळे आणि फळे खाऊन आपला काळ घालवतात. यावरून हेच सिद्ध होते की, समाधान हीच माणसाची सर्वात मोठी संपत्ती आहे.

Snakes drink only air, yet they are not weak; forest elephants become strong by eating dry grass; great sages pass their time living only on roots and fruits. Truly, contentment alone is the supreme treasure of a man.

किमिष्टमन्नं खरसूकराणाम्
किं रत्नहारो मृगपक्षिणां च।
अन्धस्य दीपो बधिरस्य गीतम्
मूर्खस्य किं शास्त्रकथाप्रसङ्गः।।२९५।।

गाढव आणि डुकरांना पक्वान्नाचे काय महत्त्व? पशु-पक्ष्यांना रत्नहाराचा काय उपयोग? अंधासाठी दिवा आणि बहिऱ्यासाठी गाणे व्यर्थ आहे; त्याचप्रमाणे मूर्ख माणसासाठी शास्त्रातील कथा किंवा चर्चेचा काय उपयोग?

What is the value of delicious food to donkeys and pigs? What use is a necklace of jewels to animals and birds? A lamp for the blind and music for the deaf are useless; similarly, of what relevance is a discussion of scriptures to a fool?

विद्या ददाति विमलं ह्यतुलं प्रकाशम्
धर्मो ददाति हृदये परमं च धैर्यम्।
सत्यं ददाति सफलां सततं प्रतिष्ठाम्
शीलम् सदा विजयते जगतीह लोके।।२९६।।

विद्येमुळे निर्मळ आणि अफाट असा प्रकाश (ज्ञान) मिळतो, धर्मामुळे हृदयात श्रेष्ठ धैर्य निर्माण होते. सत्यामुळे नेहमीच यशस्वी प्रतिष्ठा प्राप्त होते, परंतु या जगात चारित्र्य (शील) हेच नेहमी सर्वांवर विजय मिळवते.

Knowledge gives a pure and incomparable light, while Dharma (righteousness) provides supreme courage in the heart. Truth consistently brings successful prestige, but in this world, character (Shila) always reigns supreme.
.
येषां न विद्या न तपो न दानम्
ज्ञानं न शीलं न गुणो न धर्मः।
ते मृत्युलोके भुवि भारभूता
मनुष्यरूपेण मृगाश्चरन्ति।।२९७।।

ज्यांच्याकडे विद्या, तप, दान, ज्ञान, चारित्र्य, गुण किंवा धर्म यांपैकी काहीही नाही, ते या पृथ्वीवर ओझे बनून मनुष्यरूपातील जनावरांप्रमाणे भटकत असतात.

Those who possess neither knowledge, nor penance, nor charity, nor wisdom, nor character, nor virtue, nor righteousness; they are a burden to this earth, wandering in human form like mere animals.

भोगा न भुक्ता वयमेव भुक्ताः
तपो न तप्तं वयमेव तप्ताः ।
कालो न यातो वयमेव याताः
तृष्णा न जीर्णा वयमेव जीर्णाः।।२९८।।

आम्ही भोगांचा उपभोग घेतला नाही, तर भोगांनीच आम्हाला संपवले; आम्ही तप केले नाही, तर काळानुरूप आम्हीच तापलो गेलो; वेळ संपली नाही, आम्हीच आयुष्यातून संपत गेलो; आमची तृष्णा (हाव) कधीच म्हातारी झाली नाही, उलट आम्हीच म्हातारे झालो.

We did not enjoy the pleasures, but the pleasures consumed us; we did not perform penance, but we were burnt by the miseries of life; time did not pass away, but we passed away; our desires did not wither, but we ourselves have become worn out and old.

मृगमीनसज्जनानाम्
तृणजलसंतोषविहितवृत्तीनाम्।
लुब्धकधीवरपिशुना
निष्कारणवैरिणो जगति।।२९९।।

केवळ गवत, पाणी आणि समाधान यावर जगणाऱ्या हरिण, मासे आणि सज्जन माणसांचे; अनुक्रमे पारधी, कोळी आणि दुष्ट लोक विनाकारण शत्रू बनतात.

Deer, fish, and virtuous people live on grass, water, and contentment; yet hunters, fishermen, and the wicked become their enemies for no reason at all.

अपि वेत्ति षडक्षराणि चेत्
उपदेष्टुं शितिकण्ठमिच्छति।
वसनाशनमात्रमस्ति चेत्
धनदादप्यतिरिच्यते खलः।।३००।।

जर एखाद्या दुष्ट माणसाला सहा अक्षरे समजली, तर तो साक्षात महादेवालाही उपदेश करायला निघतो. त्याच्याकडे केवळ अन्न आणि वस्त्र असले तरी तो स्वतःला कुबेरापेक्षाही श्रेष्ठ समजून वागतो.

