ब्राह्मे मुहूर्ते बुध्येत
धर्मार्थौ चानुचिन्तयेत्।
कायक्लेशांश्च तन्मूलान्
ब्रह्मतत्त्वार्थमेव च।।१६१।।
ब्राह्म मुहूर्तावर झोपेतून उठावे. धर्म आणि अर्थ यांचे चिंतन करावे. तसेच आपले रोगादि शारीरिक कष्ट आणि त्यांच्या संभाव्य मूळ कारणांचा विचार करावा आणि ब्रह्मतत्त्वरूप पदार्थाचेही चिंतन करावे.
One should always rise before the dawn and think deeply about his duties, monetary position, the status of physical illnesses, and its root causes as also about Brahman, the principle underlying all existence.
करदर्शनम्--
कराग्रे वसते लक्ष्मीः
करमध्ये सरस्वती ।
करमूले स्थितो ब्रह्मा
प्रभाते करदर्शनम् ।।१६२।।
हाताच्या टोकावर लक्ष्मी मध्यभागी सरस्वती आणि मुळाशी ब्रह्मदेव वास करतो म्हणून प्रभातकाली हाताचे दर्शन घ्यावे.
Laxmi resides at the tip of the hand, Saraswati in the middle of it and Brahmadev at its root. Therefore one should have a darshan of the hand at the beginning of the day.
पृथ्वीवन्दनम्
समुद्रवसने देवि
पर्वतावलिभूषिते ।
विष्णुपत्नि नमस्तुभ्यं
पादस्पर्शं क्षमस्व मे ।।१६३।।
समुद्र हेच जिचे वस्त्र आहे,जी पर्वतांच्या रांगांनी सुशोभित आहे अशा हे विष्णुपत्नी पृथ्वी, तुला नमस्कार असो. माझ्या पायांनी मी तुला स्पर्श करत आहे याबद्दल मला क्षमा कर.
Oh Vishnu’s spouse mother earth, you who has oceans as her apparel, and who is adorned with the ranges of mountains, please forgive me as I’m touching you with my feet.
स्नानश्लोकः--
गङ्गे च यमुने चैव
गोदावरि सरस्वति ।
नर्मदे सिन्धु कावेरि
जलेऽस्मिन् सन्निधिं कुरु ।।१६४।।
हे गंगे, यमुने, गोदावरी, सरस्वती, नर्मदे, सिंधू, कावेरी तुम्ही सर्वजणी या (स्नानाच्या) पाण्यामध्ये येऊन रहा.
Oh Ganga, Yamuna, Saraswati, Narmada, Sinfhu, Kaveri, you all please come to stay in this (bath-)water.
व्यायामस्य महत्त्वम्--
व्यायामात् लभते स्वास्थ्यं
दीर्घायुष्यं बलं सुखम्।
आरोग्यं परमं भाग्यं
स्वास्थ्यं सर्वार्थसाधनम् ।।१६५।।
व्यायामामुळे स्वास्थ्य, दीर्घायुष्य,बल आणि सुख लाभते. आरोग्य म्हणजेच स्वास्थ्य हे परमभाग्यच असून जगातील सर्व गोष्टी प्राप्त करण्याचे ते साधन आहे.
Exercise gives us health, logevity, strength and happiness. Health is the most excellent fortune and it is instrumental to everything man wants to attain on the world.
सूर्यनमस्कारमन्त्र:--
आदित्यस्य नमस्कारान्
ये कुर्वन्ति दिने दिने।
आयु: प्रज्ञा बलं वीर्यं
तेजस्तेषां च जायते।। १६६।।
जे दररोज सूर्यनमस्कार करतात त्यांना आयुष्य, विद्या, बल, पराक्रम आणि तेजस्विता यांचा लाभ होतो.
Those who perform sun-lalutations daily obtain longevity, intelligence, strength, valour and brilliance.
अन्नपूजनम्--
पूजयेदशनं नित्यम्
अद्याच्चैतदकुत्सयन् ।
दृष्ट्वा हृष्येत्प्रसीदेच्च
प्रतिनन्देच्च सर्वशः।। १६७।।
अन्नाचे नेहमी पूजन करावे. त्याच्यातील दोष न काढता ते भक्षण करावे. अन्न समोर आल्यावर सर्वदा आनंद आणि प्रसन्नतेचा भाव धारण करावा.
One must respect food. It should be eaten without finding faults with it. When it comes in front, one should greet it with joyful and happy demeanor.
