श्लोक क्र. १०१ ते ११० (गायिका--परिज्ञा)
मन्दं हसन्तं प्रभया लसन्तं
जनस्य चित्तं सततं हरन्तम्।
वेणुं नितान्तं मधु नादयन्तं
बालं मुकुन्दं मनसा स्मरामि।।४११।।
जनस्य चित्तं सततं हरन्तम्।
वेणुं नितान्तं मधु नादयन्तं
बालं मुकुन्दं मनसा स्मरामि।।४११।।
मंद हास्य करणाऱ्या, तेजाने तळपणाऱ्या आणि लोकांचे चित्त सतत हरण करणाऱ्या, अत्यंत मधुर वेणूवादन करणाऱ्या बालमुकुंदाचे मी मनात स्मरण करतो।
I meditate upon the child Mukunda, who smiles gently, shines with brilliance, constantly captivates the minds of people, and plays the flute most sweetly.
आश्वास्य च पर्वतकुलं तपनोष्मतप्तं
दुर्दाववह्निविधुराणि च काननानि।
नानानदीनदशतानि च पूरयित्वा
रिक्तोऽसि यज्जलद सैव तवोत्तमा श्रीः।। ४१२।।
सूर्याच्या तापाने तापलेल्या पर्वतसमूहांना दिलासा देऊन, भीषण वणव्याने होरपळलेली वने शांत करून आणि शेकडो नद्या-नद भरून टाकल्यानंतर हे मेघा, तू जो रिक्त झाला आहेस, तीच तुझी खरी आणि उत्तम शोभा आहे.
O Cloud, after comforting mountains scorched by the sun, cooling forests distressed by wildfires, and filling hundreds of rivers, the fact that you are now empty is indeed your greatest glory.
खिन्नं चापि सुभाषितेन रमते स्वीयं मनः सर्वदा
श्रुत्वान्यस्य सुभाषितं खलु मनः श्रोतुं पुर्वाञ्छति।
अज्ञान् ज्ञानवतोऽप्यनेन हि वशीकर्तुं समर्थो भवेत्
कर्तव्यो हि सुभाषितस्य मनुजैरावश्यकः सङ्ग्रहः।।४१३।।
श्रुत्वान्यस्य सुभाषितं खलु मनः श्रोतुं पुर्वाञ्छति।
अज्ञान् ज्ञानवतोऽप्यनेन हि वशीकर्तुं समर्थो भवेत्
कर्तव्यो हि सुभाषितस्य मनुजैरावश्यकः सङ्ग्रहः।।४१३।।
खिन्न झालेले मन सुभाषिते ऐकून नेहमी प्रसन्न होते. दुसऱ्याचे सुभाषित ऐकल्यावर मन पुन्हा नवे सुभाषित ऐकण्याची इच्छा करते. सुभाषिते अज्ञानी तसेच ज्ञानवंतांनाही वश करण्यास समर्थ असतात, म्हणूनच मानवांनी सुभाषितांचा संग्रह अवश्य करावा.
A distressed mind always finds delight in a subhashita; upon hearing one, the mind craves to hear another. Since subhashitas can influence both the ignorant and the wise, people must maintain a collection of them.
वार्ता च कौतुकवती विमला च विद्या
लोकोत्तरः परिमलश्च कुरङ्गनाभेः।
तैलस्य बिन्दुरिव वारिणि दुर्निवार-
मेतत्त्रयं प्रसरति स्वयमेव भूमौ।।४१४।।
लोकोत्तरः परिमलश्च कुरङ्गनाभेः।
तैलस्य बिन्दुरिव वारिणि दुर्निवार-
मेतत्त्रयं प्रसरति स्वयमेव भूमौ।।४१४।।
कुतूहल निर्माण करणारी बातमी, निर्मळ विद्या आणि कस्तुरीचा अलौकिक सुगंध; या तीन गोष्टी पाण्यावर पडलेल्या तेलाच्या थेंबाप्रमाणे या पृथ्वीवर स्वतःहून पसरतात, त्यांना रोखणे कठीण असते.
Interesting news, pure knowledge, and the extraordinary fragrance of musk; like a drop of oil on water, these three spread irresistibly on their own across the earth.
कोलाहले काकुलस्य जाते
विराजते कोकिलकूजितं किम्।
परस्परं संवदतां खलानां
मौनं विधेयं सततं सुधीभिः।। ४१५।।
जेथे कावळ्यांचा मोठा कोलाहल सुरू असतो, तेथे कोकिळेचे कूजन कोणाला ऐकू येणार किंवा शोभणार? त्याचप्रमाणे, जेव्हा दुर्जन एकमेकांशी भांडत किंवा बोलत असतात, तेव्हा बुद्धिमान लोकांनी नेहमी मौन पाळावे.
When there is a loud clamor of crows, can the song of a cuckoo be distinguished or appreciated? Similarly, when the wicked are arguing amongst themselves, the wise should always remain silent.