If a wicked man knows even six letters, he desires to advise Lord Shiva himself. If he has just enough for food and clothing, he considers himself superior even to the God of Wealth.

श्लोक ऐका--गायिका कु. मुक्ता तोडकर
⬇ फाईल डाउनलोड करा (Download MP3)
अपसर मधुकर दूरम्
परिमलबहुलेsपि केतकीकुसुमे।
इह न हि मधुलवलाभः 
भवति परं धूलिधूसरं वदनम्।।३०१।।

हे भ्रमरा, तू या केतकीच्या (केवड्याच्या) फुलापासून लांब जा. जरी हे फूल सुगंधाने भरलेले असले, तरी यात मधाचा एक थेंबही मिळण्यासारखा नाही. उलट, इथे तुझे तोंडच परागकणांच्या धुळीने माखले जाईल.

हे सुभाषित अशा लोकांसाठी वापरले जाते जे दिसायला खूप मोठे किंवा श्रीमंत वाटतात, पण प्रत्यक्षात त्यांच्याकडून कोणालाही काहीच मदत मिळत नाही. अशा 'केतकी' सारख्या माणसांच्या मागे लागून आपला वेळ वाया जातो आणि शेवटी अपमान किंवा मनस्तापच (धुळीने माखलेले तोंड) वाट्याला येतो.

O honeybee, move away from this Ketaki (screw pine) flower. Even though it is filled with a strong fragrance, there is not even a drop of nectar to be found here. On the contrary, your face will only end up being covered in dust (the sticky yellow pollen of the Ketaki).

This is an Anyokti (an allegory). It warns us against people who are superficially attractive, famous, or "fragrant" with status, but possess no real substance or generosity (nectar). Seeking help or association with such individuals results in no benefit; instead, one only ends up facing disappointment or loss of dignity (the dust on the face).

नष्टं द्रव्यं लभ्यते कष्टसाध्यम्
नष्टा विद्या लभ्यतेsभ्यासयुक्ता।
नष्टारोग्यं सूपचारैः सुसाध्यम्
नष्टा वेला या गता सा गतैव।।३०२।।

हरवलेले किंवा नष्ट झालेले धन (पैसा) कष्टाने पुन्हा मिळवता येते. विसरलेली किंवा नष्ट झालेली विद्या (ज्ञान) पुन्हा अभ्यासाने प्राप्त करता येते. बिघडलेले आरोग्य योग्य उपचार आणि औषधांनी पुन्हा सुधारता येते. परंतु, एकदा गेलेली वेळ (वेळा) कायमची जाते, ती कधीही परत मिळवता येत नाही.

Lost wealth can be regained through hard work.Lost knowledge (education) can be regained through consistent practice/study.Lost health can be recovered through proper medical treatment.But, the time that is lost is gone forever; it can never be retrieved.

यो नात्मजे न च गुरौ न च भृत्यवर्गे
दीने दयां न कुरुते न च बन्धुवर्गे।
किं तस्य जीवितफलं मनुजस्य लोके
काकोsपि जीवति चिराय बलिं च भुङ्क्ते।।३०३।।

जो मनुष्य स्वतःच्या मुलावर , गुरुवर, पदरी असलेल्या नोकरचाकरांवर , गरिबांवर आणि आपल्या बांधवांवर दया दाखवत नाही (त्यांच्याप्रती आपले कर्तव्य पार पाडत नाही)...अशा माणसाच्या या जगातील जगण्याचे फळ तरी काय? (म्हणजे त्याच्या जगण्याला काहीच अर्थ नाही).कारण कावळा सुद्धा खूप काळ जगतो आणि दुसऱ्याने दिलेला पिंडाचा (बळीचा) घास खाऊन आपले पोट भरतोच की!

He who shows no compassion (or fails to do his duty) toward his own children, his teachers, his servants, the poor, or his kinsmen...What is the fruit (purpose) of his living in this world?Even a crow lives for a long time and survives by eating the offerings (food) given by others.

कोलाहले काककुलस्य जाते 
विराजते कोकिलकूजितं किम्।
परस्परं संवदतां खलानाम् 
मौनं विधेयं सततं सुधीभिः।।३०४।।

जेव्हा कावळ्यांचा मोठा गोंधळ किंवा कोलाहल सुरू असतो, तेव्हा कोकिळेचे मधुर गायन कोणाला ऐकू येईल का? किंवा तिथे त्याचे काही मोल असते का? (अर्थात नाही).त्याचप्रमाणे, जेव्हा दुष्ट किंवा दुर्जन लोक एकमेकांशी वाद घालत असतात किंवा भांडत असतात, तेव्हा बुद्धिमान माणसांनी नेहमी मौन धारण करणेच योग्य आहे.