पूजितं ह्यशनं नित्यं
बलमूर्जं च यच्छति ।
अपूजितं तु तद्भुक्तम्
उभयं नाशयेदिदम्।। १६८।।
ज्याची पूजा केलेली आहे असे अन्न, बल आणि ऊर्जा प्रदान करते. परंतु पूजा न करता खाल्ल्यास ते या दोन्हींचाही नाश करते.
When worshipped, the food always gives strength and energy.But if it is not worshipped, then it destroys both of these.
ऊर्ध्वं प्राणा ह्युत्क्रामन्ति
यूनः स्थविर आयति ।
प्रत्युत्थानाभिवादाभ्यां
पुनस्तान्प्रतिपद्यते।।१७२।।
जर वयोवृद्ध माणूस जवळ आला तर तरुणांचे प्राण ऊर्ध्व दिशेला खेचले जाऊ लागतात. तरुणाने त्याला उठून मान दिला आणि अभिवादन केल्यानंतर त्याला प्राणांची पुन:प्राप्ती होते.
When an old person comes near, the Prana (vital force) of the young begins travelling upwards. When the young gives him respect by standing up and saluting, only then he gets them back.
अभिवादनशीलस्य
नित्यं वृद्धोपसेविनः।
चत्वारि तस्य वर्धन्ते
आयुर्धर्मो यशो बलम्।।१७३।।
जो नेहमी वृद्धांना नमस्कार करतो आणि त्यांची सेवा करतो, त्याचे आयुष्य, धर्म, यश आणि बल नेहमी वाढत असतात.
Of him who always bows down before the elderly and always serves them, the four things viz the life span, religious merit, fame and strength go on increasing.
स्वाध्यायस्य महत्त्वम्--
यः स्वाध्यायमधीतेऽब्दं
विधिना नियतः शुचिः।
तस्य नित्यं क्षरत्येष:
पयो दधि घृतं मधु।।१७४।।
जो पवित्र आणि संयमी राहून विधिपूर्वक एक वर्षभर जरी अध्ययन करेल, तरी त्याच्याकरता ते अध्ययन दूध, दही, तूप आणि मधु यांचा (अन्नाच्या समृद्धीचा) स्रोत बनेल.
Even if one studies in due manner, remaining pious and controlled in behaviour, that study will become for him a source of abundance of food.
गुरुमातृपितृपूजनम्--
आचार्यश्च पिता चैव
माता भ्राता च पूर्वजः।
नार्तेनाप्यवमन्तव्या
मनुष्येण विशेषतः।।१७५।।
स्वत: दु:खाकष्टात असला तरी माणसाने आपले गुरू, आईवडील, मोठा भाऊ यांचा कधीही अपमान करू नये.
A man should not disrespect his teacher, father, mother and his elder sibling , even when he is in extreme distress himself.
सर्वे तस्यादृता धर्मा:
यस्यैते त्रय आदृताः।
अनादृतास्तु यस्यैते
सर्वास्तस्याफलाः क्रियाः।।१७६।।
या तिघांचा जो आदर करतो, त्याने सर्व कर्तव्यांचे पालन केल्याप्रमाणेच होते. परंतु जो यांचा अनादर करतो त्याच्या सर्व क्रिया निष्फळ होतात.
For him who respects these three, all religious duties are as if fulfilled, But he who doesn’t respect them ,all his actions go to waste.
शुभं करोति कल्याणम्
आरोग्यं धनसम्पदः ।
शत्रुबुद्धिविनाशाय
दीपज्योतिर्नमोऽस्तुते ।। १७७।।
शुभ आणि कल्याणकारक अशा, आरोग्य आणि धनसम्पत्ती देणाऱ्या हे दीपज्योती, माझ्या इतरांप्रती असलेल्या शत्रुभावाचा नाश व्हावा म्हणून माझा तुला नमस्कार असो.
Oh lamp-flame, auspicious and causing welfare, giving health and abundance , we bow down to thee for the destruction of our enmity towards others.
दीपज्योतिः परब्रह्म
दीपज्योतिर्जनार्दनः ।
दीपो हरतु मे पापं
दीपज्योतिर्नमोऽस्तुते ।। १७८।।
दीपज्योती ही परब्रह्मरूप आणि विष्णुरूप आहे. दीपज्योती माझे पाप नाहीसे करो. हे दीपज्योती तुला माझा नमस्कार.
