श्लोक ४२१ ते ४३०

श्लोक क्र. १०१ ते ११० (गायिका--परिज्ञा)

धनानि भूमौ पशवश्च गोष्ठे
भार्या गृहद्वारि जनः श्मशाने।
देहश्चितायां परलोकमार्गे
कर्मानुगो गच्छति जीव एकः।।४२१।।

मृत्यूनंतर धन जमिनीखाली (गाडलेले किंवा बँकेत) राहते, गुरेढोरे गोठ्यातच राहतात, पत्नी घराच्या उंबरठ्यापर्यंत सोबत येते आणि नातेवाईक-मित्र स्मशानापर्यंत येतात. शरीर चितेवर जळून जाते; पण परलोकाच्या मार्गावर जीव फक्त आपल्या कर्मांनुसार एकटाच पुढे जातो.

After death, wealth remains on the ground, cattle stay in the stable, the wife follows up to the doorway, and kinsmen to the crematorium. The body is left on the pyre; on the path to the next world, the soul departs alone, followed only by its deeds (karma).

चातकस्त्रिचतुरान्पयःकणान्
याचते जलधरं पिपासया।
सोऽपि पूरयति विश्वमम्भसा 
हन्त हन्त महतामुदारता।। ४२२।।

तहानलेला चातक पक्षी मेघाकडे फक्त पावसाचे तीन-चार थेंबच मागतो. परंतु, तो मेघ (ढग) एवढा उदार असतो की तो संपूर्ण जगच पाण्याने भरून टाकतो. धन्य आहे ती मोठ्या माणसांची उदारता!

Out of thirst, the Chataka bird asks the cloud for only three or four drops of water. Yet, the cloud is so generous that it fills the entire world with water. Oh, how magnificent is the generosity of the great!

ज्वलति चलितेन्धनोऽग्नि:
विप्रकृतः पन्नगः फणां कुरुते।
प्रायः स्वं महिमानं 
क्रोधात्प्रतिपद्यते जन्तुः।। ४२३।।

लाकडे हलवली की अग्नी अधिक प्रज्वलित होतो, सर्पाला छेडले की तो फणा काढतो. त्याचप्रमाणे, प्रतिकूल परिस्थितीत किंवा डिवचले गेल्यावर प्राणी (किंवा मनुष्य) आपले खरे सामर्थ्य आणि मोठेपण प्रगट करतो.

Fire burns brighter when the fuel is stirred; a serpent raises its hood when provoked. Generally, a living being regains its true glory and power when challenged or moved to anger.

गुणायन्ते दोषा सुजनवदने दुर्जनमुखे
गुणा दोषायन्ते यदिदमपि नो विस्मयपदम्।
महामेघः क्षारं पिबति कुरुते वारि मधुरं
फणी क्षीरं पीत्वा वमति गरलं दुःसहतरम्।।४२४।।

सज्जनांच्या सहवासात दोषांचेही गुणांत रूपांतर होते, तर दुर्जनांच्या संपर्कात गुणांचेही दोष होतात; यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. पहा, ढग समुद्राचे खारे पाणी पितात पण गोड पाण्याचा वर्षाव करतात, तर साप दूध प्यायल्यानंतरही केवळ विषच ओकतो.

In the company of the good, faults turn into virtues; but in the mouth of the wicked, virtues turn into faults—this is not surprising. A great cloud drinks salty water and turns it into sweet rain, whereas a snake drinks milk and only vomits unbearable poison.

अङ्गं गलितं पलितं तुण्डं
दन्तविहीनं जातं तुण्डम्।
वृद्धो याति गृहीत्वा दण्डं
तदपि न मुञ्चत्याशा पिण्डम्।। ४२५।।

शरीर थकले आहे, डोक्याचे केस पांढरे झाले आहेत, तोंड दातविहीन झाले आहे. वृद्ध माणूस हातात काठी घेऊन चालतो, तरीही त्याच्या मनातील आशा मात्र काही केल्या त्याला सोडत नाही.

The body has become frail, the head has turned grey, and the mouth is toothless. The old man walks leaning on a staff, yet the 'lump of desire' (hope/attachment) does not leave him.