When a flock of crows is making a loud noise (cawing), does the sweet singing of a cuckoo find any place or recognition? (No, it is lost in the noise). Similarly, when wicked or foolish people (Khala) are arguing or conversing loudly among themselves, wise people (Sudhi) should always observe silence.

अनेकशास्त्रं बहु वेदितव्यम्
अल्पश्च कालो बहवश्च विघ्नाः।
यत्सारभूतं तदुपासितव्यम्
हंसो यथा क्षीरमिवाम्बुमध्यात्।।३०५।।

शास्त्रे अनेक आहेत आणि जाणून घेण्यासारख्या गोष्टीही खूप आहेत. पण त्याउलट माणसाकडे असलेला काळ (आयुष्य) अतिशय अल्प आहे आणि त्यात विघ्नं मात्र खूप आहेत. म्हणून, ज्याप्रमाणे हंस पक्षी पाणी आणि दुध एकत्र असल्यावर त्यातील फक्त दूध (सार) स्वीकारतो आणि पाणी सोडून देतो, त्याचप्रमाणे आपणही अथांग ज्ञानातून जे 'सारभूत' (अत्यंत महत्त्वाचे/मूल्यवान) आहे, तेवढेच ग्रहण करावे.

There are countless scriptures (fields of knowledge) and there is much to be known. However, the time (lifespan) is very short and the obstacles are many. Therefore, one should grasp only that which is the 'essence' (the most important part), just as a swan extracts and drinks milk from a mixture of milk and water.

धत्ते भरं कुसुमपत्रफलावलीनाम्
घर्मव्यथां वहति शीतभवां रुजं च।
यो देहमर्पयति चान्यसुखस्य हेतोः
तस्मै वदान्यगुरवे तरवे नमस्ते।।३०६।।

जो (वृक्ष) फुले, पाने आणि फळांच्या समूहाचा भार स्वतः सोसतो; जो उन्हाळ्याचा ताप आणि थंडीपासून होणारा त्रास स्वतः सहन करतो; आणि जो केवळ इतरांच्या सुखासाठी आपला देह अर्पण करतो...अशा दात्यांमध्ये श्रेष्ठ असलेल्या वृक्षाला माझा नमस्कार असो.

He (the tree) who bears the heavy burden of flowers, leaves, and fruits; he who endures the scorching heat of the sun and the pain caused by the biting cold; and he who offers his entire body for the sake of others' happiness...To that tree, the supreme teacher of generosity (the greatest giver), I offer my salutation.

घृष्टं घृष्टं पुनरपि पुन: चन्दनं चारुगन्धम्
छिन्नं छिन्नं पुनरपि पुनः स्वादु चैवेक्षुखण्डम्।
दग्धं दग्धं पुनरपि पुनः काञ्चनं कान्तवर्णम्
प्राणान्तेपि प्रकृतिविकृति: जायते नोत्तमानाम्।।३०७।।

चंदनाला कितीही घासले तरी ते पुन्हा पुन्हा आपला सुगंधच देते.उसाच्या कांड्यांचे कितीही तुकडे केले तरी त्यातून पुन्हा पुन्हा गोड रसच मिळतो. सोन्याला कितीही वेळा आगीत जाळले तरी ते पुन्हा पुन्हा अधिक तेजस्वी/चमकदारच दिसते.
त्याचप्रमाणे, प्राणांतिक संकट आले तरी उत्तम (सज्जन) माणसांच्या मूळ स्वभावात कधीही बदल होत नाही.

Sandalwood, even when rubbed repeatedly, continues to give off its exquisite fragrance.
Sugarcane, even when cut into pieces repeatedly, remains sweet.Gold, even when burnt in fire repeatedly, shines with a brilliant luster.Similarly, even at the moment of death , there is no change/distortion in the noble nature of the great.

धवलयति समग्रं चन्द्रमा जीवलोकम्
किमिति निजकलङ्कं नात्मसंस्थं प्रमार्ष्टि।
भवति विदितमेतत्प्रायशः सज्जनानाम्
परहितनिरतानामादरो नात्मकार्ये।।३०८।।

चंद्र आपल्या शीतल प्रकाशाने संपूर्ण जगाला प्रकाशित आणि उज्ज्वल करतो. असे असताना तो स्वतःच्या अंगावर असलेला काळा डाग का बरे पुसून टाकत नाही? याचे उत्तर असे आहे की—हे आता सर्वांना ज्ञात झाले आहे की, जे सज्जन लोक नेहमी दुसऱ्यांच्या हितामध्ये मग्न असतात, बहुधा त्यांना स्वतःच्या कामाची किंवा स्वतःच्या फायद्या-तोट्याची फारशी पर्वा नसते.