The lamp-fame is verily Parabrahman, it is Vishnu. May the lamp-flame take away my sins. Oh lamp-flame, we bow sown to thee.
शयनमन्त्र:--
रामं स्कन्दं हनूमन्तं
वैनतेयं वृकोदरम् ।
शयने यः स्मरेन्नित्यं
दुःस्वप्नस्तस्य नश्यति ।। १७९।।
राम, कार्तिकेय, हनुमान, गरुड आणि भीम यांचे जो झोपण्यापूर्वी नेहमी स्मरण करतो त्याची दु:स्वप्ने नष्ट होतात.
One who always remembers Rama, Kartikeya, Hanuman, Garuda and Bheema before going to sleep, doesn’t have nightmares.
सामान्यवर्तननियम:--
श्रूयतां धर्मसर्वस्वं
श्रुत्वा चैवावधार्यताम्।
आत्मन: प्रतिकूलानि
परेषां न समाचरेत्।। १८०।।
धर्माचा हे सार ऐक आणि ऐकून ते स्वत:च्या आचरणात आण. ते सार म्हणजे– स्वत:ला ज्या गोष्टी प्रतिकूल वाटतात त्यांचे दुसऱ्यांच्या बाबतीत आचरण कधीही करू नये.
Listen to this gist of religious duty and hold onto it firmly– whatever one thinks undesirable for himself, he should never do it in the case of others.
न पश्चात्तापवान्भवेत्।
बलिनात्मार्पितो बन्धे
दानशेषस्य शुद्धये ।।१८१।।
दान हे नेहमी सत्पात्री आणि शुद्ध भावनेने करावे, जेणेकरून नंतर पश्चात्ताप होणार नाही. पहा, राजा बळीने दिलेल्या दानात काही उणीव राहू नये (शुद्धीसाठी), म्हणून स्वतःलाच बंधनात टाकून स्वतःचे समर्पण केले.
Charity should be performed with a pure heart and towards the deserving, so that one does not regret it later. King Bali even offered himself into bondage to fulfill the sanctity of his remaining vow of charity.
न पारुष्यविषप्लुतान्।
वाक्पारुष्यरुषा चक्रे
भीमः कुरु कुलक्षयम् ।।१८२।।
कठोर आणि विषारी शब्दांचे बाण दुसऱ्यावर सोडू नयेत. शब्दांच्या अशाच कठोरपणामुळे (द्रौपदीचा अपमान व दुर्योधनाचे बोलणे) संतापलेल्या भीमाने कुरु कुळाचा नाश करण्याची प्रतिज्ञा केली आणि तो घडवून आणला.
One should not hurl terrible arrows of words filled with the poison of harshness. It was the rage caused by harsh speech that led Bhima to cause the destruction of the Kuru clan.
न पैशुन्यं प्रभुप्रियम्।
पैशुन्येन गतौ राहोः
चन्द्रार्कौ भक्षणीयताम् ।।१८३।।
दुसऱ्याला त्रास देणारे चहाडीखोरपणाचे (कागाळ्या करण्याचे) वर्तन मालकाचे प्रिय होण्यासाठी करू नये. चहाडीमुळेच (राहूने केलेली तक्रार) सूर्य आणि चंद्राला राहूकडून गिळले जाण्याचे (ग्रहणाचे) संकट सोसावे लागते.
One should not engage in backbiting or slandering others to please a master. Due to such slandering (by Rahu), even the Sun and the Moon fell into the state of being swallowed.
न याञ्चां मानहारिणीम्।
बलिप्रार्थनया प्राप
लघुतां पुरुषोत्तमः।।१८४।।
अधम लोक करतात तशी स्वाभिमान घालवणारी याचना (मागणी) करू नये. प्रत्यक्ष पुरुषोत्तम विष्णूला सुद्धा राजा बळीकडे दान मागितल्यामुळे 'वामन' (लहान/खुजे) व्हावे लागले होते.
One should not engage in pride-destroying begging, a habit of the lowly. Even Lord Vishnu attained smallness (as Vamana) when he went to entreat King Bali for a gift.
न कुर्यात्प्रीतिसङ्गतिम्।
वसिष्ठस्याहरद्धेनुं
विश्वामित्त्रो निमन्त्रितः।।१८५।।
कुटील, क्रूर आणि लोभी लोकांशी कधीही मैत्री करू नये. निमंत्रित असूनही (पाहुणचार घेऊनही) लोभी विश्वामित्राने वसिष्ठ ऋषींची कामधेनु पळवून नेण्याचा प्रयत्न केला होता.