श्रोत्रं श्रुतेनैव न कुण्डलेन
दानेन पाणिर्न तु कङ्कणेन।
विभाति कायः खलु सज्जनानां
परोपकारेण न तु चन्दनेन।।४२६।।

कानांची शोभा कुंडल घातल्याने नाही, तर शास्त्रांच्या श्रवणाने वाढते. हातांची शोभा दानाने वाढते, कंकणाने नाही. त्याचप्रमाणे, सज्जनांचे शरीर परोपकाराने शोभून दिसते, सुगंधी चंदनाचा लेप लावल्याने नाही.

The beauty of the ears is enhanced by listening to sacred knowledge, not by earrings. The hands look beautiful through charity, not by bracelets. Similarly, the bodies of virtuous people shine through acts of benevolence, not by applying sandalwood paste.

शशिनि किल कलङ्कः कण्टकं पद्मनाले
गुणवति विधनत्वं चन्दने कृष्णसर्पः।
उदधिजलमपेयंनिर्मितं येन लोके
स खलु जगति नूनं निर्विवेको विधाता।।४२७।।

चंद्रावर डाग आहे, कमळाच्या देठाला काटे आहेत, गुणवान व्यक्ती अनेकदा निर्धन असते, चंदनाच्या झाडाला सापांचा वेढा असतो आणि अथांग समुद्राचे पाणी पिण्यायोग्य नसते; हे सर्व ज्याने निर्माण केले, तो विधाता (ब्रह्मदेव) खरोखरच विवेकशून्य वाटतो.

There is a spot on the moon, thorns on the lotus stalk, poverty in the virtuous, and black cobras on the sandalwood tree. The one who made the ocean's vast water undrinkable is indeed a Creator lacking in judgment.

न भूप्रदानं न सुवर्णदानं
न गोप्रदानं न तथान्नदानम्।
यथा वदन्तीह महाप्रदानं
सर्वेषु दानेष्वभयप्रदानम्।।४२८।।

भूमीदान, सुवर्णदान, गोदान किंवा अन्नदान हे श्रेष्ठ असले तरी, या सर्वांमध्ये 'अभयदान' (कोणालाही भीतीपासून मुक्त करणे किंवा जीवदान देणे) हेच सर्वात महान दान मानले जाते.

Neither the gift of land, nor gold, nor cows, nor even food is as great as what is called the 'Maha-Pradan' (supreme gift)—the gift of fearlessness or protection (Abhaya-dan).


किं कोकिलस्य विरुतेन गते वसन्ते
किं कातरस्य बहुशस्त्रपरिग्रहेण।
मित्रेण किं व्यसनकालपराङ्मुखेन
किं जीवितेन पुरुषस्य निरक्षरेण।।४२९।।

वसंत ऋतू निघून गेल्यावर कोकिळेच्या गाण्याचा काय उपयोग? घाबरट माणसाने हातात शस्त्रे धरून काय उपयोग? संकटाच्या वेळी पाठ फिरवणाऱ्या मित्राचा काय उपयोग? आणि निरक्षर माणसाच्या जगण्याचा काय उपयोग?

What is the use of a cuckoo's song once spring is gone? What is the point of a coward carrying many weapons? What is the value of a friend who turns away in times of trouble? And what is the use of the life of an illiterate man?

वासः प्रधानं खलु योग्यतायाः
वासोविहीनं विजहाति लक्ष्मीः।
पीताम्बरं वीक्ष्य ददौ स्वकन्यां
दिगम्बरं वीक्ष्य विषं समुद्रः।।४३०।।

योग्यतेसाठी वेशभूषा अत्यंत महत्त्वाची आहे; ज्याच्याकडे वस्त्रे नाहीत (किंवा जो दरिद्री आहे) त्याला लक्ष्मी सोडून जाते. पहा, समुद्रमंथनाच्या वेळी समुद्राने विष्णूंचे 'पीतांबर' (रेशमी वस्त्र) पाहून त्यांना आपली कन्या (लक्ष्मी) दिली, पण महादेवांचे 'दिगंबर' (वस्त्रहीन/व्याघ्रांबर) रूप पाहून त्यांना मात्र विष दिले.

Attire is indeed essential for perceived worth; prosperity abandons the poorly dressed. Seeing Vishnu in fine yellow silks (Pitambara), the Ocean gave him his daughter (Lakshmi); but seeing Shiva as an ascetic (Digambara), he gave him poison.