The moon brightens and whitens the entire world with its light. Then why does it not wipe away the dark spot (stain) on its own self? It is well-known that those noble souls  who are constantly engaged in the welfare of others usually do not pay much attention to their own personal matters or self-interest.

मौनायन्ते भृशकलकले कोकिलः भेकवृन्दे
निष्पुष्पोsसौ कुसुमबहुले पारिजातो वसन्ते।
ताराक्रान्ते नभसि सविता पश्चिमाद्रौ प्रशेते
औदासीन्यं भजति हि महान्यत्र नीचोsग्रगामी।।३०९।।

जेव्हा बेडकांचा मोठा कोलाहल सुरू होतो, तेव्हा कोकिळा शांत राहते (मौन पाळते).जिथे इतर सामान्य फुले बहरली आहेत, तिथे पारिजातासारखे श्रेष्ठ फूल वसंत ऋतूतही फुलाशिवाय राहून शांत बसते.जेव्हा आकाश ताऱ्यांनी भरून जाते, तेव्हा सूर्य पश्चिमेकडे (अस्ताला) जाऊन शांतपणे झोपतो. निष्कर्ष--जिथे नीच किंवा अयोग्य लोक पुढे असतात, तिथे श्रेष्ठ माणसे आपली उदासीनता किंवा तटस्थता स्वीकारतात.

When a group of frogs makes a loud noise, the cuckoo remains silent.Even when the spring season is full of common flowers, the Parijata (a noble, fragrant flower) remains without flowers (or retreats into stillness).When the sky is taken over by the stars, the Sun retires to the western mountain to rest.

Core Message: Indeed, a great person adopts an attitude of indifference (apathy/detachment) wherever a low or wicked person takes the lead.

सम्पूर्णकुम्भो न करोति शब्दम्
अर्धो घटो घोषमुपैति नूनम्।
विद्वान् कुलीनो न करोति गर्वम्
गुणैर्विहीना बहु जल्पयन्ति।।३१०।।

पूर्ण भरलेला घडा कधीही आवाज करत नाही (तो स्थिर असतो), परंतु अर्धा भरलेला घडा मात्र खूप आवाज करतो, हे निश्चित आहे.त्याचप्रमाणे, जो खरा विद्वान आणि उच्च कुळातील (संस्कारी) असतो, तो कधीही गर्व करत नाही. याउलट, ज्यांच्याकडे गुणांचा अभाव असतो, तेच लोक स्वतःची खूप बडबड करत असतात.

A full vessel (pot) does not make any sound; it is the half-filled pot that surely makes a lot of noise.Similarly, a learned and noble person does not boast (pride themselves); but those who are devoid of virtues talk excessively (to compensate for their lack of depth).
श्लोक ऐका--गायिका कु. मुक्ता तोडकर
⬇ फाईल डाउनलोड करा (Download MP3)
देशाटनं राजसभाप्रवेश:
व्यापारिविद्वज्जनसङ्गतिश्च।
सर्वेषु शास्त्रेष्ववलोकनं च
चातुर्यमूलानि भवन्ति पञ्च।।३११।।

देशाटन (प्रवास करणे), राजसभेत प्रवेश (मोठ्या लोकांच्या किंवा प्रशासकीय वातावरणात मिसळणे), व्यापारी आणि विद्वान लोकांची संगत, आणि सर्व शास्त्रांचे अध्ययन करणे — हे पाच गुण माणसाला 'चातुर्य' (व्यवहारकुशलता) शिकवतात.

Traveling to different lands, interacting with people in high-level assemblies (or governance), associating with merchants and learned scholars, and studying various scriptures—these are the five foundations that develop wisdom and worldly intelligence.

आपद्गतं हससि किं द्रविणान्धमूढ
लक्ष्मीः स्थिरा न भवतीति किमत्र चित्रम्।
एतान्प्रपश्यसि घटाञ्जलयन्त्रचक्रे
रिक्ता भवन्ति भरिता भरिताश्च रिक्ताः।।३१२।।

अरे धनाच्या अहंकारात आंधळ्या झालेल्या मूर्खा, संकटात पडलेल्या व्यक्तीला पाहून तू का हसतोस? लक्ष्मी (संपत्ती) स्थिर नसते, यात नवल ते काय? रहाटावरील घागरींकडे पाहतोस ना? ज्या भरलेल्या आहेत त्या रिकाम्या होतात आणि ज्या रिकाम्या आहेत त्या भरल्या जातात; हेच जगाचे चक्र आहे.

O foolish person blinded by wealth, why do you laugh at one who has fallen into misfortune? Is it any wonder that wealth is not permanent? Just look at the pots on a water-lifting wheel (persian wheel)—those that are full become empty, and those that are empty become full. Such is the nature of life.