One should not form affectionate associations with the crooked, the cruel, or the greedy. Even as a guest, the greedy Vishwamitra tried to seize the cow of Vasishtha.
निर्दोषं न परित्यजेत्।
रामस्त्यक्त्वा सतीं सीतां
शोकशल्याकुलोऽभवत् ।।१८६।।
जो आपल्यावर प्रेम करतो, जो निष्ठावान आहे आणि जो निर्दोष आहे, अशा व्यक्तीचा कधीही त्याग करू नये. सती सीतेचा त्याग केल्यामुळे प्रभू रामाला सुद्धा आयुष्यभर शोकाच्या शल्यात (दुःखात) जगावे लागले.
One should not abandon a devoted, loving, and faultless person. By abandoning the virtuous Sita, even Rama became overwhelmed by the thorn of grief.
पूज्यान्नैवापमानयेत्।
नहुषः शक्रतां प्राप्य
च्युतोऽगस्त्यावमाननात् ।।१८७।।
कितीही मोठ्या पदावर पोहोचलात तरी पूजनीय व्यक्तींचा अपमान करू नये. इंद्राचे पद मिळवून सुद्धा राजा नहुषाला अगस्त्य ऋषींचा अपमान केल्यामुळे स्वर्गातून खाली पडावे लागले.
Even if elevated to a high position, one should never insult those worthy of worship. Nahusha, despite attaining the status of Indra, fell from grace due to his insult to Sage Agastya.
कुर्वीत च यथोदितम्।
विदुरोक्तमकृत्वाभूत्
कौरवः शोकशल्यभाक् ।।१८८।।
हितकारक उपदेश ऐकावा आणि सांगितल्याप्रमाणे वागावे. विदुराचा उपदेश न मानल्यामुळेच कौरवांना विनाशाचा आणि दुःखाचा धनी व्हावे लागले.
One should listen to beneficial advice and act accordingly. By not following Vidura’s counsel, the Kauravas became the victims of deep sorrow and ruin.
कुर्यादार्यः कथञ्चन।
पुत्रार्पितप्रभुत्वोऽभूत्
धृतराष्ट्रस्तृणोपमः ।।१८९।।
शहाण्या माणसाने आपली सर्व सत्ता किंवा ऐश्वर्य मुलाच्या स्वाधीन करू नये. पुत्राला (दुर्योधनाला) सर्व अधिकार दिल्यामुळे धृतराष्ट्राची अवस्था एका गवताच्या काडीसारखी (केविलवाणी) झाली होती.
A noble person should never make their wealth or power entirely dependent on a son. Dhritarashtra, having handed over his authority to his son, became as insignificant as a blade of grass.
न त्यजेत्साधुसेवितम्।
दैत्यानां श्रीवियोगोऽभूत्
सत्यधर्मक्रियामुचाम् ।।१९०।।
वेदांनी सांगितलेला आणि सज्जनांनी आचरलेला सदाचार कधीही सोडू नये. सत्य आणि धर्माचे आचरण सोडल्यामुळेच दैत्यांच्या वाट्याला लक्ष्मीचा वियोग (वैभव जाणे) आला.
One should not abandon the conduct prescribed by the scriptures and practiced by the virtuous. The demons lost their prosperity (Shri) because they abandoned the path of truth and righteous action.
किं कस्य श्वो भविष्यति।
अतः श्वः करणीयानि
कुर्यादद्यैव बुद्धिमान् ।।१९१।।
उद्या कोणाच्या नशिबात काय वाढून ठेवले आहे हे कोणालाही ठाऊक नसते; म्हणूनच बुद्धिमान माणसाने उद्या करायची कामे आजच पूर्ण करावीत.
No one knows what tomorrow will bring for anyone; therefore, a wise person should do today the tasks meant for tomorrow.
यल्लोकद्वयशर्मदम्।
विचिन्त्य तदनुष्ठेयं
कर्म हेयं ततोन्यथा।।१९२।।
या नश्वर मानवी देहाने जे कर्म केल्यामुळे या लोकात आणि परलोकात सुख मिळेल, त्याचाच विचार करून ते करावे; याउलट असणारी सर्व कर्मे सोडून द्यावीत.
With this mortal body, one should perform only those actions that bring happiness in both this world and the next; all other actions should be abandoned.
