श्लोक ४४१ ते ४५०

इयत्ता चौथीचे सर्व श्लोक प्रिंट करा

हे पान शेअर करण्यासाठी स्कॅन करा

श्लोक क्र. १०१ ते ११० (गायिका--परिज्ञा)

शरीरमाद्यं खलु धर्मसाधनं
सर्वार्थसिद्धौ हि तनुः प्रधानम्।
तनुं समर्थां कुरुते सदा नरः
सुखं च दुःखं च तनुर्निबद्धम् ।।४४१।।

कोणतेही कर्तव्य (धर्म) पार पाडण्यासाठी शरीर हे पहिले आणि मुख्य साधन आहे. सर्व प्रकारच्या यशप्राप्तीसाठी शरीरच प्रधान असते. म्हणूनच माणसाने आपले शरीर नेहमी समर्थ (सुदृढ) ठेवावे, कारण सुख आणि दुःख यांचा अनुभव घेणारे शरीरच आहे.

The body is indeed the primary instrument for performing duties. For the attainment of all goals, the physical self is paramount. Therefore, one should always keep the body capable, for both happiness and sorrow are bound to it.

दानेन पाणिर्न तु कङ्कणेन 
स्नानेन शुद्धिर्न तु चन्दनेन ।
मानेन तृप्तिर्न तु भोजनेन 
ज्ञानेन मुक्तिर्न तु मण्डनेन ।।४४२।।

हाताची शोभा दानाने वाढते, कंकणाने (दागिन्यांनी) नव्हे. शरीराची शुद्धी स्नानाने होते, चंदनाच्या उटीने नव्हे. मनाची तृप्ती सन्मानाने होते, केवळ भोजनाने नव्हे आणि मोक्ष हा ज्ञानाने मिळतो, केवळ बाह्य सजावटीने (वेषाने) नव्हे.

The hand is graced by charity, not by bracelets. Purity comes through bathing, not by sandalwood paste. Satisfaction is achieved through honor, not merely by food, and liberation is attained through knowledge, not by outward adornment.

योsयं परापकरणाय सृजत्युपायं
तेनैव तस्य नियमेन भवेद्विनाश:।
धूमं प्रसूते नयनान्धकरं यमग्नि:
भूत्वाsम्बुदः स शमयेन्सलिलैस्तमेव।।४४३।।

जो माणूस दुसऱ्याचे नुकसान करण्यासाठी नवनवीन उपाय शोधतो, नियमानुसार त्याच उपायाने त्याचा स्वतःचा विनाश होतो. ज्याप्रमाणे अग्नी डोळ्यांना अंध करणारा धूर निर्माण करतो, पण तोच धूर ढग बनून पाऊस पाडतो आणि शेवटी त्याच अग्नीला विझवतो.

He who devises means to harm others is invariably destroyed by those very means. Just as fire produces smoke that blinds the eyes, yet that smoke turns into clouds and extinguishes the same fire with rain.

आयुर्वर्षशतं नृणां परिमितं रात्रौ तदर्धं गतं
तस्यार्धस्य परस्य चार्धमपरं बालत्ववृद्धत्वयो:।
शेषं व्याधिवियोगदु:खसहितं सेवादिभिर्नीयते
जीवे वारितरङ्गचञ्चलतरे सौख्यं कुत: प्राणिनाम्।।४४४।।

माणसाचे आयुष्य शंभर वर्षांचे मानले तर त्यातील अर्धे (पन्नास वर्षे) रात्री निद्रेत जातात. उरलेल्या पन्नास वर्षांतील अर्धी वर्षे बालपण आणि वृद्धत्वात निघून जातात. उरलेले आयुष्य आजारपण, विरह आणि दुःख यात व्यतीत होते. पाण्याच्या लाटेप्रमाणे चंचल असणाऱ्या या आयुष्यात प्राण्यांना शाश्वत सुख कोठून मिळणार?

A human's lifespan is roughly a hundred years; half is spent in sleep at night. Of the remaining half, part goes into childhood and old age. What is left is consumed by illness, separation, and sorrow. In a life as fleeting as a wave on water, where is the lasting happiness for living beings?

यस्मिन्यथा वर्तते यो मनुष्य:
तस्मिंस्तथा वर्तितव्यं स धर्म:।
मायाचारो मायया वर्तितव्य:
साध्वाचार: साधुना प्रत्युपेय:।।४४५।।

समोरचा मनुष्य आपल्याबरोबर ज्या प्रकारे वागतो त्याच्याशी तसेच वागणे हाच धर्म आहे. धूर्तपणे वागणाऱ्याशी आपणही महाधूर्तपणे वागले पाहिजे.आणि सदाचराची परतफेड सदाचरणानेच केली पाहिजे. 