रे रे चातक सावधानमनसा मित्र क्षणं श्रूयताम्
अम्भोदा बहवोऽपि सन्ति गगने सर्वेऽपि नैतादृशाः।
केचिद्वृष्टिभिरार्द्रयन्ति वसुधां गर्जन्ति केचिद्वृथा
यं यं पश्यसि तस्य तस्य पुरतो मा ब्रूहि दीनं वचः।।३१३।।

अरे चातक मित्रा, माझे म्हणणे सावधान मनाने क्षणभर ऐक. आकाशात ढग तर खूप आहेत, पण ते सर्व एकासारखे नसतात. काही ढग पावसाने पृथ्वीला ओले करतात (परोपकारी असतात), तर काही ढग उगाचच गर्जना करतात (व्यर्थ बडबड करतात). त्यामुळे, आकाशात दिसणाऱ्या प्रत्येक ढगासमोर जाऊन तुझे दीनवाणे (याचना करणारे) शब्द नको बोलू.

येथे 'चातक' म्हणजे स्वाभिमानी पण गरजू व्यक्ती आणि 'मेघ' म्हणजे धनवान किंवा सामर्थ्यवान लोक.
कवी सांगतो की, समाजात अनेक श्रीमंत लोक असतात, पण त्यातील सर्वच दानशूर नसतात. काही लोक फक्त स्वतःच्या संपत्तीचे प्रदर्शन (गर्जना) करतात, पण कोणालाही मदत करत नाहीत. म्हणून, एका स्वाभिमानी व्यक्तीने आपल्या गरजेसाठी प्रत्येकापुढे हात पसरू नये, तर केवळ खरोखर उदार असलेल्या व्यक्तीचीच साथ शोधावी. आत्मसन्मान गमावून कोणाकडेही याचना करणे चुकीचे आहे.

चित्ते प्रसन्ने भुवनं प्रसन्नम्
चित्ते विषण्णे भुवनं विषण्णम्।
अतोऽभिलाषो यदि ते सुखे स्यात्
चित्तप्रसादे प्रथमं यतस्व।।३१४।।

जर तुमचे चित्त (मन) प्रसन्न असेल, तर संपूर्ण जग तुम्हाला प्रसन्न वाटते; आणि जर मन उदास असेल, तर जगही तुम्हाला दुःखद वाटते. म्हणून, जर तुम्हाला जीवनात खऱ्या सुखाची इच्छा असेल, तर सर्वात आधी आपले मन प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा.

If your mind is cheerful, the world appears cheerful; if your mind is depressed, the world appears gloomy. Therefore, if you desire happiness in life, strive first to keep your mind tranquil and pleasant.

चित्ताक्रान्तं धातुबन्धं शरीरम्
चित्ते नष्टे धातवो यान्ति नाशम्।
तस्माच्चितं सर्वतो रक्षणीयम्
स्वस्थे चित्ते बुद्धयः सम्भवन्ति।।३१५।।

आपले शरीर हे मन (चित्त) आणि धातूंच्या बंधनाने बनलेले आहे. जर मनच नष्ट झाले किंवा विचलित झाले, तर शरीरातील धातूही (जीवनशक्ती/संतुलन) नष्ट होतात. म्हणूनच, मनाचे सर्व बाजूंनी रक्षण करावे. कारण जर मन स्वस्थ असेल, तरच बुद्धी कार्यक्षम आणि स्थिर राहू शकते.

The body is a structure held together by the mind and the vital elements (dhatus). When the mind is ruined or disturbed, the vital elements also perish. Therefore, one must protect the mind from all directions, for it is only when the mind is healthy that wisdom and intelligence truly flourish.

यदा किञ्चिज्ज्ञोऽहं द्विप इव मदान्धः समभवम्
तदा सर्वज्ञोऽस्मीत्यभवदवलिप्तं मम मनः।
यदा किञ्चित्किञ्चिद्बुधजनसकाशादवगतम्
तदा मूर्खोऽस्मीति ज्वर इव मदो मे व्यपगतः।।३१६।।

जेव्हा मला थोडे ज्ञान मिळाले होते, तेव्हा मी मदाने अंध झालेल्या हत्तीप्रमाणे अहंकारी झालो होतो आणि 'मला सर्व काही कळते' असे मानून माझे मन गर्वाने फुगले होते. परंतु, जेव्हा मी हळूहळू विद्वान लोकांच्या सहवासात गेलो आणि काही ज्ञान प्राप्त केले, तेव्हा मला समजले की मी तर मूर्ख आहे. हे समजताच माझा तो गर्व (जो तापासारखा होता) पूर्णपणे निघून गेला.

When I knew only a little, I became blind with pride like an elephant in rut, and my mind was puffed up with the thought that "I am omniscient." But when I learned a little more in the company of the wise, I realized that I was actually a fool. As soon as I realized this, my pride vanished like a fever.

