श्लोक क्र. १०१ ते ११० (गायिका--परिज्ञा)
अतिभोजनस्य वर्जनम्--
अनारोग्यं अनायुष्यम्
अस्वर्ग्यं चातिभोजनम् ।
अपुण्यं लोकविद्विष्टं
तस्मात्तत्परिवर्जयेत्।।१७१।।
अति खाणे हे अनारोग्याला आमंत्रण देणारे असून स्वर्गप्राप्तीत अडथळा आणणारे , पुण्याचा नाश करणारे आणि लोकांकडून निंदा होणारेही असे असल्यामुळे अतिभोजनाचा त्याग करावा.
Eating excessively brings about ill health; it is not conducive to the attainment of heaven ; it destroys good merit and it is despised by people. So it should always be forsaken.
वृद्धपूजनम्--
ऊर्ध्वं प्राणा ह्युत्क्रामन्ति
यूनः स्थविर आयति ।
प्रत्युत्थानाभिवादाभ्यां
पुनस्तान्प्रतिपद्यते।।१७२।।
जर वयोवृद्ध माणूस जवळ आला तर तरुणांचे प्राण ऊर्ध्व दिशेला खेचले जाऊ लागतात. तरुणाने त्याला उठून मान दिला आणि अभिवादन केल्यानंतर त्याला प्राणांची पुन:प्राप्ती होते.
When an old person comes near, the Prana (vital force) of the young begins travelling upwards. When the young gives him respect by standing up and saluting, only then he gets them back.
अभिवादनशीलस्य
नित्यं वृद्धोपसेविनः।
चत्वारि तस्य वर्धन्ते
आयुर्धर्मो यशो बलम्।।१७३।।
जो नेहमी वृद्धांना नमस्कार करतो आणि त्यांची सेवा करतो, त्याचे आयुष्य, धर्म, यश आणि बल नेहमी वाढत असतात.
Of him who always bows down before the elderly and always serves them, the four things viz the life span, religious merit, fame and strength go on increasing.
स्वाध्यायस्य महत्त्वम्--
यः स्वाध्यायं अधीतेऽब्दं
विधिना नियतः शुचिः।
तस्य नित्यं क्षरत्येष
पयो दधि घृतं मधु।।१७४।।
जो पवित्र आणि संयमी राहून विधिपूर्वक एक वर्षभर जरी अध्ययन करेल, तरी त्याच्याकरता ते अध्ययन दूध, दही, तूप आणि मधु यांचा (अन्नाच्या समृद्धीचा) स्रोत बनेल.
Even if one studies in due manner, remaining pious and controlled in behaviour, that study will become for him a source of abundance of food.
गुरुमातृपितृपूजनम्--
आचार्यश्च पिता चैव
माता भ्राता च पूर्वजः।
नार्तेनाप्यवमन्तव्या
मनुष्येण विशेषतः।।१७५।।
स्वत: दु:खाकष्टात असला तरी माणसाने आपले गुरू, आईवडील, मोठा भाऊ यांचा कधीही अपमान करू नये.
A man should not disrespect his teacher, father, mother and his elder sibling , even when he is in extreme distress himself.
सर्वे तस्यादृता धर्मा
यस्यैते त्रय आदृताः।
अनादृतास्तु यस्यैते
सर्वास्तस्याफलाः क्रियाः।।१७६।।
या तिघांचा जो आदर करतो, त्याने सर्व कर्तव्यांचे पालन केल्याप्रमाणेच होते. परंतु जो यांचा अनादर करतो त्याच्या सर्व क्रिया निष्फळ होतात.
For him who respects these three, all religious duties are as if fulfilled, But he who doesn’t respect them ,all his actions go to waste.
दीपनमस्कार:--
शुभं करोति कल्याणम्
आरोग्यं धनसम्पदः ।
शत्रुबुद्धिविनाशाय
दीपज्योतिर्नमोऽस्तुते ।। १७७।।
शुभ आणि कल्याणकारक अशा, आरोग्य आणि धनसम्पत्ती देणाऱ्या हे दीपज्योती, माझ्या इतरांप्रती असलेल्या शत्रुभावाचा नाश व्हावा म्हणून माझा तुला नमस्कार असो.
Oh lamp-flame, auspicious and causing welfare, giving health and abundance , we bow down to thee for the destruction of our enmity towards others.
दीपज्योतिः परब्रह्म
दीपज्योतिर्जनार्दनः ।
दीपो हरतु मे पापं
दीपज्योतिर्नमोऽस्तुते ।। १७८।।
दीपज्योती ही परब्रह्मरूप आणि विष्णुरूप आहे. दीपज्योती माझे पाप नाहीसे करो. हे दीपज्योती तुला माझा नमस्कार.
The lamp-fame is verily Parabrahman, it is Vishnu. May the lamp-flame take away my sins. Oh lamp-flame, we bow sown to thee.
शयनमन्त्र:--
रामं स्कन्दं हनूमन्तं
वैनतेयं वृकोदरम् ।
शयने यः स्मरेन्नित्यं
दुःस्वप्नस्तस्य नश्यति ।। १७९।।
राम, कार्तिकेय, हनुमान, गरुड आणि भीम यांचे जो झोपण्यापूर्वी नेहमी स्मरण करतो त्याची दु:स्वप्ने नष्ट होतात.
One who always remembers Rama, Kartikeya, Hanuman, Garuda and Bheema before going to sleep, doesn’t have nightmares.
सामान्यवर्तननियम:--
श्रूयतां धर्मसर्वस्वं
श्रुत्वा चैवावधार्यताम्।
आत्मन: प्रतिकूलानि
परेषां न समाचरेत्।। १८०।।
धर्माचा हे सार ऐक आणि ऐकून ते स्वत:च्या आचरणात आण. ते सार म्हणजे– स्वत:ला ज्या गोष्टी प्रतिकूल वाटतात त्यांचे दुसऱ्यांच्या बाबतीत आचरण कधीही करू नये.
Listen to this gist of religious duty and hold onto it firmly– whatever one thinks undesirable for himself, he should never do it in the case of others.