In whatever manner a man behaves with us; he should be treated in the same manner. This is the rule of appropriate conduct. Deceitful behaviour should be reciprocated by deceit and good conduct by candidacy.

अर्थागमो नित्यमरोगिता च 
प्रिया च भार्या प्रियवादिनी च।
वश्यश्च पुत्रोऽर्थकरी च विद्या 
षड्जीवलोकस्य सुखानि राजन्।।४४६।।

हे राजा! खात्रीशीर वेतन ,सदैव निरामय आरोग्य, प्रिय असणारी आणि गोड बोलणारी पत्नी, आज्ञाधारक मुलगा, आणि संपत्ती मिळवून देणारी विद्या या सहा गोष्टी म्हणजे भौतिक जगातील सुखे होत.

Oh king, assured income, always being in sound health, wife who is dear and who talks sweetly, son who is obedient and knowledge which generates wealth-- these six are the things of happiness in this world of mortal beings.

आरम्भगुर्वी क्षयिणी क्रमेण
लघ्वी पुरा वृद्धिमती च पश्चात्।
दिनस्य पूर्वार्धपरार्धभिन्ना
छायेव मैत्री खलसज्जनानाम्।।४४७।।

दिवसाच्या पूर्वार्धात सुरुवातीला मोठी असणारी सावली नंतर हळूहळू लहान होत जाते आणि उत्तरार्धात अगोदर लहान असणारी सावली नंतर मोठी होत जाते. या सावलीप्रमाणेच दुष्टांचा मैत्रीभाव सुरुवातीला मोठा आणि नंतर घटत जाणारा तर सज्जनांची मैत्री आधी लहान आणि नंतर वाढत जाणारी असते.

The friendship with the crooked and the righteous differs like that shadow which is larger in the beginning and goes on gradually decreasing in the first half of the day and that which is small in the beginning and goes on increasing afterwards in the second half of the day.

पापान्निवारयति योजयते हिताय
गुह्यं च गूहति गुणान्प्रकटीकरोति।
आपद्गतं च न जहाति ददाति काले
सन्मित्रलक्षणमिदं प्रवदन्ति सन्त: ।।४४८।।

पापाचरणापासून आपल्याला वाचवतो, कल्याणकारक गोष्ट करण्याची प्रेरणा देतो, रहस्य झाकून ठेवतो आणि आपले गुण प्रकट करतो. आपण संकटात सापडल्यावर आपल्याला कधीही सोडून देत नाही, आणि गरजेच्या वेळी मदत करतो. हे चांगल्या मित्राचे लक्षण आहे असे सज्जन लोक सांगतात.

A true friend takes you away from sinful conduct and motivates you to do good. He conceals your secrets and divulges our good qualities only. He never forsakes us in the time of calamities and also helps us in need. The good people say that these are the characteristics of a good friend.

गुणा गुणज्ञेषु गुणा भवन्ति 
ते निर्गुणं प्राप्य भवन्ति दोषा:।
आस्वाद्यतोया: प्रभवन्ति नद्य: 
समुद्रमासाद्य भवन्त्यपेया:।।४४९।।

सद्गुण हे जोपर्यंत गुणी माणसाकडे असतात तोपर्यंतच ते गुण म्हणून ओळखले जातात. दुर्गुणी मनुष्याच्या संगतीत गुणही दोषच बनतात. जसे नद्यांच्या उगमाकडे पाणी चवीला अत्यंत गोड असते पण त्या समुद्राला मिळताच तेच गोड पाणी पिण्यास अयोग्य होते.

Good qualities remain good, so long as they are with people who know their value. But they turn into bad qualities when they go near the people devoid of goodness. See-- the rivers are born with sweet water but when they merge into the ocean, their waters become unworthy for drinking.

असम्भवं हेममृगस्य जन्म 
तथापि रामो लुलुभे मृगाय।
प्राय: समापन्नविपत्तिकाले 
धियोऽपि पुंसां मलिना भवन्ति।।४५०।।

सोनेरी कांतीच्या हरिणाचा जन्म अशक्य गोष्ट आहे. तरीही राम त्या सोन्याच्या हरिणाला पाहून मोहित झाला. बहुधा संकटकाळी मनुष्याची बुध्दी भ्रष्ट होते, हेच खरे!

The birth of a gold-deer is not possible, yet Rama was enticed by such a deer. Usually in the time of calamity, the intelligence of a man gets clouded.