न विद्यया न कुलेन गौरवम्
जनानुरागो धनिकेषु सर्वदा।
कपालिना मौलिधृताऽपि जाह्नवी
प्रयाति रत्नाकरमेव निम्नगा।।३१७।।

समाजात मान-सन्मान केवळ विद्या किंवा उच्च कुळामुळे मिळत नाही, तर लोकांचा ओढा (प्रेम/आदर) नेहमी धनवानांकडेच असतो. ज्याप्रमाणे भगवान शिवाने मस्तकावर धारण केलेली असूनही (सर्वोच्च सन्मानाचे स्थान दिलेले असूनही) पवित्र गंगा नदीसुद्धा शेवटी सागरालाच जाऊन मिळते, त्याचप्रमाणे सर्वजण श्रीमंतांकडेच धावतात.

Respect is not gained by knowledge or by noble birth alone; the affection of the people always leans towards the wealthy. Even the sacred river Ganga, despite being held on the head (given the highest honour or status) by Lord Shiva, ultimately flows only towards Ratnakara (meaning the ocean which is the repostory of precious gems)

यथा खरश्चन्दनभारवाही
भारस्य वेत्ता न तु चन्दनस्य।
एवं हि शास्त्राणि बहून्यधीत्य
अर्थेषु मूढाः खरवद्वहन्ति।।३१८।।

ज्याप्रमाणे गाढवाच्या पाठीवर चंदनाचे ओझे लादले, तर त्याला केवळ 'ओझ्याचे' (भार) ज्ञान असते, 'चंदनाच्या' सुगंधाचे किंवा मूल्याचे नाही; त्याचप्रमाणे, अनेक शास्त्रे वाचूनही ज्यांना त्यांच्यातील अर्थ किंवा उपयोगाचे ज्ञान होत नाही, ते लोक त्या गाढवाप्रमाणेच फक्त ज्ञानाचे ओझे वाहतात.

Just as a donkey carrying a load of sandalwood knows only the weight, not the fragrance or value of the sandalwood; similarly, those who have studied many scriptures but are ignorant of their true purpose/application, continue to carry the burden (of knowledge) just like a donkey.

भवन्ति नम्रास्तरवः फलागमैः
नवाम्बुभिर्भूरि विलम्बिनो घनाः।
अनुद्धताः सत्पुरुषाः समृद्धिभिः
स्वभाव एवैष परोपकारिणाम्।।३१९।।

फळांनी लगडलेली झाडे नम्र होतात, पाण्याने भरलेले ढग जमिनीच्या जवळ (खाली) येतात, आणि संपत्ती प्राप्त झाल्यावर सज्जन माणसे अधिक नम्र होतात. परोपकारी लोकांचा हा स्वभावच असतो.

Trees bend low when they are laden with fruits; clouds hang low when they are heavy with new water; similarly, virtuous people become humble when they attain prosperity. This is the very nature of those who live to help others.

साहित्यसङ्गीतकलाविहीनः
साक्षात्पशुः पुच्छविषाणहीनः।
तृणं न खादन्नपि जीवमानः
तद्भागधेयं परमं पशूनाम्।।३२०।।

ज्याच्याकडे साहित्य, संगीत आणि कलेचा गंध नाही, तो माणूस म्हणजे शेपटी आणि शिंगे नसलेला 'साक्षात प्राणी' आहे. तो गवत न खाताही जगतो, हे प्राण्यांचे मोठे नशीबच म्हंटले पाहिजे!  (कारण जर तो गवत खाऊ लागला, तर प्राण्यांच्या वाट्याचे गवत कमी पडेल).

A person who lacks interest in literature, music, and the arts is, in reality, a beast without a tail and horns. The fact that he remains alive without eating grass is the great fortune of the animals! (Otherwise the animals may suffer from the lack of grass to eat)
श्लोक ऐका--गायिका कु. मुक्ता तोडकर
⬇ फाईल डाउनलोड करा (Download MP3)
एते सत्पुरुषा: परार्थघटका: स्वार्थं परित्यज्य ये
सामान्यास्तु परार्थमुद्यमभृता: स्वार्थाविरोधेन ये।
तेऽमी मनुष्यराक्षसाः परहितं स्वार्थाय निघ्नन्ति ये
ये निघ्नन्ति निरर्थकं परहितं ते के न जानीमहे।।३२१।।

जे स्वहिताकडे दुर्लक्ष करून इतरांच्या हितासाठी झटतात ते सत्पुरुष होत.जे स्वहिताला धक्कालागणार नही या बेताने दुसऱ्याचे हित करतात ते सामान्य लोक होत. जे स्वार्थासाठी दुसऱ्याच्या हिताला बाधा आणतात ते मनुष्यरूपी राक्षस होत.परंतु जे कोणत्याही कारणाशिवाय इतरांचे नुकसान करतात, त्याना काय म्हणावे हेच आम्हाला कळत नाही!