परार्थं कर्म नैपुणम्।
पात्रे दानं परः कामः
परो मोक्षो वितृष्णता।।१९३।।
Helping others is the highest duty, and working for others' welfare is true skill. Giving to the deserving is the best desire, and freedom from cravings is ultimate liberation.
वल्मीकस्य तु सञ्चयम्।
अवन्ध्यं दिवसं कुर्यात्
दानाध्ययनकर्मसु ।।१९४।।
काजळ वापरल्याने हळूहळू संपते आणि वारूळ (मुंग्यांनी) कण कण साठवल्याने मोठे होते; हे लक्षात घेऊन माणसाने आपला दिवस दान, अभ्यास आणि सत्कर्मात घालवून तो सत्कारणी लावावा.
Observing how eye-soot diminishes with use and how an anthill grows by small additions, one should make each day fruitful through charity, study, and good deeds.
श्लिष्टं दुःखेन भिद्यते।
भिन्नश्लिष्टा तु या प्रीतिः
सा दुःखैकप्रदायिनी ।।१९५।।
तुटलेले नाते जोडणे कठीण असते आणि एकदा जोडलेले नाते तुटणे हे सुद्धा दुःखदायक असते. जे नाते वारंवार तुटून पुन्हा जोडले जाते, ते प्रेम केवळ दुःखच देते.
It is difficult to unite what is broken, and painful to break what is united. Love that is repeatedly broken and patched up only brings supreme misery.
ययोरेव समं कुलम्।
तयोर्मैत्त्री विवाहश्च
न तु पुष्टविपुष्टयोः ।।१९६।।
ज्यांची संपत्ती आणि कुळ समान दर्जाचे आहे, त्यांच्यातच मैत्री आणि विवाह शोभा देतो. अत्यंत श्रीमंत आणि अत्यंत गरीब यांच्यात असे संबंध टिकत नाहीत.
Friendship and marriage are appropriate only between those of equal wealth and lineage, not between the very powerful and the weak.
पितुः ख्याताश्च मध्यमाः।
अधमा मातुलात्ख्याताः
श्वशुराच्चाधमाधमाः ।।१९७।।
जे स्वतःच्या कर्तृत्वाने ओळखले जातात ते 'उत्तम', जे वडिलांच्या नावामुळे ओळखले जातात ते 'मध्यम', जे मामाच्या नावावर जगतात ते 'अधम' आणि जे सासरच्या जिवावर ओळखले जातात ते 'अधमाधम' (सर्वात हलके) होत.
The best are known by their own deeds, the mediocre by their father's name, the low by their maternal uncle's, and the lowest of all by their father-in-law's.
शत्रुशेषस्तथैव च।
पुनः पुनः प्रवर्तन्ते
तस्माच्छेषं न रक्षयेत् ।।१९८।।
कर्जाचा थोडासा भाग, अग्नीचा छोटा अंश आणि उरलेला शत्रू; हे पुन्हा पुन्हा डोके वर काढतात (वाढतात). म्हणून या तिन्हींना थोडे सुद्धा शिल्लक ठेवू नये, त्यांचा पूर्ण नायनाट करावा.
A remnant of debt, a trace of fire, and a surviving enemy will all grow again and again. Therefore, one should leave no remainder of these three.
स पुत्रो यत्र निर्वृतिः।
तन्मित्त्रं यत्र विश्वासः
स देशो यत्र जीव्यते ।।१९९।।
तीच खरी पत्नी जी गोड बोलते, तोच खरा मुलगा ज्याच्यामुळे सुख-समाधान मिळते. तोच खरा मित्र ज्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवता येतो आणि तोच खरा देश जिथे उपजीविका (मान-सन्मानाने जगणे) शक्य आहे.
She alone is a true wife who speaks kindly; he alone is a true son who brings peace and happiness. He alone is a true friend who can be trusted, and that alone is a true country where one can earn a livelihood.
ना स्वैरेव चेष्टितैः।
अधः कूपस्य खनकः
ऊर्ध्वं प्रासादकारकः ।।२००।।
माणूस आपल्या स्वतःच्या कर्मांनीच खाली (अधोगतीला) जातो किंवा वर (प्रगतीला) चढतो; ज्याप्रमाणे विहीर खणणारा स्वतःच खाली खोल जातो, तर महाल बांधणारा कामगार उंचावर चढत जातो.
A person goes down or rises high solely by their own actions; just as the digger of a well goes deep down, while the builder of a palace rises higher and higher.
© 2026 अभिजित तोडकर | shlokpathanam.blogspot.com | All rights Reserved.