रत्नाकरस्तव पिता कमले निवासो
भ्राता सुधामयतनुः पतिरादिदेवः।
केनापरेण कमले बत शिक्षितानि
सारङ्गशृङ्गकुटिलानि विचेष्टितानि।। ४१६।।
रत्नाकर (समुद्र) तुझा पिता आहे, कमळ तुझे निवासस्थान आहे, अमृतमय शरीराचा चंद्र तुझा भाऊ आहे आणि प्रत्यक्ष आदिदेव विष्णू तुझे पती आहेत; तरीही हे कमले (लक्ष्मी), हरणाच्या शिंगाप्रमाणे हे कुटिल चाळे तुला इतर कोणी शिकवले? (अर्थात इतक्या उच्च कुळातील असूनही तू एका ठिकाणी स्थिर का राहत नाहीस?)
Ratnakara (the Ocean) is your father, the lotus is your abode, the nectar-bodied Moon is your brother, and Lord Vishnu himself is your husband. Despite this, O Lakshmi, by whom were you taught these crooked behaviors, as twisted as the horns of a deer?
विधिरेव विशेषगर्हणीयः
करट त्वं रट कस्तवापराधः।
सहकारतरौ चकार
यस्ते सह वासं सरलेन कोकिलेन।। ४१७।।
विधाता किंवा दैवच विशेष निंदनीय आहे. हे कावळ्या, तू ओरडत राहा, यात तुझा काय अपराध? दोष तर त्या विधात्याचा आहे, ज्याने आंब्याच्या झाडावर तुझा आणि त्या साध्या-भोळ्या कोकिळेचा एकत्र निवास घडवून आणला. (दुर्गुणी आणि सद्गुणी माणसांच्या एकत्र सहवासात दुर्गुणी मनुष्य आपले वाईट गुण प्रकट करत राहतो. त्याला कोणीही अडवत नाही. त्यामुळे या दोघांना एकत्र आणणारा ब्रह्मदेवच दोषी आहे असे कवी म्हणतो)
Destiny alone is particularly blameworthy. O Crow, keep cawing, for what is your fault? The fault lies with the Creator, who made you dwell on the same mango tree alongside the simple-hearted cuckoo. (When a good and a bad person come together because of fate, the bad person keeps expressing his bad qualities unhindered. So the poet thinks that for this union of the good and the bad the only blameworthy one is Brahma, the creatoor who has made this union.)
आघ्रातं परिचुम्बितं ननु मुहुर्लीढं ततश्चर्वितं
त्यक्तं वा भुवि नीरसेन मनसा तत्र व्यथां मा कृथाः।
हे सद्रत्न तवैतदेव कुशलं यद्वानरेणादरा-
दन्तःसारविलोकनव्यसनिना चूर्णीकृतं नाश्मना।। ४१८।।
तुला हुंगले गेले, वारंवार ओठांशी लावले गेले, चाटले गेले आणि मग चावले गेले; शेवटी नीरस मनाने जमिनीवर फेकून दिले गेले, तरीही हे श्रेष्ठ रत्ना (फळा), तू व्यथा करू नकोस. तुझे यातच कल्याण आहे की, त्या वानराने केवळ तुझ्या अंतरंगातील सार पाहण्याच्या नादात तुझे दगडाने चूर्ण केले नाही हेच नशीब समज
You were smelled, repeatedly kissed, licked, and then chewed; finally, you were cast away on the ground with a disinterested mind. O precious gem (fruit), do not grieve over this. It is your good fortune that the monkey, in his eagerness to see your inner essence, did not crush you into powder.
नायं प्रयाति विकृतिं विरसो न यः स्यात्
न क्षीयते बहुजनैः नितरां निपीतः।
जाड्यं निहन्ति रुचिं एति करोति तृप्तिं
नूनं सुभाषितरसः अन्यरसातिशायी।।४१९।।
हा सुभाषितरस कधीही विकृत होत नाही, तो कधीही बेचव होत नाही. कितीही लोकांनी त्याचे प्राशन केले तरी तो कधीही संपत नाही. तो जडत्व (अज्ञान) नष्ट करतो, रुची निर्माण करतो आणि समाधान देतो. खरोखर, सुभाषितरस हा इतर सर्व रसांपेक्षा श्रेष्ठ आहे.
This essence of wise sayings never undergoes change, nor does it ever become tasteless. It is not diminished even when consumed intensely by many people. It destroys dullness, brings relish, and provides satisfaction. Truly, the essence of Subhashitas surpasses all other juices.
अहमेव गुरुः सुदारुणानामिति
हालाहल मा स्म तात दृप्यः।
ननु सन्ति भवादृशानि भूयो
भवनेऽस्मिन्वचनानि दुर्जनानाम्।। ४२०।।
"मीच सर्वात भयानक आणि भयंकर आहे" असा गर्व हे हलाहल विषा, तू करू नकोस. अरे, तुझ्यासारखी (विषासारखी) दुर्जनांची अनेक वचने या जगात पावलोपावली उपलब्ध आहेत.
"I alone am the master of all things terrible," O Halahala poison, do not be so proud. Indeed, there are many words of wicked people in this world that are just like you.