Those are sainty persons who are engaged in charitable work even at the expense of their own welfare. The generality are those who are engaged in benevolent actions without damaging their own good. Those are the monsters  in human form who destroy other peoples' good for their own welfare. But those who destroy others' good for no reason at all , we don't know what they should be called.

य: प्रीणयेत्सुचरितै: पितरं स पुत्रो
यद्भर्तुरेव हितमिच्छति तत्कलत्रम्।
तन्मित्रमापदि सुखे च समक्रियं यत्
एतत्त्रयं जगति पुण्यकृतो लभन्ते।। ३२२।।

जो आपल्या चांगल्या वर्तनाने वडिलांना समाधान देईल असा पुत्र, जी सदैव आपल्या पतीचे हित चिंतिते अशी पत्नी , जो सुख आणि दुःखाच्या काळात ही आपल्याशी एकसारखेच वागतो असा मित्र –या तीन गोष्टी जगात पुण्यवंतालाच मिळतात.

The son who pleases his father by his good behaviour, the wife who always wishes the welfare of her husband, the friend whose behaviour remains unchanged during our period of distress or happiness-- In this world, only the doers of meritorious deeds have these three things.

रत्नैर्महार्हैस्तुतुषुर्न देवा
न भेजिरे भीमविषेण भीतिम्।
सुधां विना न प्रययुर्विरामम्
न निश्चितार्थाद्विरमन्ति धीरा:।। ३२३।।

समुद्र मंथन करीत असताना अनेक अमूल्य रत्ने मिळून ही देवांचे समाधान झाले नाही.मंथनातून प्राप्त झालेल्या महाभयंकर हलाहल विषाने ते घाबरले नाहीत.अमृत मिळविल्याशिवाय त्यांनी आपले प्रयत्न थांबविले नाहीत.खरोखरच धैर्यवान माणसे आपले निश्चित ध्येय गाठल्याशिवाय थांबत नाहीत.

While churning the celestial ocean the gods didn't feel satisfied even after getting the priceless jewels; they didn't get frightened by the formidable poison Halahala; before getting the nectar they didn't take any rest.Thus the courageous people never stop before achieving their goal.

उद्योगिनं पुरुषसिंहमुपैति लक्ष्मी: 
दैवेन देयमिति कापुरुषा वदन्ति।
दैवं निहत्य कुरु पौरुषमात्मशक्त्या 
यत्ने कृते यदि न सिध्यति कोऽत्र दोष:।।३२४।।

लक्ष्मी प्रयत्नरत अशा पराक्रमी पुरुषाजवळच राहते. नशिबात असेल तर मिळेल असे भित्रे लोक म्हणत असतात. म्हणून नशिबावर अवलंबून न राहता स्वतःच्या आत्मशक्तीवर विश्वास ठेवून प्रयत्न कर. असा प्रयत्न करूनही जर यश मिळाले नाही तर त्यात दोष तो कोणता?

The goddess of wealth stays with the lion among men who is industrious. 'Fate should give' is the rant of only the cowardly. Therefore leaving fate aside, do efforts relying on your own strength. Even after doing effort you do not succeed, then what fault will be in that?

विपदि धैर्यमथाभ्युदये क्षमा 
सदसि वाक्पटुता युधि विक्रम:।
यशसि चाभिरुचिर्व्यसनं श्रुतौ 
प्रकृतिसिद्धमिदं हि महात्मनाम्।‌।३२५।।

संकटकाळी धैर्य,उत्कर्षकाळात क्षमाशीलता , सभेमध्ये वक्तृत्व, युध्दात पराक्रम, कीर्ती प्राप्त करण्याची आवड आणि ज्ञान संपादनाचे व्यसन हा श्रेष्ठ व्यक्तींचा स्वभावच असतो.

Courage in the time of calamity, forbearance in the time of prosperity, eloquence in the assembly of men, and valour in war, interest in acquiring fame and addiction to knowledge --these tendencies are verily natural to the great people.

प्रारभ्यते न खलु विघ्नभयेन नीचै: 
प्रारभ्य विघ्नविहता विरमन्ति मध्या:।
विघ्नै: पुन: पुनरपि प्रतिहन्यमाना: 
प्रारब्धमुत्तमजना न परित्यजन्ति।।३२६।।

संकटे किंवा अडचणी येतील या भितीने निकृष्ट लोक कार्यास सुरुवातच करत नाहीत.मध्यम क्षमतेचे लोक कामाला प्रारंभ तर करतात,पण अडचणी आल्यावर काम अर्धवटच सोडून देतात.परंतु उत्कृष्ट लोक संकटांचे पुन्हा पुन्हा आघात होत असतानाही हाती घेतलेले काम सोडून देत नाहीत.

Fearing the calamities that may befall, the people of the lower order do not even start the work. The people of the middle order stop doing the work which they have started , after having been smitten by calamities. But the excellent people never give up what they have started,  even when they are repeatedly beaten down by calamities.
 
निन्दन्तु नीतिनिपुणा यदि वा स्तुवन्तु 
लक्ष्मी: समाविशतु गच्छतु वा यथेष्टम्।
अद्यैव वा मरणमस्तु युगान्तरे वा 
न्याय्यात्पथ: प्रविचलन्ति पदं न धीरा:।।३२७।।

नीतिनिपुण लोक निंदा करोत किंवा स्तुती करोत, लक्ष्मी तिच्या इच्छेप्रमाणे  त्यांच्याकडे येऊ दे अथवा जाऊ दे, मृत्यू  आज होऊ दे किंवा युगाच्या शेवटी होऊ दे, धैर्यवान मनुष्याची पावले न्याय्य मार्गापासून कधीच ढळत नाहीत.

Let those who are well-versed in moral behaviour criticise or praise ; let the Goddess of wealth --Laxmi come or go as she pleases; let there be death today or at the end of the yuga, the courageous people never retract their feet from the path of righteousness.

प्रथमवसि पीतं तोयमल्पं स्मरन्त:
शिरसि निहितभारा नारिकेला नराणाम्।
ददति जलमनल्पास्वादमाजीवितान्तम्
न हि कृतमुपकारं साधवो विस्मरन्ति ।।३२८।।

लहान वयात प्यालेले थोडेसेच पाणी लक्षात ठेऊन, नारळाचे वृक्ष डोक्यावर आयुष्यभर नारळांचे ओझे वाहत, स्वत:च्या जीवनाच्या अंतापर्यंत माणसांना अत्यंत चविष्ट पाणी देत राहतात. खरोखरच सज्जन लोक त्यांच्यावर कोणीही केलेले उपकार कधीही विसरत नाहीत.

Remembering the little water given to them in their formative years, the coconut trees, throughout their whole life bear the burden of coconuts on their heads and give the people very sweet water unto their last moment of life. Indeed, the noble people never forget the good acts of others towards them. 

केयूरा न विभूषयन्ति पुरुषं हारा न चन्द्रोज्ज्वला:
न स्नानं न विलेपनं न कुसुमं नालङ्कृता मूर्धजा:।
वाण्येका समलङ्करोति पुरुषं या संस्कृता धार्यते
क्षीयन्ते खलु भूषणानि सततं वाग्भूषणं भूषणम् ।।३२९।।

बाजूबंद, चंद्राप्रमाणे तेजस्वी अशा माळा, स्नान करणे, सुगंधित अशा चंदनादींचा लेप लावणे, फुले किंवा सजविलेली केशरचना, यामुळे पुरुषाला शोभा येत नाही. सुसंस्कृत वाणी हीच एकटी पुरुषाला खऱ्या अर्थाने अलंकृत करते. अन्य अलंकार काळानुसार झिजत जातात. परंतु सुसंस्कृत वाणी हाच माणसाचा कायम टिकणारा दागिना आहे.

Armlets, garlands which are lustrous like the moon,  ablutions, anointing, flowers, or decorated hair-- these do not adorn a man. Only a refined speech adorns him in the true sense. All other ornaments are subject to erosion. The refined speech is the only true ornament.

विद्या नाम नरस्य रूपमधिकं प्रच्छ्न्नगुप्तं धनम्
विद्या भोगकरी यश:सुखकरी विद्या गुरूणां गुरु:।
विद्या बन्धुजनो विदेशगमने विद्या परं दैवतम्
विद्या राजसु पूज्यते न तु धनं विद्याविहीन: पशु:।।३३०।।

विद्या हे मनुष्याचे अप्रकट आणि गुप्त असे धन आहे. विद्या भोगांची प्राप्ती करून देणारी, यश आणि सुख देणारी आहे. विद्या ही गुरूंचीही गुरू आहे. परदेशात विद्या हीच आपली बांधव असते.विद्या हेच सर्वश्रेष्ठ दैवत आहे. राजदरबारात धन नव्हे तर विद्याच माणसाला सन्मान मिळवून देते. म्हणूनच अशी ही विद्या ज्याच्याजवळ नाही असा माणूस म्हणजे साक्षात पशूच होय.

Knowledge is the augmentation of a man's handsome appearance. It is his well-concealed and protected wealth. It makes one capable of enjoying life's pleasures and also gives happiness and fame. It is undoubtedly the teacher of teachers. It is the only relative of man who is travelling in a foreign land. It is the supreme deity. Only knowledge commands respect in the courts of a king and not wealth. So one who is devoid of knowledge, is a veritable brute.






हे पान शेअर करा
QR Code